DIY सौंदर्य

म्हणून पावसाळ्यात नियमित करायला हवे पेडिक्युअर

Leenal Gawade  |  Jun 30, 2019
म्हणून पावसाळ्यात नियमित करायला हवे पेडिक्युअर

सुखद असा पावसाळा आला की, मस्त पिकनिकचा बेत आखला जातो. बाहेर फिरताना फार काही जाणवत नाही. पण बाहेरुन आल्यानंतर पावसाच्या पाण्यात भिजून तुमचे पाय खराब होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी जर तुम्ही पायांची काळजी नीट घेतली नाही तर पायाला जखमा देखील होऊ शकतात,नखं तुटू शकतात, पायांना भेगा पडू शकतात. तुमच्या कोमल मुलायम पायांना तुम्हाला काहीच होऊ द्यायचे नसेल तर तुम्हाला या दिवसात हमखास पेडिक्युअर करुन घ्यायला हवे. तरच तुमचे पाय पावसाळ्यातही अगदी सुंदर राहतील. पावसाळ्यात पाय स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी पेडिक्युअर करण्याच्या टीप्स

पावसाळ्यात मधुमेहींनी पायांची घ्यावी अशी काळजी

पावसाळ्यात होऊ शकतो हा त्रास

shutterstock

पावसाळ्यात पेडिक्युअर करण्याची गरज काय असे तुम्हाला वाटत असेल तर या गोष्टी नक्की वाचा 

माती आणि घाण:पावसाच्या पाण्यातून प्रवास करताना तुमच्या नखांमध्ये माती, घाण अडकून राहते.ती योग्यवेळी काढली नाही तर तुमच्या पायांना कोर होण्याची शक्यता असते. पावसात हा त्रास खूप जणांना होतो.अंगठ्याच्या नखाचा आजूबाजूचा परीसर ठुसठुसायला लागतो. 

पाय फुगणे: जास्त वेळ पाय पाण्यात राहिला तर पायाची त्वचा पांढरी पडते.जर याकडे दुर्लक्ष केले तर पाय दुखू लागतात.पायाला साधा धक्का लागता तरी पायाची त्वचा जळजळू लागते. 

नख तुटणे: जर तुम्हाला नख लांब वाढवण्याची सवय असेल तर या दिवसात नखं न वाढवणेच उत्तम. जर तुम्ही सतत प्रवास करत असाल किंवा तुम्हाला पावसाळी चपलांमधून पाय काढणे शक्य नसेल अशावेळी मात्र तुमची नखं नरम पडतात. काहींना नख दुखण्याचाही त्रास होऊ लागतो. 

टाचा फुटणे: पावसाळ्यात सर्वाधिक होणारा त्रास म्हणजे टाचा फुटण्याचा. अनेकांना हा त्रास होतो. जास्त वेळ पाण्यात पाय राहिल्यामुळे टाचा फुटतात. या टाचांमध्ये जर घाण साचली तर त्याचा अधिक त्रास तुम्हाला होऊ शकतो. या टाचांमध्ये घाण साचून टाचा सारख्या दुखण्याच्या अनेकांच्या तक्रारी असतात.

मुलायम कोमल पायांसाठी करा हे घरगुती उपाय

घरच्या घरी असे करा पेडिक्युअर

shutterstock

झाले तुमचे सोप्यात सोपे पेडिक्युअर करुन. यासाठी तुम्हाला पार्लरला जाण्याची आवश्यकता नाही

पायाच्या दुर्गंधीपासून मिळवा सुटका, करा सोपे उपाय

हे ही असू द्या लक्षात

shutterstock

  1. पावसात पेडिक्युअर करताना तुम्ही तुमच्या पायांना जखमा होऊ देऊ नका. कारण पावसाळ्यात पाण्यावाटे अनेक आजार पसरण्याची भीती असते. त्यामुळे जखमांमधून पावसाचे अस्वच्छ पाणी शिरणे चांगले नाही. 
  2. जर तुम्हाला पेडिक्युअर करणे  शक्य नसेल तर तुम्ही किमान तुमच्या पायांना उब मिळावी यासाठी तेलाने मसाज करा. खोबरेल तेलाचा वापर केला तरी चालेल. 
  3. महिन्यातून दोनदा तरी पेडिक्युअर कराच. पण जर नखांमध्ये खूपच घाण साचली असेल तर मात्र थोडी जास्त काळजी घेणे आवश्यक असते. 

बद्दल वाचा – पाय समस्या 

Read More From DIY सौंदर्य