अॅस्ट्रो वर्ल्ड

षोडशोपचार पूजा म्हणजे काय? काय आहे त्याचे महत्व

Leenal Gawade  |  Oct 27, 2021
षोडशोपचार पूजा

 हिंदू संस्कृतीमध्ये पूजेला खूप जास्त महत्व आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या पूजाविधी केल्या जातात. त्यापैकीच एक आहे ती म्हणजे ‘षोडशोपचार पूजा’. षोडशोपचार या शब्दाची फोड केल्यानंतर षोडश+ उपचार अशी त्याची फोड होते. षोडश याचा अर्थ सोळा असा होतो तर उपचार म्हणजे विधी असा होतो. षोडशोपचारमध्ये 16 वेगळ्या विधी केल्या जातात. ही पूजा भगवान विष्णूची केली जाते. देवाची पूजा मनोभावे केली तरच त्याचा फायदा आपल्याला होण्यास मदत मिळते असे म्हणतात. त्यामुळे षोडशोपचार पूजा अनेक ठिकाणी केली जाते. तुम्ही कधीही या पुजेसंदर्भात ऐकले नसेल तर जाणून घेऊया याविषयी अधिक. दिवाळीत तुम्हाला अशी पूजा करता येईल. दिवाळीच्या शुभेच्छा पाठवत तुम्ही दिवाळीचा आनंदही साजरा करु शकता.

अशी केली जाते षोडशोपचार पूजा 

Instagram

षोडशोपचार पूजा म्हणजे काय ते जाणून घेतल्यानंतर हा पूजाविधी नेमका कसा करायला हवा हे देखील तुम्हाला माहीत असायला हवे. जाणून घेऊया या षोडशोपचार पूजेचा विधी. या शिवाय दिवाळीतील लक्ष्मीपूजन पूजाविधी जाणून घ्या

  1.  देवतेला बोलावणे
    पूजेतील पहिली कृती म्हणजे देवाला बोलावणे. यामध्ये देवता बसवणे, तिला सजवणे आणि तिची स्तुती करणे असा समावेश असतो. तुम्ही ज्या देवतेची पूजा करत आहात. त्या संदर्भातील मंत्र पठण करणे पहिल्या कृतीमध्ये गरजेचे असते. असे करताना तुम्ही देवाला फुले आणि हळद-कुंकू वाहावे.
  2. देवतेची प्रतिष्ठापणा करणे
    देवतेची प्रतिष्ठापणा करणे हे देखील याचा भाग आहे. देवतेला पाटावर बसवून त्याचा फुलं वाहावीत 
  3.  देवतेचे पाय धुणे
    देवाची प्रतिष्ठापणा झाल्यावर पाय धुणे हे देखील गरजेचे असते.  पळीने देवाच्या पायावरर पाणी घलावे.
  4.  देवतेचे हात धुणे
    पाय धुवून झाल्यानंतर त्यांचे हात धुणे देखील गरजेचे असते. त्यासाठी पाण्यामध्ये अक्षदा, गंध आणि फूल घालून ते पाणी देवाच्या हातावर द्यावे. 
  5. देवाची आंघोळ
    हात-पाय धुवून झाल्यानंतर देवाची आंघोळ घालणे हे देखील गरजेचे असते. देवाची आंघोळ घालण्यासाठी पळीमध्ये पाणी घेऊन मूर्तीवर हळुहळू पाणी घालावे. देवतेची आंघोळ सुंगधी असावी यासाठी पाण्यामध्ये सुगंधी द्रव्ये घालावी
  6.  वस्त्र घालावी
    आंघोळीनंतर देवाला नवीन वस्त्रे देणे देखील गरजेचे असते. त्यासाठी कापसाची वस्त्रे करुन देवाला वाहावीत. एखाद्या अलंकाराप्रमाणे ती घालावीत
  7.  सातवा ते तेरावा विधी हा देवते समोर दिवा लावणे, धूप दाखवणे, देवाला नैवैद्य दाखवणे अशा कृती येतात.  या तुम्हाला अगदी मनापासून करायच्या आहेत. 
  8.   नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला त्याची मनोभावे पूजा करायची आहे. 
  9. सगळ्या कृती झाल्यानंतर तुम्हाला देवाभोवती प्रदशिणा घालायची आहे. 
  10. सगळ्यात शेवटचा आणि सोळावा विधी म्हणजे तुम्हाला मंत्रपुष्पांजली म्हणायची आहे.

    सगळी पूजा करुन झाल्यानंत तुम्हाला प्रसाद ग्रहण करायचे आहे. अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याचा आनंद मिळेल.

अधिक वाचा

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

दिवाळी सणाची माहिती

दिवाळी फराळ असा होईल परफेक्ट

Read More From अॅस्ट्रो वर्ल्ड