Diet

वजन कमी करण्याठी पनीरपेक्षा तोफू का आहे चांगले

Leenal Gawade  |  Sep 11, 2020
वजन कमी करण्याठी पनीरपेक्षा तोफू का आहे चांगले

वजन कमी करणे आणि स्वत:ला फिट ठेवणे हे हल्ली अनेकांचे उद्दिष्ट्य असते. त्यामुळेच चांगले पदार्थ पोटात जावे असा हट्ट हल्ली अनेकांचा असतो. त्यामुळेच आहारात अंडी, दूध, तूप, हिरव्या पालेभाज्या, काकडी, टोमॅटो अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश केला जातो. मांसाहारी लोकांसाठी आहारात प्रोटीन मिळवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. पण शाकाहारी लोकांना मात्र प्रोटीन मिळवण्यासाठी काही खास गोष्टींचे सेवन करावे लागते. त्यांच्या आहारात प्रोटीन आणि पोषक तत्व मिळवण्यासाठी दूध आणि दूग्धजन्य पदार्थांचे सेवन फारच फायदेशीर असते. शाकाहारी लोकांच्या आहारात पनीर हे फारच फायदेशीर असते. पण दूधापासून बनललेल्या या पनीरच्या अतिसेवनामुळे शरीरातील मेद वाढण्याचीही तितकीच जास्त शक्यता असते. शिवाय हल्लीच्या नव्या ट्रेंडनुसार काहींना दूधही चालत नाही ( वेगन) त्यामुळे अशांनी नेमकं काय खायला हवं असा देखील प्रश्न पडतो. अशांसाठी पर्याय म्हणून ‘तोफू’ हा पर्याय हल्ली सर्रास सगळीकडे पाहायला मिळतो. पण तोफू म्हणजे काय आणि तो पनीरपेक्षा का चांगला आहे ते आज आपण जाणून घेऊया.

स्वादासह आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते पनीर, जाणून घ्या फायदे

पनीर आणि तोफूमध्ये काय आहे फरक

Instagram

पनीर:  फुल फॅट दूधामध्ये लिंबू पिळून किंवा सायट्रिक अॅसिड घालून दूध फाडले जाते. फाडले जाते. दूध फाटल्यानंतर त्याचे तयार होणारा चोथा वेगळा करुन पाणी काढून टाकले जाते. जो चोथा किंवा दूधाचा एक गोळा तयार होतो. त्याला पनीर असे म्हणतात. पनीर हा एक हायप्रोटीन असलेला पदार्थ आहे. भारतात वेगवेगळ्या भाज्या, ग्रेव्हीजमध्ये याचा उपयोग केला जातो.  

तोफू:  पनीरला पर्याय म्हणून खाल्ला जाणारा तोफू हा सोयाबीन पासून बनवला जातो.  सोयाबीन भिजत घातले जातात. ते चांगले फुगल्यानंतर ते शिजवून त्यातून सोया मिल्क काढले जाते. त्यानंतर त्यामध्ये काही गोष्टी घातल्या जातात. त्यापासून या सोया मिल्कचे घट्ट दह्याच्या गोळ्याप्रमाणे रुपांतर होते. त्याचा उपयोग तोफू म्हणून केला जातो. भारतात याची क्रेझ आता आली असली तरी इतर देशांमध्ये याचे सेवन केले जाते. 

स्वादिष्ट रेसिपीजसाठी घरीच असं तयार करा पनीर

पनीर तोफू काय आहे अधिक चांगले

Instagram

  1. तोफू हे सोयाबीनचा वापर करुन बनवले जाते. त्यामुळे त्यामध्ये असलेले फॅटचे प्रमाण फारच कमी असते. त्यामुळे तुम्हाला पनीरच्या तुलनेत अधिक प्रमाणात प्रोटीन मिळतात. एक संपूर्ण प्रोटीन म्हणूनच तोफूची ओळख आहे. त्यामुळे जर तुम्ही आहारात तोफू घेत असाल तर तुमच्या शरीराला आवश्यक असलेली प्रोटीनची कमतरता तोफू भरुन काढते. 
  2. तोफूमध्ये याशिवाय पोटॅशिअम, कॅल्शिअम, कॉपर, आर्यन, फायबर मोठ्या प्रमाणात असते. तुमच्या आरोग्यासाठी त्याचे सेवन फारच चांगले असते. 
  3. पनीरप्रमाणे तोफूही तुम्हाला प्रमाणात खाणे गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तोफू अगदी अर्धीवाटी जरी खाल्ले तरी तुम्हाला आवश्यक असलेल्या कॅलरीज यामधून मिळतात. तोफूमध्ये सॅच्युरेटेड फॅट असते. त्यामुळे तुमचे पोट भरते आणि तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 
  4. महिला आरोग्यासाठीही तोफूचे सेवन खूप चांगले मानले जाते.मेनोपॉझच्या दरम्यान होणाऱ्या अनेक त्रासांना तोफू नियंत्रणात ठेवते.
  5.  या शिवाय किडनीचे आजार, डाएबिटीझ यासारख्या आजारांसाठीही तोफूचे सेवन अत्यंत फायदेशीर आहे. 

त्यामुळे तुम्ही जर तोफू खाण्याचा विचार करत असाल तर  तोफूचा आहारात नक्की समावेश करा.

पनीरच्या शोधाची ही रंजक कहाणी तुम्हाला माहीत आहे का?

Read More From Diet