DIY फॅशन

सैल कुडत्याचे परफेक्ट अल्ट्रेशन करण्याची योग्य पद्धत

Leenal Gawade  |  Oct 28, 2020
सैल कुडत्याचे परफेक्ट अल्ट्रेशन करण्याची योग्य पद्धत

ऑनलाईन शॉपिंग करण्याचा मोह काही केल्या आवरता येत नाही. पण कधी ऑनलाईन मागवलेले कुडते किंवा ड्रेस परफेक्ट फिट होतीलच असे सांगता येत नाही. एखादा कुडता आपल्याला एवढा आवडतो की, तो परत करावासा वाटत नाही. अगदी थोडेसे अल्ट्रेशन करुन तो वापरु शकतो असे आपल्याला वाटते. पण अल्ट्रेशन करणारी व्यक्ती योग्य नसेल तर मात्र तुम्ही कितीही चांगला आणि महागडा कुडता आणला तरी त्याचा लुक एका कात्रीत वाया जाऊ शकतो. म्हणून अल्टर करताना तुम्ही नेमके अल्ट्रेशन कसे करायला हवे हे जाणून घेणे गरजेचे आहे. जाणून घेऊया अल्ट्रेशन करण्याची योग्य पद्धत

घरीच सोप्या पद्धतीने ड्रेप करा साडी आणि मिळवा #fusionlook

कुडता बघा घालून

Instagram

एखादा कुडता किंवा ड्रेस तुम्ही आधी घालून बघा. त्या ड्रेसच्या फिटींगनुसार तो तुम्हाला  कुठे सैल आणि कुठे घट्ट होतो ते तपासा. अनेकदा कुडते हे खांदा, कंबर आणि कंबरेच्या खाली नितंबाकडे सैल असतात.  या शिवाय जर तुमच्या कुडत्याची लांबी किती आहे ते देखील तपासा. कुडता घातल्याशिवाय त्याचे अल्ट्रेशन कसे करायचे हे मुळीच करणार नाही. त्यामुळे तुम्ही आधी कुडता घालून त्याचे व्यवस्थित माप घ्या. 

साड्यांवर ऑफशोल्डर ब्लाऊज निवडताना

असे करा अल्ट्रेशन

Instagram

आता कुडता घालून पाहिल्यानंतर तुम्ही अल्ट्रेशन करायचे नक्की केले असेल तर तुम्ही या पद्धतीने अल्ट्रेशन करु शकता. 

 टक्स येतील कामी 

अनेकदा कुडते हे मागून उचलल्यासारखे होतात. कंबरेकडून अल्टर केल्यानंतरही त्याची पाठीवर फिटिंग चांगली दिसतेच असे नाही.अशावेळी कुडत्याला योग्य आकार येण्यासाठी आणि तुमच्या शरीरावर उठून दिसण्यासाठी तुम्ही कुडत्याला पाठीमागे दोन टक्स घालायला सांगा. पाठीचा खाला भाग आणि कंबरेकडे टक्स घातल्यामुळे तुमच्या कंबरेला चांगला शेप मिळतो. जर कुडता पाठीमागून वर जात असेल तर तुम्ही फक्त टक्सच्या मदतीने अल्टर करु शकता. 

बाह्यांना द्या आकार 

बरेचदा मापानुसार कुडता घेतला तरी स्लिव्हलेसकडील भाग सैल असण्याची शक्यता असते. बाह्यांकडील भाग सैल असेल तर तेथील भाग अजिबात चांगला दिसत नाही. अशावेळी तुम्ही फक्त बाह्यांकडील भाग मशीनने दाबून घ्या. त्यानुसार छाती आणि कंबरेकडील फिटिंग करु नका. कुडत्याची ही फिटिंग तुम्हाला मग परफेक्ट दिसेल. 

साईड कट फिटिंग करताना 

 साईड कट फिटिंग ही सगळ्यात जास्त महत्वाची असते. जर तुम्ही ही फिटिंग करण्याचा विचार करत असाल तर हा भाग अल्टर करणे सगळ्यात जास्त कठीण असते. असा कुडता तुम्हाला आतून शिलाई घालून अल्टर करता येत नाही हे करण्यासाठी तुम्हाला कुडता पूर्ण किंवा कंबरेपर्यंत उघडावा लागतो. त्यानंर योग्य माप घेऊन मग कुडत्याचा कट ठरवून त्यानुसार त्याची शिलाई करावी लागते. कुडत्याच्या इतर अल्ट्रेशनच्या तुलनेत हे अल्ट्रेशन कठीण असते. 

आता तुम्ही अल्ट्रेशन करणार असाल तर तुम्ही या गोष्टी जाणून घेत योग्य पद्धतीने अल्ट्रेशन करा. 

यंदाच्या फेस्टिव्ह सीझनसाठी परफेक्ट आहेत हे #Traditionalwear

 

 

Read More From DIY फॅशन