Jewellery

मोत्याचे दागिने आहेत नववधूसाठी खास | Motyache Dagine Designs

Dipali Naphade  |  Jan 19, 2022
pearl-jewellery-designs-for-bride

कोणत्याही नववधूची खरेदीची यादी ही मोठीच असते. पण त्यात सर्वात जास्त खरेदी करायची असते ती दागिन्यांची. त्यातही जर महाराष्ट्रीयन नववधू असतील तर जसे मराठी उखाणे महत्त्वाचे असतात, तसंच मोत्यांच्या दागिन्यांना (Motyache Dagine) सर्वात जास्त पसंती दिली जाते. मोत्यांच्या दागिन्यांनी (Motyache Dagine) कोणत्याही नववधूच्या सौंदर्यात जी भर पडते ती अगदी सोन्याच्या दागिन्यांनीही येत नाही. सहसा महाराष्ट्रीय लग्नामध्ये सध्या नऊवारी साडी नेसण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यावर मोत्याचे वेगवेगळे दागिने अगदीच शोभून दिसतात. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांवर मोत्याचे हार, मोत्याचे कानातले, मोत्याची अंगठी (Maharashtrian Motyache Dagine) असे दागिने म्हणजे सौंदर्यात भर! इतकंच नाही तर मोत्यांच्या साजात सौंदर्य अधिक खुलून दिसतं. त्यामुळे मोत्यांच्या दागिन्यांना नेहमीच जास्त मागणी असते. अगदी लग्नाचा हंगाम असो वा नसो मोत्यांच्या आकर्षक दागिन्यांची खरेदी नेहमीच केली जाते. कारण कोणत्याही समारंभात हे दागिने तुम्हाला अधिक आकर्षक बनवतात. 

लग्नासाठी मोत्यांच्या दागिन्यांची निवड कशी करावी ?

Motyache Dagine

बरेचदा मोत्यांचे दागिने (motyache dagine) खरेदी करताना नक्की काय करायला हवं किंवा कशा प्रकारे खरेदी करायला हवी याची माहिती नसते. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोत्याचे दागिने (Motyache Dagine) खरेदी करत असताना आपल्याला मोत्यांबद्दल किमान माहिती तरी असायला हवी. आपल्या पिवळा मोती आणि पांढरा मोती असे दोन प्रकार नक्कीच माहीत असतात. पण खरा मोती कोणता याची पारख ही दुकानदारांनाच असते. मोत्यांचे अनेक प्रकार असतात. त्यामध्ये रिअल कल्चर्ड मोती, बसरा मोती, साऊथ सी, फ्रेश वॉटर फॉल, ताहिती सी, व्हेनेझुला, माबे मोती असे मोत्यांचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी बसरा आणि व्हेनेझुला हे दोन्ही मोती समुद्रामध्ये तयार होतात. खरं तर समुद्रात मिळाणारे मोती हे टिकायला जास्त चांगले असतात. शिवाय त्याचा लुकही जास्त आकर्षक असतो. मोत्यांना आकार नसते. ते अजिबातच गोल आकाराचे नसतात. त्यापासून ठराविक दागिनेच वापरले जातात. मोत्याचे वेगवेगळे दागिने असतात. चिंचपेटी, तन्मणी, मोत्याचे हार (Motyachi Maal Jewellery), मोत्याचे कानातले, मोत्याच्या बांगड्या, मोत्याची नथ, कुड्या, मोत्यांची रस, लफा असे ठराविक पण आकर्षक दागिने मोत्यांपासून तयार होतात, जे बघितल्यानंतर तुम्ही ते खरेदी केल्याशिवाय राहूच शकत नाही. या मोत्यांचा रंग मोतिया, पांढरा, करडा आणि खाकी अशा प्रकारांमध्ये असतो. पण खरेदी करताना तुम्हाला नक्की कोणता मोती आहे इतपत विचारण्याइतकी माहिती तरी असायला हवी. प्रत्येक मोती हा वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कोणत्या कपड्यांवर कोणत्या प्रकारचे दागिने घालायचे आहेत हे ठरवून त्याप्रमाणेच मोत्यांच्या दागिन्यांची खरेदी करा. सहसा लग्न समारंभामध्येच मोत्यांचे दागिने जास्त प्रमाणात वापरले जातात. त्यामुळे या ठिकाणी नववधूसाठी मोतिया आणि पांढऱ्या रंगाच्या मोत्यांचा वापर जास्त प्रमाणात करण्यात येतो. मोत्याच्या दागिन्यांचे नक्की कोणते प्रकार आहेत पाहूया. 

मोत्याच्या बांगड्या (Moti bangles)

मोत्याच्या बांगड्या

लग्न असो अथवा साखरपुडा मोत्याची दागिन्यांची (Motyache Dagine) गोष्टच वेगळी आहे. त्यातही नऊवारी साडी असेल तर मोत्याच्या दागिन्यांनी अधिक उठाव येतो. मोत्याच्या बांगड्या या तुमच्या हाताची शोभा वाढविण्यास मदत करतात. विशेषतः नववधूच्या हिरव्या बांगड्यांच्या मध्ये एक एक बारीक मोत्याची बांगडी घातली तर अधिक आकर्षक आणि उठावदार दिसून येते. नववधूच्या हिरव्या बांगड्यांमध्ये मोत्याची एक नाजूक अशी बांगडी मधोमध खूपच सुंदर दिसते. हिरवा रंग आणि मोत्यांचा रंग हे कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसतं. नववधू म्हटल्यानंतर बांगड्या तर हातामध्ये भरभरून हव्यात हे नक्की मग अशावेळी केवळ हिरव्या बांगड्या घालण्यापेक्षा असं कॉम्बिनेशन करून घातलेल्या बांगड्या या अधिक सुंदर दिसतात. 

मोत्याचे हार (Moti Haar)

Instagram

बनारसी साडी असेल अथवा कांजीवरम साडी तुम्ही लग्नामध्ये नेसणार असाल तर मोत्याचा मोठा हार तुमच्या गळ्याची शोभा अधिक वाढविण्यास मदत करतो. मोतीहार म्हणजे एकसर अथवा दोन सर असणारा हा हार तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमासाठी अथवा तुमच्या नेहमीच्या पेहरावावरही वापरता येतो. हा दिसायला नाजूक असल्याने साहजिकच समोरच्या व्यक्तीचं तुमच्या गळ्याकडे आपोआप लक्ष जातं आणि तुमच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. तर काही वेळा लांब मोत्याच्या हाराचे डिझाईनही साड्यांवर शोभून दिसतात. 

मोत्याची माळ (Motyachi Maal Jewellery)

Motyachi Maal Jewellery

अत्यंत नाजूक असा दागिना आणि तुम्हाला तितकाच साडी अथवा कोणत्याही कपड्यांवर आकर्षक दाखविण्यासाठी हा दागिने उत्तम ठरतो. पांढऱ्या रंगाची सुंदर ओवलेली एकसर मोत्याची माळ ही कोणालाही आकर्षित करते. सहसा पांढऱ्या कपड्यांवर ही अधिक सुंदर दिसते. केवळ लग्नातच नाही तर तुम्ही ऑफिसच्या मीटिंग्ज असतील अथवा कोणत्याही अन्य कार्यक्रमांमध्येही ही मोत्याची माळ वापरू शकता. पांढरा मोती असो अथवा पिवळा मोती असो दोन्हीची ही एकसर माळ अधिक उठावदार दिसते. 

मोत्याची नथ (Pearl Nath)

Instagram

महाराष्ट्रीयन लग्न हे नथीशिवाय पूर्ण होतच नाही. नथीचा तोराच वेगळा आहे. त्यातही ही नथ मोत्याची असेल तर सोने पे सुहागा. नथीशिवाय तर कोणतंही महाराष्ट्रीयन लग्न पूर्ण होत नाही. आता हा नथीचा ट्रेंड इतर लग्नांमध्येही दिसू लागला आहे. नववधू नेहमीच मोत्याची नथ घालण्याला प्राधान्य देतात. कारण लग्नाच्या साडीवर ही नथ अधिक आकर्षक दिसते आणि शोभून दिसते. त्यामुळे मोत्याची नथ घालून साजश्रृंगार करण्याची मजाच काही और आहे. काही जणी तर लग्नामध्ये आपल्या आई – आजीकडून पूर्वपरंपरागत आलेल्या नथीचाही वापर करतात. या अस्सल मोत्याच्या नथी अत्यंत मोठ्या असून संपूर्ण नाक भारून टाकतात. मात्र दिसायला खूपच सुंदर दिसतात. 

मोत्याचे कानातले (Pearl Earrings)

मोत्याचे कानातले

मोत्याचे कानातले म्हटले की सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती म्हणजे मोत्याची कुडी. मोत्याची कुडी ही अगदी आपल्याकडे पूर्वपरंपरागत चालत आलेला दागिना (Motyache Dagine) आहे. पूर्वी या मोत्याच्या कुड्या सर्रास वापरात होत्या. पण आजही त्याचा ट्रेंड कायम आहे. नऊवारी साडी नेसल्यानंतर कानात कुड्या घालणं अतिशय सुंदर दिसतात. केवळ नऊवारी साडीच नाही तर अगदी पाचवारी साडीवरही नाजूक आणि आकर्षक कुड्या अतिशय सुंदर दिसतात. प्रत्येक महिलेकडे मोत्याची कुडी हा मोत्याच्या कानातल्यांचा एक प्रकार नक्कीच असतो. याशिवाय वेगवेगळ्या डिझाईन्सचे मोत्याचे कानातले बाजारामध्ये मिळतातच. विशेषतः लाल खडा गुंफलेले मोरांच्या डिझाईन्समधील मोत्याचे कानातले अधिक आकर्षित करतात. 

