जागतिक जल दिवस जगभरात 22 मार्चला साजरा करण्यात येतो. युनायटेड नेशन वॉटर (United Nations Water) या संस्थेद्वारे या दिवसाचे आयोजन केले जातं. पृथ्वीवर जमिनीखाली पाण्याचे अनेक नैसर्गिक स्त्रोत असतात. ज्यामधून नदी, विहीर, झरे, तलावांना पाणी मिळत असतं. मात्र प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे आज हे नैसर्गिक स्त्रोत लुप्त होत आहेत. हीच परिस्थिती कायम राहिली तर पाण्याचा दुष्काळ पडण्याची शक्यता दाट आहे. पाण्याच्या दुष्काळामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊ शकते. पुढील पिढीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आताच याबाबत योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे. यासाठी जागतिक जल दिवसानिमित्त जगभरात स्वच्छ आणि ताज्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत जपण्यासाठी जागरुकता निर्माण केली जायला हवी. खरंतर यासाठी जागतिक जल दिवसाचे (International water day) आयोजन करावं लागणं हे माणसाचं खूप मोठं दुर्देव आहे. कारण निसर्गाने माणसाला बहाल केलेली जलसंपत्ती माणसाने स्वतःच्या हातानेच वाया घालवलेली आहे. ज्यामुळे पाणी वाचवा जीवन जगवा या घोषवाक्याचा प्रचार आणि प्रसार करणं आज अत्यंत गरजेचं झालं आहे. म्हणूनच यंदाच्या जागतिक जल दिवसानिमित्त या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पाण्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ही पाणी वाचवा घोषवाक्य नक्कीच उपयुक्त आहेत.
जागतिक जलदिनानिमित्त पाणी वाचवा घोषवाक्य – Save Water Slogans In Marathi
१. पाणी जीवन आहे त्याची काळजी घ्या
२. पाणी नाही द्रव्य ते आहे अमृततुल्य
३. दुष्काळाची नको असेल आपत्ती, तर वेळीच जपा जलसंपत्ती
४. थेंब थेंब वाचवा पाण्याचा हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा
५. ठिंबक आणि तुषार सिंचनाची किमया न्यारी, कमी पाण्यात मिळेल उत्प्नन्न भारी
६. जीवन हवं असेल सुंदर तर वेळीच करा काटकसर
७. पाणी अडवा, पाणी जिरवा, भविष्यात तुम्हाला जे जे हवं ते मिळवा
८. पाण्याचे संवर्धन करा आणि मुलांच्या भविष्य सुरक्षित करा
९. शुद्ध पाण्याचे नवे तंत्र,सुखी जीवनाचा हाच खरा मंत्र
१०. स्वच्छ पाणी, सुंदर परिसर, तुमचे जीवन होईल सुखकर
वाचा – जागतिक पर्यावरण दिन आणि पर्यावरण घोषवाक्य (Save Environment Slogan In Marathi)
११. पाणी शुद्धीकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्यसंपन्न करू
१२. सांडपाण्याची करू या विल्हेवाट, गावात होईल आरोग्याची पहाट
१३. पाणी वाचवण्याची धरू या कास, सर्वांचा होईल नक्कीच विकास
१४. पाणी सिंचन क्षेत्र वाचवूया नवीन पिढीला शिकवण देऊ या
१५. बचत पाण्याची गरज काळाची
१६. पाणी बचत करेल जीवन सुसंगत
१७. पाण्याच्या स्वच्छतेविषयी दक्षता घेऊ, सर्व रोगराईला दूर ठेवू
१८. पाण्याचे पुर्नभरण, जीवनाचे संवर्धन
१९. थोडे सहकार्य आणि थोडे नियोजन, पाण्याने वाचेल सर्वांचे जीवन
२०. पाणी वाचवल्याने होईल फायदा मिळेल सर्वांना जलसंपदा
वाचा – पाण्याची बचत करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स
२१. वाचवाल पाणी आणि राबवाल जलनीती तर पळून जाईल दुष्काळाची भीती
२२. पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, पाणी वाचवण्याचा करा प्रयत्न
२३. पाण्याचे संरक्षण वसुधंरेचे करा रक्षण
२४. पाणी म्हणजे पृथ्वीचं स्पंदन, जीवसृष्टीसाठी आहे जीवन
२५. पाणी वापरा जपून म्हणजे भविष्य राहील टिकून
२६. स्वच्छ पाणी घरोघरी, आरोग्याची खरी हमी
२७. पाणी म्हणजे जीवनाचे सार, याचा तुम्ही करा विचार
२८. पाणी वाचवा जीवन वाचवा
२९. पाण्याविना जीवन बेजार, जीवसृष्टीला त्याचाच आधार
३०. पिण्यासाठी शुद्ध पाणी, नाही होणार आरोग्याची हानी
वाचा – शेतकरी स्टेटस मराठीतून (Shetkari Status In Marathi)
३१. सांडपण्याचा पुर्नवापर, जीवनाला द्या आकार
३२. पृथ्वी आणि पाणी ठेवा साफ, नाही पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ
३३. पाणी वाचवण्याचा ध्यास, भविष्याचा होईल विकास
३४. स्वच्छ पाणी आणि सुंदर परिसर, आरोग्य राहील तुमचे निरंतर
३५. प्रत्येक गावात एक नारा, पाण्याची काटकसर करा
३६. पाण्याची शुद्धता राखा आजारपणातून मिळेल मुक्तता
३७. पाण्याचे योग्य नियोजन, आनंदाने फुलवा तुमचे जीवन
३८. वाचवा थेंब थेंब पाण्याचा, हाच एकमेव मार्ग सुखी होण्याचा
३९. पाणी देते जीवनदान पाणी वाचवणे हेच श्रेष्ठ काम
४०. पाणी वाचवा पाणी तुम्हाला वाचवेल
वाचा – धरणीमातेचा उत्सव जागतिक वसुंधरा दिन
४१. वाणी आणि पाणी जपून वापरा, वाणी जपली तर वर्तमान
काळ चांगला राहील आणि पाणी जपलं तर तुमचा भविष्यकाळ शाबूत राहील.
४२. पाणी घ्या ओगराळ्याने, दूषित करू नका तुमच्या हाताने
जलसंवर्धन आणि जलसंरक्षण, लहान मुलांना द्या ही शिकवण
४३. प्रदूषण थांबवा पाणी वाचवा
४४. भविष्याची नको हवी असेल चिंता तर आताच पाणी वाचवा
४५. गरिब असो श्रीमंत पाणी वाचवा नाहीतर कराल खंत
४६. सुरक्षित साधन पाण्याचे, महत्त्व पटवा हातपंपाचे
४७. नका वाया घालवू पाणी आणि इंधन, हेच आहे देशाचे खरे धन
४८. पाण्याविना माणसाचा जन्म आहे व्यर्थ, पाणी वाचवण्याचे समजून घ्या महत्त्व
४९. पाण्याचे महत्त्व पटवा, भविष्याची चिंता मिटवा
५०. पाणी वाचवा, पुढच्या पिढीला काय द्यायचे हे आताच ठरवा
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
जागतिक महिला दिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश आणि सुविचार (Women’s Day Quotes In Marathi)
जीवन जगताना मानसिक समाधान देतील हे ‘50′ आध्यात्मिक सुविचार
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade