DIY सौंदर्य

थंडी चालू झाल्यावर फुटतात लगेच टाचा, तर वापरा तिळाचे तेल आणि मेण

Dipali Naphade  |  Dec 12, 2020
थंडी चालू झाल्यावर फुटतात लगेच टाचा, तर वापरा तिळाचे तेल आणि मेण

थंडी सुरू झाल्यानंतर पाय अथवा टाचा फुटणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. काही जणांच्या पायांच्या टाचा या बारा महिने फुटलेल्या असतात. यामुळे बऱ्याचदा त्रास होतो. चालतानाही आणि अगदी न चालतानाही याचा त्रास होतो. तसंच फुटलेल्या टाचांमुळे इन्फेक्शन होण्याचा धोकाही जास्त असतो. शिवाय तुम्हाला हव्या तशा फॅशनेबल चप्पलही तुम्ही यामुळे घालू शकत नाही. पण या फुटलेल्या टाचांवर तुम्हाला नक्कीच घरच्या घरी रामबाण इलाज करता येतो. पण त्याआधी नक्की याची कारणे काय आहेत ते आपण पाहूया आणि त्यावर तिळाच्या तेलाचा वापर कसा काय योग्य ठरतो ते पण पाहूया. 

जाणून घ्या थंडीमध्ये का येते पाय आणि बोटांना सूज

पायाच्या टाचा फुटण्याचे कारण

Shutterstock

पायाच्या तळव्यांची आणि टाचांची त्वचा ही संवेदनशील असून ती पटकन कोरडी होते आणि फाटते. पायाच्या कोरडेपणामुळेच टाचांना भेगा पडतात. याची अनेक कारणं असतात 

पायांच्या भेगांपासून होतोय त्रास तर, घरच्या घरी करा ‘हे’ उपाय (How To Heal Cracked Heels In Marathi)

मेणबत्ती आणि तिळाच्या तेलाचा करा वापर

Shutterstock

पायाला भेगा पडल्या अथवा पायाच्या टाचा फुटल्या तर आपण सहसा क्रिमचा वापर करतो. पण तरीही पायाच्या भेगा तशाच राहतात. तर काही जणी घरगुती उपाय आजमावूनही पाहतात. पण असं असूनही जर पायाच्या भेगा ठीक होत नसतील तर तुम्ही मेणबत्ती आणि तिळाच्या तेलाचा फुटलेल्या टाचांसाठी उपयोग करा. तिळाचे तेल हे आपल्या त्वचेसाठी उत्तम मानले जाते. यामुळे तुमच्या पायांच्या टाचा अधिक मऊ आणि मुलायम होण्यास मदत मिळते. मेणबत्ती आणि तिळाच्या तेलाची पेस्ट हा यावरील उत्तम उपाय आहे. याचा वापर कसा करायचा ते आपण पाहूया. 

पायावर पडल्या असतील भेगा तर होतील 4 दिवसात गायब, करा हे उपाय

ग्लिसरीन आणि गुलाबपाणी

Shutterstock

फुटलेल्या टाचांचा त्रास दूर करण्यासाठी ग्लिसरीन आणि गुलाबपाणी हादेखील एक चांगला उपाय आहे. ग्लिसरीन आणि गुलाबपाणी नीट मिक्स करून घ्या. त्यानंतर फुटलेल्या टाचांवर लावा. यामुळे तुमचे पाय अधिक मऊ आणि मुलायम होतील. तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. थंडीच्या दिवसात तुम्ही हा उपाय नक्कीच करून पाहू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य