मोत्याची अंगठी (Pearl Rings)

मोत्याचे दागिने (Motyache Dagine) घातल्यानंतर तुमच्या बोटात मोत्याची नाजूक अंगठीदेखील सुंदर दिसते. फक्त तुम्ही ही अंगठी निवडताना त्याचे मोती लहान आहेत की नाही ते व्यवस्थित पाहून घ्या. कारण मोठ्या मोत्यांची अंगठी ही थोडी भपकेबाज वाटते. पण तुमची अंगकाठी मोठी असेल तर अशा तऱ्हेची अंगठीदेखील तुम्हाला शोभून दिसते. केरळा अथवा कांजीवरम साड्यांवर ही मोत्याची अंगठी अधिक सुंदर दिसते. 

मोत्याचे वेगवेगळे दागिने

Instagram

याशिवाय मोत्याचे अनेक वेगवेगळे दागिने आहेत. यामध्ये तन्मणी (Tanmani), तोडे (Tode), बाजूबंद (Bajuband), मोती चोकर (Moti Choker), मोठे नेकलेस (Big necklace) यांचा समावेश आहे. तन्मणी हा प्रत्येकीचा आवडता आणि पारंपरिक दागिना आहे. तन्मणी घातल्याशिवाय कोणताही सणसमारंभ पूर्ण होत नाही. तन्मणीमध्येही अनेक प्रकार असतात. पिवळी, गुलाबी, पांढरा अशा सगळ्या मोत्यांचे तन्मणी तुम्हाला मिळतात. तसंच एकसर, तीनसर असे विविध तन्मणी उपलब्ध असतात. अगदी कुरत्यांपासून ते साडीपर्यंत सर्व कपड्यांवर तुम्हाला तन्मणीचा वापर करता येतो. 

तर बांगड्यांसह मोत्याचे तोडेही अतिशय सुंदर दिसतात. तुम्ही हिरव्या बांगड्या भरून मध्ये मोत्याच्या बांगड्या आणि त्यानंतर अगदी हाताच्या पुढे मोत्याचे तोडे घातलेत तर तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडते. मोत्याचे तोडे विविध डिझाईन्सध्ये उपलब्ध आहेत. तुमच्या नववधूचा लुक हे मोत्याचे तोडे कम्प्लिट करतात.

याशिवाय आजकाल चोकरचा ट्रेंड चालू आहे. मोत्यांमध्येही अनेक डिझाईन्सचे चोकर्स तुम्हाला बाजारात पाहायला मिळतात. अगदी वेगवेगळ्या लहान डाळिंंबी रंगाच्या खड्यांपासून ते हिरव्या आणि जांभळ्या खड्यांचे तसंच पांढऱ्या आणि पिवळसर रंगाच्या मोत्यांचा चोकर हा दिसायला अप्रतिम दिसतो. त्याशिवाय तुमच्या मॉडर्न कपड्यांवरही याचा तुम्हाला वापर करून घेता येतो. त्यासाठी तुम्ही पारंपरिक कपडे घालायलाच हवेत असं काही नाही.  

सोन्याचा भाव अक्षरशः गगनाला भिडला आहे असं म्हणावं लागेल. लग्नामध्ये बाजूबंद सोनं आणि मोत्यांचं मिक्स्चर करून घेतले तर अधिक सुंदर दिसतात. यामध्ये मध्यभागी वेगवेगळ्या रंगाचे खडे आणि इतर दोन ते तीन मोत्यांच्या सरी तुमच्या हातांच्या दंडावर अधिक शोभून दिसतात. तसंच यामध्ये अधिक व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते. त्यामुळे नववधू हल्ली मोत्यांचे बाजूबंद घालण्याला अधिक प्राधान्य देतात. 

मोत्याच्या दागिन्यांची अशी घ्या काळजी (How To Take Care Of Pearl)

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. मोत्याचे दागिने किती काळ टिकतात?
मोत्याचे दागिने खूप काळ टिकतात. मात्र तुम्हाला त्या दागिन्यांची व्यवस्थित काळजी घेता यायला हवी. आम्ही वर दिल्याप्रमाणे तुम्ही काळजी घेतली तरी नक्कीच अधिक काळ मोत्याचे दागिने (motyache dagine) टिकण्यास मदत होईल. 

2. मोत्यांचे किती प्रकार असतात?
मोत्यांचे अनेक प्रकार असतात. यामध्ये रिअल कल्चर्ड मोती, हाफ पर्ल, माबे पर्ल, फ्रेशवॉटर पर्ल, साऊथ सी, ताहिती सी असे विविध प्रकार दिसून येतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे निवड करून याचे दागिने बनवा. 

3. सोन्याच्या दागिन्यांसह मोत्याचे दागिने कसे मॅच करावे?
सोन्याच्या दागिन्यांसोबत मोत्यांचे दागिने घालत असाल तर त्यासाठी तुमचे मोती हे पिवळसर रंगाचे असायला हवेत हे लक्षात घ्या. मोती हा मुळातच सुंदर असतो. त्यामुळे लेसचे डिझाईन असलेले कपडे, पारंपरिक नववधूचे कपडे, जरदोसी, जाड अथवा बारीक काठापदराची साडी या सगळ्यांवर हे मोत्यांचे दागिने सोन्याच्या दागिन्यांसह उठून दिसतात. 

Read More From Jewellery