प्रवासात असताना सुंदर फोटो यावे असे सगळ्यांना वाटते. पण खूप वेळा बदललेेले आणि खाणे या दोन्हीचा परिणाम चेहऱ्यावर होऊ लागतो. चेहऱ्यावर पिंपल्स या दिवसात येऊ नये असे खूप जणांना वाटते. पण असे पिंपल्स आल्यावर मूड खराब न करता जर तुम्ही काही सोप्या आयडियाज वापरल्या तर तुमचा प्रवास हा चिडचिड न करता होईल. बाजारात पिंपल्स घालवण्यासाठी अनेक ऑईन्मेंट मिळत असतील पण ते प्रवासात लावता येत नाही. विशेष म्हणजे ते टिकत नाही. अशावेळी पिंपल्स पॅच चांगलेच कामी येतात. पिपंल्स न पसरता जागच्या जागी सुकण्यासाठी ते मदत करतात. चेहऱ्यावरील मुरुम घालवण्यासाठी उपाय बरेच आहेत ते देखील तुम्ही ट्राय करु शकता
पिंपल्स पॅच
पिंपल्स पॅच हे गोलाकार आकाराचे असतात. चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्सला कव्हर करण्यासाठी ते फार महत्वाचे असतात. या पिंपल्स पॅचवल सॅलिसिलिक ॲसिड आणि पिंपल्स कमी करणारे ऑईन्मेंट असतात. जे पॅचच्या मदतीने जागच्या जागी राहते. त्यामुळे त्याचा परिणाम हा पिंपल्सवर होतो. एखादा पिंपल जर मोठा होत असेल तर त्याला सुकवण्यासाठी हे पॅच मदत करतात. पिंपल्स न फोडता तुम्ही त्यावर जर थेट पॅच लावला तर तो दुखत नाही, दिसत नाही आणि आपोआप त्याचा आकार लहान होऊ लागतो. साधारण दोन ते तीन दिवसात तो कमी होण्यास नक्कीच मदत मिळते.
पिंपल्स पॅचचा असा करा उपयोग
जर तुम्हाला पिंपल्स आले असतील आणि कुठे बाहेर जायचे असेल तर तुम्ही चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करा. ज्या ठिकाणी तुम्हाला पिंपल्स आलेले आहेत. त्या ठिकाणी योग्य आकाराचा पिंपल्स पॅच लावा. ते लावल्यानंतर तुम्ही चेहऱ्यावर मेकअप देखील करु शकता. त्वचा हायड्रेटिंग करण्यासाठी हायड्रेटिंग फेशिअल देखील ट्राय करु शकता
बरेचदा पिंपल्स आलेल्या चेहऱ्यावर थेट मेकअप केला तर असा पिंपल्स मोठा होण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते. अशावेळी हा पॅच लावल्यानंतर तो भाग कव्हर होतो. त्यावर अगदी हेवी मेकअप करता येतो. विशेष म्हणजे हा पॅच तुमच्या चेहऱ्यावर मुळीच दिसून येत नाही. त्यामुळे त्याचा असाही फायदा होतो.
पिंपल्स पॅच कधी काढावे
तुम्ही कोणत्या कंपनीचे पिंपल्स पॅच वापरत आहात त्यावर काही गोष्टी अवलंबून असतात. प्रत्येक कंपनीने बनवलेल्या पॅचेसमध्ये असलेले त्याचे प्रमाण हे वेगवेगळे असते. त्यावर लिहिलेल्या सुचनेनुसार तुम्हाला त्याचा वापर करायचा असतो. साधारणपणे पिंपल्स पॅच हा लावल्यानंतर तो एकदम पांढरा झाल्यावर काढायचा असतो. चेहऱ्यावर लावल्यानंतर जर तो एकदम पांढरा पडला की, मग तुम्ही तो काढून टाकायला काहीच हरकत नाही.
कॅरी करा पिंपल्स पॅच
तुम्हाला जर कुठे बाहेर किंवा आऊटिंगला जायचे असेल त्यावेळी तुमच्या स्किनकेअरसोबत तुम्ही हे पिंपल्स पॅच कॅरी करा. तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स यायला सुरुवात होतेय असे वाटत असेल तर तुम्ही लगेच हे पॅच चेहऱ्याला लावा. हे कॅरी करणे फारच सोपे असते. शिवाय त्यामध्ये हायजिन राखले जाते त्यामुळे ते कुठेही नेणे सोपे पडते.
आता तुम्हालाही पिंपल्सचा त्रास होत असेल तर तुम्ही पिंपल्स पॅच नक्की ट्राय करा.
अधिक वाचा
फेशिअलनंतर कधीच करू नका या चुका, त्वचेचं होईल नुकसान
तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे खरंच येतात का पिंपल्स, जाणून घ्या सत्य