लाईफस्टाईल

मनातील भावना अशा करा व्यक्त, दुःखी मनाचे स्टेटस (Sad Status In Marathi)

Trupti Paradkar  |  May 24, 2021
Sad Status In Marathi

 

जीवनात सुखदुःखाचे प्रसंग प्रत्येकाच्या वाट्याला येतात. मग ती व्यक्ती कोणीही असो गरीब अथवा श्रीमंत, लहान अथवा मोठी… सुखाच्या प्रसंगात जशी झालेला आनंद वाटण्यासाठी मित्रमंडळी, नातेवाईकांची गरज असते. तशीच दुःखाच्या प्रसंगी देखील मन हलकं करण्यासाठीही जिवाभावाच्या लोकांची गरज असते. कधी अपयशी झाल्यामुळे, कधी प्रेमभंग झाल्यामुळे, कधी नातेसंबंधात दूरावा आल्यामुळे तर कधी अचानक आलेल्या एखाद्या अवघड प्रसंगामुळे मन दुःखी आणि उदास होत असते. अशावेळी मनातील दुःखद भावनांना वाट मोकळी करण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाचा आधार घेऊ शकता. जरी लॉकडाऊनमुळे तुम्हाला कोणाला भेटून  तुमचे मन मोकळे करता नाही आले तरी तुम्ही सोशल मीडियावर स्टेटस अपडेट करून तुमच्या मनात चाललेली घालमेळ लोकांसमोर मांडू शकता. मनातील भावना व्हॉट्सअॅप, फेसबूक, इन्स्टाग्राम अथवा मेसेजमधून व्यक्त करण्यासाठी बेस्ट आहेत हे दुःखद मनःस्थितीतील स्टेटस (Marathi Sad Status)

दुःखी मनाचे स्टेटस (Sad Status In Marathi)

Sad Status In Marathi

दुःखद मनःस्थितीत मनात येणाऱ्या भावना कोणतीतरी समजून घ्याव्या असंच प्रत्येकाला वाटत असतं. अशा मनःस्थितीत तुमची जिवाभावाची, तुमच्यावर खरे प्रेम करणारी माणसंच तुम्हाला समजून घेतात. यासाठीच या मनःस्थितीत तणावातून बाहेर काढण्यासाठी स्टेटस तुम्हाला व्यक्त होण्यासाठी हे सॅड स्टेटस नक्कीच उपयोगी ठरतील.

1. रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर फक्त रक्तच बाहेर येतं पण अश्रूंना बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावं लागतं

2. मी सुद्धा आज तुझ्या इतकाच नशीबवान असतो जर तिला प्रेम आणि पैशांतील फरक समजला असता

3. माणसांवर जेवढं प्रेम करावे तेवढे ते दूर जातात

4. लोक म्हणतात एवढं काय असतं प्रेमात, मी म्हणतो एकदा करून बघा  काय नसतं प्रेमात

5. सूर्यासारखं चमकण्यासाठी सूर्यासारखं तापावं लागतं

6. जखम करणारा विसरून जातो पण जखम ज्याला झाली तो कधीच विसरत नाही

7. ती  गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, प्रेमाच्या विरहात माझ्या मनात मात्र तो सतत हेलकावत होता

8. कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं

9. माझ्या आयुष्याच्या गणितात दुःखाचा हिशोब अगदी रास्त होता कारण होरपळलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात तुझाच वाटा जास्त होता

10. अजून किती तुकडे करणार आहे या तुटलेल्या मनाचे, जेव्हा थकशील तेव्हा एवढंच सांग काय चूक होती माझी

एकटेपणात आधार देतील असे कोट्स आणि स्टेटस

सॅड कोट्स मराठीतून (Sad Quotes In Marathi)

Sad Quotes In Marathi

इन्स्टाग्राम, फेसबूक, व्हॉटस्अप अशा सोशल मीडियावर स्टेटस अपडेट करण्याचा सध्या ट्रेंड आहे. अशा माध्यमांवर स्टेटस अपडेट करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत बेस्ट सॅड कोट्स शेअर करत आहोत.

1. आत्मविश्वाला तडा गेल्यावर कोणताच मार्ग उरत नाही, सगळीकडे अंधार मग प्रकाश कुठेच राहत नाही

2. जीवनात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक वेळ आणि दुसरे प्रेम… पण वेळ कोणाचाही नसतो आणि प्रेम सर्वांना मिळेलच असं नाही

3. काही लोक ठेच लागल्यावर बसतात तर काही लोक ठेच लागल्यावरच ध्येय गाठतात

4. आयुष्यात प्रत्येकालाच दुसरी संधी मिळेल असं नाही म्हणून मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घ्या

5. आपल्यामुळे नाही तर कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे

6. उपेक्षित मी या जगाला, वेगळी ओळख माझ्या जगण्याला

7. एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे, सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुःख तेवढे वजा आहे

8. जे नशीबात नव्हते तेच मी मागितले, म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले

9. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे सादाविना कळावे संगीत लोचनांचे

10. तळमळतो मी इथे तुझ्याविण शून्य जाहले अवघे जीवन

वाचा – ब्रेकअप शायरी (Breakup Shayari Marathi)

प्रेमभावना व्यक्त करणारे सॅड स्टेटस (Love Sad Status In Marathi)

Love Sad Status In Marathi

 

प्रेम ही एक नाजूक आणि आनंददायी भावना आहे. पण प्रत्येकाला खरे प्रेम मिळेलच असं नाही अनेकांना प्रेमभंगालाही सामोरं जावं लागतं. प्रेमात अपयश आल्यावर तुमच्या मनातील भावना व्यक्त करा या सॅड स्टेटसमधून

1. तू दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले, जग कसे असते शेवटी तूच मला दाखवले

2. जवळीक साधून माझ्याशी कशी किमया केलीस, वेड लावून मला माझ्या आयुष्यातून का गेलीस

3. मला माहीत होतं तू मागे वळून पाहशील, मागे वळून पाहण्याइतकी तू नक्कीच माझी असशील

4. ठाऊक असतं तुझं येणं अशक्य आहे, तरी मन तुझी वाट पाहणं सोडत नाही, मी ही म्हणतो मग, जाऊ दे मी त्याचं मन मोडत नाही

5. नेमका जो विषय टाळायचा तोच आपण काढतो आणि वादाच्या रूपाने का होईना पुन्हा भेटण्यासाठी वेळ काढतो

6. तू समोर असलीच की नुसतं तुला बघणं होतं आणि तू जवळ नसताना तुझ्या सोबत जगणं होतं

7. तू  गेल्यावर वाटत खूप काही सांगायचं होतं, तू खूप दिलं तरी आणखी मागायचं होतं

8. ओठात गुदमरलेले शब्द अलगद डोळ्यांकडे वळले, पापण्या जरा थरथरल्या म्हणून गुपित तुला कळले

9. तू सोबत असलीस की मला माझाही आधार लागत नाही, तू फक्त सोबत राहा मी दुसरं काहीच मागत नाही

10. तुझ्या माझ्यातलं अंतर सुद्धा तुझ्या माझ्यातला दुवा आहे, ही माझी कल्पना  नाही हा माझा दावा आहे.

यासोबतच वाचा प्रेमात पडलेल्या सर्वांसाठी मराठी लव्ह कोट्स (Love Quotes In Marathi)

वाचा – खास मित्रांसाठी  मिस यू स्टेटस

 

ह्रदयस्पर्शी दुःखद विचार मराठीतून (Sad Thoughts In Marathi)

Sad Thoughts In Marathi

 

जेव्हा अपयश अथवा दुःखद परिस्थिती येते तेव्हा मनात येतात मनाला हेलकावून टाकणारे ह्रदयस्पर्शी विचार…. असे दुःखद मनःस्थितीतील विचार तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि भावनांना मोकळं करा.

1. इथे वेडे असण्याचे खूप फायदे आहेत शहाण्यासाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत

2. कापरासारखं जळणं मला कधीच पटत नाही, तसं जळण्यास माझी ना नाही, पण शेवटी काहीच उरत नाही

3. मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा, वाळकं पान सुद्धा गळताना तन्मयेतेने पाहणारा

4. नेहमीच डोक्याने विचार करू नये कधीतरी भावनांनाही वाव द्यावा, आसुसलेल्या डोळ्याना कधी तरी स्वप्नांचा गाव द्यावा

5. माझ्या हसण्यावर जाऊ नका, माझ्या रूसण्यावर जाऊ नका, जरी तुमच्यात मी असलो तरी माझ्या असण्यावर जाऊ नका

6. मिठी या शब्दात केवढी मिठास आहे, नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे

7. रस्ता बघून चल, नाहीतर एक दिवस  असा येईल की वाटेतील मुके दगडही प्रश्न विचारू लागतील

8. हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला

9. वावटळ आठवणींचे आज मी पाहिले, स्वप्नातील घर तुझे माझे आज पुन्हा एकदा त्यात वाहिले

10. आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही

आयुष्याला नवी प्रेरणा देणारे ह्रदयस्पर्शी कोट्स (Heart Touching Love Quotes In Marathi)

 

दुःखी मेसेज मराठीतून (Sad Messages In Marathi)

Sad Messages In Marathi

 

मनाला दुःख झाल्यावर विशेषतः प्रेमात अपयश आल्यावर आपल्या मनातील भावना समोरच्या व्यक्तीला समजाव्या असं वाटणं स्वाभाविक आहे. यासाठीच त्या खास व्यक्तीसोबत व्यक्त होण्यासाठी हे खास सॅड मेसेज मराठीतून (Sad Messages In Marathi)

1. काय हवं होतं तिला मला कळलंच नाही, घेऊन गेली ह्रदय, पुढचं मला माहीत नाही

2. किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी पण… शेवटी ती माझ्या भावनांशीच खेळली

3. कोणास दुःखवू नये उगाच गंमत म्हणून कारण त्यामुळे आयुष्यात बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून

4. कोणी कोणासाठी असं फक्त म्हणायचं असतं, मनात मात्र कोपऱ्यात तिच्यासाठी झुरायचं असतं

5. कोण होती ती जी ह्रदयात घर करून गेली, कधी उघडले नाही ते ह्रदयाचे दार उघडून गेली

6. कोणावर इतकं प्रेम करू नका की स्वतःवर प्रेम करायला विसराल

7. कोपरा कोपरा ह्रदयाचा तुझ्या आठवणीने भरला आहे, तरिही माझ्या प्रेमाबद्दल तुला प्रश्न कसा पडला आहे

8. खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच मिळते, त्याचे मोल मात्र ते निसटल्यावर कळते

9. जुळायच्या असतील तर गोष्टी आपोआप जुळतात, जुळवायचं म्हटलं तर तो संसार होतो आणि न जुळवता मिळतो तो सहवास असतो

10. ती आयुष्यात आली नसती तर बरं झालं असतं, कारण आता प्रेम नावाच्या गोष्टीचा तिरस्कार वाटू लागला आहे

वाचा – ब्रेकअप स्टेटस मुलींसाठी (Breakup Status In Marathi For Girl)

मुलींसाठी सॅड कोट्स मराठीतून (Sad Quotes In Marathi For Girl)

Sad Quotes In Marathi For Girl

 

प्रत्येकाला वाटतं प्रेमभंग फक्त मुलींमुळेच होतो पण मुलींनाही बऱ्याचदा या विचित्र परिस्थितीला सामोरं जावं लागतं यासाठी खास मुलींसाठी सॅड कोट्स (Sad Quotes In Marathi For Girl) ज्यामुळे तुमच्या भावनांचा बांध सहज मोकळा होईल.

1. माझ्यासारखा आज तूही अस्वस्थ असशील, रात्रभर नाही पण क्षणभर तरी माझ्यासाठी जागा असशील

2. तू नेहमी बोलायचास की मी तुला माझं  करूनच सोडेन, आज तेच केलंस तुझं केलंस आणि सोडलंस

3. कोसळणारा पाऊस पाहून मला नेहमी प्रश्न पडतो माझं तर ठीक आहे पण हा कोणासाठी रडतो

4. प्रेम तुझं खरं असेल तर जीव तुझ्यावर ओवाळेल तो, स्वतःच्याच भावनांचं मन शेवटी किती मारेल तो

5. सगळ्यांसाठी मी आहे पण… माझ्यासाठी कोणीच नाही

6. जीवनात तुम्हाला कोणी आवडलं तर त्याला आठवणीतच ठेवा, प्रेम करू नका कारण प्रेम संपते पण आठवणी  कधीच संपत नाहीत

7. होईल तुला सख्या रे एक दिवस माझ्या प्रेमाची जाणीव, भ्रमर कुणी जाता हात सोडून भासेल तुला फक्त माझी उणीव

8. आज तुला मी नकोय हे मला कधीच कळलं होतं, तू मला सोडून जाणार आहेस हेच मी आज जाणलं होतं

9. नाती ही झाडांच्या पानांसारखी असतात, एकदा तुटली की त्यांची हिरवळ कायमची निघून जाते

10. कोणी मनासारखं जगत असतं तर कोणी दुसऱ्याचं मन जपून जगत असतं

सॅड व्हॉट्सअॅप स्टेटस मराठीतून (Sad Status For Whatsapp In Marathi)

Sad Status For Whatsapp In Marathi

आजकाल प्रत्येक गोष्ट व्हॉटसअॅपवर स्टेटस ठेवून व्यक्त केली जाते. तुमच्या आयुष्यातील सुखाच्या आणि दुःखाच्या गोष्टी तुम्ही या सॅड व्हॉट्सअॅप स्टेटस (Sad Status For Whatsapp In Marathi) मधून व्यक्त करू शकता. 

1. आयुष्यात स्पेस देणं म्हणजे अथांग सागरात एका छोट्याशा होडीमध्ये बसून आपल्या जहाजाची वाट पाहण्यासारखं आहे

2. अडाणी अशा वेड्याला या  तू कधी समजावशील का, जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का

3. असेच होते म्हणायचे तर अशी अचानक घाबरलीस का, अर्ध्या वाट्यावर जाऊन पुन्हा परत तू आलीस का

4. इतके प्रेम करू नका की प्रेमच जीवन होईल, कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणीच मरण येईल

5. एक गोष्ट मला अजूनही समजली नाही, त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने

6. एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो, तट तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्व जण असतात, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला सोबत हवी असते

7. एकदा फक्त मागे वळून बघ, मी सदैव तुझ्यासाठी असेन

8. एखाद्याला खूप जीव लावून पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळल्याावर जास्त दुःख होतं

9. ओठ जरी माझे मिटलेले होते डोळे मात्र उघडे होते, तू ओठातून फुटणाऱ्या शब्दांची वाट पाहिलीस… पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते

10. ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात, मी बोलतच नाही, डोळ्यात दाटलेले तसेच विरून जातात… पण तिला हे कळतंच नाही

आयुष्यावर आधारित सॅड मराठी स्टेटट (Sad Marathi Status On Life)

Sad Marathi Status On Life

आयुष्यात सुखदुःखाचे प्रसंग प्रत्येकाला सहन करावे लागतात. कारण आयुष्य तुम्हाला या प्रसंगातूनच जीवन कसं जगायचं ते शिकवत असतं यासाठीच आयुष्यावर आधारित हे सॅड स्टेटस  (Sad Marathi Status On Life) नक्की वाचा 

1. तुला काय वाटलं तू सोडून गेलीस तर मी मरून जाईन, अगं तू माणूस आहेस ऑक्सिजन नाही

2. देवाकडे जे जे मागितलं ते सर्व काही मिळालं. पण फक्त तुला मागितलं ते देवाला नाही देता आलं

3. पुन्हा दोन पावलं तुझ्यासोबत चालावसं वाटतंय, आयुष्यभर या आठवणी मनात साठवून ठेवावसं वाटतंय

4. जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला, जग आपोआपच बदलून जाईल

5. जीवनात शांती हवी असेल तर लोकांचे म्हणणे मनाला लावणे सोडून द्या

6. जीवनात कधीच नाराज नका होऊ, काय माहीत तुमच्यासारखे जगणे इतरांसाठी स्वप्न असू शकते. 

7. जीवनात काही निर्णय अत्यंत कठोर आणि अवघड असतात, हेच निर्णय तुमच्या जीवनाची दिशा पलटून टाकतात

8. हिऱ्याची ओळख करायची असेल तर अंधाराची वाट बघा कारण उन्हात काचेचे तुकडेही चमकतात

9. जीवनात तुम्ही कधी चूक नाही केली तर याचा अर्थ तुम्ही जीवनात काहीच नव्याने मिळवण्याचा प्रयत्न नाही केला

10. अपयश हे वाईट असतं, पण प्रयत्न न करणं त्याहून वाईट असतं

हेही वाचा –

व्हॉटसअप श्रद्धांजली संदेश

Read More From लाईफस्टाईल