DIY फॅशन

बंधेज साडी देते रॉयल लुक, दिसाल अधिक उठावदार आणि आकर्षक

Dipali Naphade  |  Feb 18, 2021
बंधेज साडी देते रॉयल लुक, दिसाल अधिक उठावदार आणि आकर्षक

 

 

साडी म्हटलं की आपल्याकडे वेगवेगळे प्रकार असतात. प्रत्येक कार्यक्रमासाठी एक वेगळी साडी म्हटली तरी अनेक साडीचे प्रकार आपल्याकडे मिळू शकतात. आजकाल लग्नांमध्ये नेहमीच्या पारंपरिक साड्या नेसण्यापेक्षा वेगळ्या आणि पारंपरिक आणि आधुनिक लुक देणाऱ्या साड्यांना अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये राजस्थान आणि गुजरातची रॉयल बंधेज साडी सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे. बंधेज साडी तुम्हाला रॉयल लुक देते आणि तुम्ही अधिक उठावदार आणि आकर्षकही दिसता. बांधेज अर्थात बांधणी साड्यांमध्येही खूपच विविधता आहे. मुळात या साड्या अगदी कमी किमतीपासून ते महाग अशा स्वरूपात मिळतात. त्यामुळे कोणत्याही वर्गातील महिलांना या साड्या विकत घेणे सोपे होते. तसंच याचा लुक अधिक रॉयल असल्यामुळे एखाद्या साडीची किंमत कमी असली तरीही ती जाणवत नाही. परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ घालत बांधेज साड्यांचा अप्रतिम लुक तुम्हाला नक्कीच हवाहवासा वाटेल. तुम्हालाही कोणत्या कार्यक्रमांना जायचे असेल तर तुम्ही या बंधेज साड्यांचा विचार नक्की करू शकता.

जॉर्जेट बंधेज

Instagram

 

बंधेज साड्यांमध्येही अनेक प्रकार आहेत. कोणत्याही पार्टी अथवा घरातील कार्यक्रमांना तुम्ही अशा बंधेज साड्यांची निवड करू शकता. गुलाबी, पिवळी, लाल, हिरवी अशा रंगाच्या अथवा मिश्र रंगाच्या या जॉर्जेटच्या बंधेज साड्या (Georgette Bandhej) तुमचे सौंदर्य वाढविण्यास अधिक उपयोगी ठरतात. सहसा यावर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातला तर दिसायला अधिक चांगले दिसते. कोणत्याही ठिकाणी तुम्ही ही साडी नेसून जाऊ शकता. कारण ही साडी सावरायला हलकी असते आणि दिसायला अधिक रॉयल आणि भारदस्त दिसते.

रॉयल बंधेज

Instagram

 

डोळा डिझाईन असणारी रॉयल बंधेज (Royal Bandhej) साडी ही अप्रतिम असते. बांधणी प्रिंट असून ही साडी सिल्क मटेरियलमध्ये असते. ही साडी भारदस्त असून या साडीचे वजनही जास्त असते. या साडीला बऱ्यापैकी टसल लावण्यात येत असून या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व साड्या गडद रंगाच्या असतात. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात या साड्या अधिक उठावदार दिसतात. अधिक रॉयल दिसत असल्यामुळेच याला रॉयल असे नाव देण्यात आले असावे. यामध्ये पारंपरिकता आणि आधुनिकता या डिझाईन्सचा मेळ घातलेला दिसून येतो.

ब्रायडल आऊटफिटसाठी बनारसी साडी आहे उत्तम पर्याय

जयपुरी बंधेज

Instagram

 

जयपुरी बंधेज (Jaipuri Bandhej) साड्यांचा ट्रेंड सध्या वाढतोय. राजस्थानातील जयपुरमधील बंधेज हे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. हे नैसर्गिक रंगांनी कॉटनच्या कपड्यांवर करण्यात येते. या कपड्यांवर ब्लॉक्स करण्यात येतात. पहिले ब्लॉक प्रिंटच्या चादर असायच्या. मग नंतर हे कामकाज कुडत्यांवर दिसू लागते आणि आता याचा ट्रेंड साड्यांमध्येही आला आहे. ब्लॉक प्रिंटच्या साड्या दिसायला खूपच सुंदर दिसतात. मुळात या हलक्या असतात आणि किंमतदेखील खिशाला परवडणारी असते. त्यामुळे याची खरेदी आजकाल जास्त प्रमाणात दिसून येते.

जयपूर साड्यांचा वाढता ट्रेंड, आकर्षक आणि अप्रतिम साड्या

गोटा वर्क बंधेज

 

गोटा वर्क बंधेज (Gota Work Bandhej) साड्या या साधारणतः नेटमध्ये जास्त प्रमाणात दिसतात. या साड्यांवर बंधेजचे गोटावर्क हे बॉर्डर आणि गोट्याला मॅचिंग असेल करण्यात आलेले असता. तसंच बंधेज ब्लाऊज यावर अधिक चांगला आणि आकर्षित दिसतो. ही साडी तुम्ही अगदी रोजच्या वापरातही नेसू शकता. तसंच कार्यक्रमांना नेसू शकता. याची किंमत जास्त नसते. काही साड्या महाग असतात. पण तुमच्या खिशाला परवडतील अशा साड्या तुम्हाला या डिझाईनमध्ये मिळतात.

मिरर वर्क बंधेज

 

सध्या मिरर वर्क बंधेज (Mirror Work Bandhej) साड्यांचाही चांगलाच ट्रेंड आहे. विशेषतः तरूणाईमध्ये या साड्या जास्त दिसून येतात. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना अशा साड्या जास्त प्रमाणात आवडतात. मिरर वर्क साड्या या जास्त भारदस्त नसतात. तर सांभाळायलाही सोप्या असतात. तसंच दिसायला या साड्या अधिक आकर्षक आणि उठावदार दिसतात. त्यामुळे या साड्यांना अधिक मागणी आहे.

सेलिब्रिटींची पसंती ठरतेय महाराष्ट्रीयन खणाची साडी

गाजी सिल्क बंधेज साडी (Gaji Silk Bandhej)

गाजी सिल्क साडी ही अगदी नववधूही नेसू शकतात. या बांधणी प्रिंटच्या साड्या अधिक भरलेल्या आणि सुंदर नक्षीकाम असणाऱ्या असून अगदी भरीव असतात. त्यामुळे या अधिक उठावदार दिसतात. तसंच या साड्या नेसायला जितक्या जड असतात तितकाच त्याचा लुकही भारदस्त दिसतो. तुम्हाला जर कोणत्याही कार्यक्रमात सर्वात जास्त आकर्षक दिसायचे असेल तर गाजी सिल्क बंधेज साडी हा उत्तम पर्याय आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन