खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपटसृष्टीमध्ये खेळ आणि खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित विविध चित्रपट निर्माण होत असतात. बॉलीवू़डप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टी यामध्ये मागे नाही. लवकरच कबड्डी या खेळावर आधारित ‘सूर सपाटा’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात दुनियादारी फेम संजय जाधव नकारात्मक भूमिकेतून दिसणार आहे. दिग्दर्शक संजय जाधव पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका साकारणार आहे. आतापर्यंत संजयने दिग्दर्शन, लेखन आणि सिनेमॅटोग्राफीमध्ये यश मिळवलं आहे. सूर सपाटाच्या निमित्ताने प्रथमच तो अभिनयक्षेत्रात आपलं नशीब आजमावणार आहे. शिवाय या चित्रपटात अभिनेता उपेंद्र लिमयेही प्रमुख भूमिकेत असणार आहे. या कलाकारांव्यतिरिक्त आणखी अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात असण्याची शक्यता आहे. किशोर खिल्लारे, सुभाष गुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे यांनी या चित्रपटांची निर्मिती केली आहे. तर या चित्रपटाची कथा मंगेश कंठाळे यांची आहे. गावागावांमध्ये उनाडक्या करणारी मुलं ते यशाचं शिखर गाठणारे कबड्डीपटू असा प्रवास या चित्रपटात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सूर सपाटा चित्रपट 22 मार्चला प्रदर्शित होत आहे. नकारात्मक भूमिका असलेल्या पात्राच्या व्यक्तिमत्वांना भावनांचे विविध कंगोरे असतात. आता सूर सपाटा चित्रपटातील संजय जाधवची भूमिका नेमकी कशी असणार हे पाहणं खूपच उत्सुकतेचं असणार आहे.
चित्रपटसृष्टीत वाहत आहेत खेळाचे वारे
सध्या बॉलीवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीत खेळांवर आधारित विविध चित्रपटांची निर्मिती होत आहे. बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतचा ‘पंगा’ हा चित्रपट देखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. हा चित्रपटदेखील कबड्डीवर आधारित आहे. दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी या चित्रपटासाठी कंगनावर विशेष मेहनत घेत आहेत. मणिकर्णिकाच्या यशानंतर कंगना या चित्रपटासाठी कबड्डीचे धडे गिरविण्यासाठी सज्ज झाली आहे. बिग बी अभिताभ बच्चन नागराज मंजुळे दिग्गर्शित ‘झुंड’ या चित्रपटात काम करत आहेत. झुंड चित्रपट फुटबॉल या खेळावर आधारित आहे. अमिताभ बच्चन या चि्त्रपटात फुटबॉल कोचची भूमिका साकारणार आहे. सध्या कबड्डी या खेळाला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. अनेक वर्ष प्रसिद्धीपासून दूर असलेला अस्सल मातीतील हा खेळ प्रो- कबड्डीमध्ये ले पंगा म्हणत लोकप्रियतेचं शिखर गाठत आहे. आता हिंदीमधील पंगा आणि मराठीतील सूर सपाटा या दोन चित्रपटांमधून घराघरात हा खेळ पोहचेल हे निश्चित.
प्रेक्षकांना बेफिकर व्हायला लावतोय ‘आम्ही बेफिकर’
गायिका नेहा कक्करने सांगितलं ब्रेकअपमागचं खरं कारण
‘डीबाडी डीपांग’ नंतर संदीप-सलील-अवधूतचं ‘हे’ नवं गाणं सोशल मीडियावर घालतंय धुमशान
फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade