xSEO

श्री कृष्ण कोट्स मराठी | Shri Krishna Quotes In Marathi 

Vaidehi Raje  |  Aug 9, 2022
श्री कृष्ण कोट्स मराठी | Shri Krishna Quotes In Marathi

श्रीकृष्णाची भक्ती करायला मिळणे खूप भाग्याचे आहे. जो कृष्णा भक्तीभावाने सेवक होतो तो सर्व जग जिंकतो. श्रीकृष्णाला योगेश्वर,  युगप्रवर्तक म्हणतात. श्रीकृष्णाचे संपूर्ण जीवनच मार्गदर्शक आहे. त्याच्या जीवनातल्या प्रत्येक घटनेतून माणूस खूप काही शिकू शकतो. त्याने सांगितलेली कूटनीती तर आजही अभ्यासली जाते. जीवन कसे जगावे , भक्ती कशी करावी, योग्य काय अयोग्य काय, आत्म्याचा प्रवास कसा होतो तसेच या जीवनाचे कारण काय व उद्दिष्ट काय असावे, मोक्ष कसा मिळेल हे आणि असे अगाध ज्ञान स्वतः श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेच्या स्वरूपात दिले. भगवद्गीतेचा अभ्यास करण्यात संपूर्ण आयुष्य जरी व्यतीत केले तरी ते कमीच पडेल इतके असामान्य ज्ञान त्यातून मिळते.  श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. तो दिवस गोकुळाष्टमी म्हणून ओळखला जातो. श्रीकृष्णाने सांगितलेले काही निवडक विचार व प्रेरित विचारांचा संग्रह तुम्हाला या लेखात वाचायला मिळेल. ते तुमच्या जीवनात अंगीकारून तुम्ही तुमचे जीवन सुधारू शकता.जो कोणी भगवान श्रीकृष्णाची पूर्ण भक्तिभावाने सेवा करतो, भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने त्याला जगातील प्रत्येक सुख प्राप्त होते. श्रीकृष्ण सदैव सर्वांच्या कल्याणासाठी या जगतात विराजमान आहे.  या लेखात काही निवडक श्री कृष्ण कोट्स मराठी । Shri Krishna Quotes In Marathi चा संग्रह दिलेला आहे जो आपल्या रोजच्या आयुष्यात मार्गदर्शक आहे. येथे भगवद्गीतेतील काही महत्त्वाच्या आणि सुंदर शिकवणी निवडल्या आहेत ज्या तुम्हाला वाचायला आवडतील आणि जर तुम्ही तुमच्या जीवनात या शिकवणींचे पालन केले तर तुमच्या जीवनात यश आणि आनंदाचे आगमन होईल. वाचा श्री कृष्ण कोट्स मराठी । Shri Krishna Quotes In Marathi – 

Shri Krishna Quotes In Marathi | श्रीकृष्णाचे उपदेश

‘विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था, कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था’ असा उपदेश भर रणांगणात हतबल झालेल्या अर्जुनाला करणाऱ्या श्रीकृष्णाने त्याच्या संपूर्ण आयुष्यात असंख्य वाट चुकलेल्यांना योग्य मार्गावर आणले. ‘भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था’ असे सांगून कर्माचे महत्व पटवून दिले. लोकांना मात्र कृष्ण म्हटले की फक्त रासलीला आठवते. त्याने सांगितलेली कूटनीती आणि भगवद्गीता मात्र लोक सोयीस्करपणे विसरतात. श्रीकृष्णाने वाटलेले ज्ञानकण वेचण्यासाठी वाचा Shri Krishna Quotes In Marathi | श्रीकृष्णाचे उपदेश –

श्री कृष्ण कोट्स मराठी

आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवले नाही तर ते आपल्या शत्रूसारखे वागू लागते.

प्रेम हा एक असा अनुभव आहे जो मनुष्याला कधी पराजित होऊ देत नाही आणि घृणा हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीच जिंकू देत नाही. 

आयुष्य म्हणजे भविष्यकाळ किंवा भूतकाळ नव्हे तर आयुष्य म्हणजे वर्तमान आहे. म्हणूनच केवळ वर्तमानाचा विचार करा. 

आयुष्यात दुःख मिळण्याचे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा होय. या अपेक्षांचा त्याग करून बघा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आहे. 

प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन घडते. 

अहंकार बाळगल्याने मनुष्याची प्रतिष्ठा, वैभव आणि वंश या तिन्हींचा विनाश होतो. 

कुणाला काही दिल्याचा अहंकार कधीही बाळगू नका. कुणास ठाऊक जे तुम्ही देताय ते कदाचित तुमच्यावर असलेले मागच्या जन्माचे कर्ज असू शकते. 

वाईट कर्म करावे लागत नाहीत, तर ते आपोआप घडते. चांगली कर्मे आपोआप घडत नाहीत तर ती करावी लागतात. 

जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो. काही लोक याला दुःख म्हणतात तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात. 

आयुष्यात कशीही वेळ येवो, कुटुंबाची साथ कधीच सोडू नका. सुख आले तर ते असल्याने कुटुंबाबरोबर दुप्पट होईल आणि दुःख आले तर कुटुंब बरोबर असल्याने ते तुमचे दुःख वाटून घेतील. 

स्वार्थीपणाने नाती जोडण्याचा कितीही प्रयत्न करा, ती नाती कधीच टिकत नाहीत. पण प्रेमाचे नाते तोडण्याचा कितीही प्रयत्न करा, ती नाती कधीच तुटत नाहीत. 

वाचा – बाळासाठी कृष्णाची नावे

श्रीकृष्णाने भगवद्गीतेत केलेला उपदेश | Shri Krishna Bhagwadgita Quotes

लोकांनी कितीही नावे ठेवली तरी योग्य तेच करणाऱ्या, निष्पापांना न्याय मिळवून देणाऱ्या श्रीकृष्णाने लोकांच्या दूषणांची पर्वा केली नाही. ‘मोह न मजला कीर्तीचा मी नाथ अनाथांचा, भोगी म्हणूनी उपहासा, मी योगी कर्माचा, माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा” असे म्हणत श्रीकृष्णाने सोळा सहस्त्र कन्यांचा उद्धार करण्यासाठी त्यांच्याशी विवाह केला. “पराधीन ना समर्थ मी घेण्या वार कलांकाचा” असे धोरण ठेवणाऱ्या श्रीकृष्णाने त्याच्या अवतारकार्यात अन्याय करणाऱ्यांना शासन करत गांजलेल्या दुःखी जीवांना दुःखातून मुक्ती दिली. आज कलियुगात दुःखापासून मुक्ती हवी असल्यास वाचा श्रीकृष्णाने भगवद्गीतेत केलेला उपदेश, श्रीमद् भगवत गीता मराठी सुविचार आणि उपदेश

श्री कृष्ण कोट्स मराठी

ईश्वराला पूर्णपणे समर्पित व्हा , तो परमेश्वर तुम्हाला सगळ्या पापांतून मुक्त करेल. 

कर्म करत राहा. फळाची चिंता करू नका. 

आयुष्य ना भूतकाळात आहे ना भविष्यात, आयुष्य आहे ते फक्त आत्ताच्या क्षणात… 

क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीमुळे माणूस स्वतःचेच नुकसान करून घेतो. 

जे घडून गेले ते चांगलेच घडले, जे घडतेय ते चांगल्यासाठीच घडतेय आणि जे घडणार आहे ते चांगलेच घडणार आहे. त्यामुळे परमेश्वरवर विश्वास ठेवून चांगली कर्मे करत राहा. 

अशांत मनावर नियंत्रण मिळवणे कठीण असले तरीही विशिष्ट अभ्यासाने मनावर विजय मिळवता येतो. 

माणूस त्याच्या जन्माने नव्हे तर कर्माने महान बनतो. 

परमेश्वर चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेतो पण तो त्यांची साथ कधीच सोडत नाही. आणि परमेश्वर वाईट लोकांना बरेच काही देतो, पण तो त्यांची साथ कधीच देत नाही. 

सतत संशय घेणारा माणूस या जगात काय, कुठेच आनंदी राहू शकत नाही. 

स्वतःच्या कर्मापासून कोणीच पळून जाऊ शकत नाही. कर्माचे फळ प्रत्येकालाच भोगावे लागते. हाच कर्माचा सिद्धांत आहे. 

श्री कृष्ण जन्माष्टमी कोट्स । Shri Krishna Janmashtami Quotes In Marathi

भगवान विष्णूचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधीपासूनच त्याचे शत्रू त्याला मारण्यासाठी टपून बसलेले होते. परंतु श्रीकृष्णाने मात्र सर्व संकटांवर मात करून श्रावण कृष्ण अष्टमीला मध्यरात्री जन्म घेतला. हाच दिवस आपण जन्माष्टमी म्हणून साजरी करतो. 

श्री कृष्ण जन्माष्टमी कोट्स

कान्हा ज्याचे नाव, गोकुळ ज्याचे धाम, अशा भगवान श्रीकृष्णाला आमचा शतशः प्रणाम!

गोकुळामध्ये होता त्याचा वास, गोपिकांसोबत त्याने रचला रास, यशोदा, देवकी ज्याची मैय्या, तोच साऱ्यांचा लाडका श्रीकृष्ण कन्हैय्या! श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा… 

अच्युतम् केशवं रामनारायणम्, कृष्णदामोदरम् वासुदेवं हरी। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे जी करताना लोक म्हणतात, “हे तुला कधीच जमणार नाही.”

आंम्ही उंचावरून कोसळतो ते पुन्हा उभं राहण्यासाठीच! हाथी घोडा पालखी जय कन्हैयालाल की…

राधेची भक्ती नि बासरीची स्वर, लोण्याचा स्वाद आणि गोपींची रास… सगळे मिळून साजरा करू गोकुळाष्टमीचा दिवस खास.. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 

मित्रांनो..थराला या किंवा आम्हाला धरायला या! आपला समजून गोविंदाला या… श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा! 

विसरून सारे मतभेद, लोभ अहंकार दूर सोडा.. सर्वांप्रती समभाव मनात जागवून,आपुलकीची दहीहंडी फोडा. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 

श्रीकृष्णापासूनच सुरू होते जीवन, तोच करतो सर्वांचा उद्धार.. ध्यान करा भगवंताचे, प्रभू करतील तुमची सर्व स्वप्ने साकार.. श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा! 

वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं | देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं || श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीविजयो भूतिधुंवा नीतिर्मतिर्मम।। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…

वाचा – रक्षाबंधन माहिती आणि महत्त्व

कृष्णनीती कोट्स मराठी । Krishna Niti Quotes In Marathi

जी व्यक्ती धर्म, सत्य व न्यायाच्या बाजूने आहे केवळ तीच व्यक्ती योग्य आहे असे श्रीकृष्णाने सांगितले आहे. महाभारत काळापासून आजपर्यंत युद्धात ज्याप्रमाणे कपट होते त्याला सरळमार्गाने उत्तर देता येत नाही. अशावेळी जशास तसेच उत्तर द्यावे लागते. नाठाळाच्या माथी काठीच हाणावी लागते. कपटी माणसाला त्याच्याच भाषेत उत्तर दिले तरच तो वठणीवर येतो. यासाठी कृष्णनीतीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. 

श्री कृष्ण कोट्स मराठी

जेव्हा तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा अधिक बलवान असेल तेव्हा त्याच्याशी सरळ लढण्यापेक्षा कूटनीतीने लढणे अधिक फायदेशीर असते. 

युद्धात संख्याबळ महत्वाचे नाही तर साहस, नीती आणि योग्य वेळी योग्य अस्त्र किंवा व्यक्तीचा उपयोग करणे जास्त महत्वाचे आहे. 

जो राजा किंवा सेनापती युद्धात स्वतःच्या एक एक सैनिकाच्या प्राणांना राजाच्या प्राणाइतकेच महत्व देऊन त्यांच्या प्राणांचे रक्षण करतो, त्याचा विजय निश्चित असतो. 

जर तुम्हाला शत्रूला मारण्याची संधी मिळत असेल तर ती संधी वाया घालवू नका. शत्रूचा नाश करा. 

कोणतेही वचन, संधी किंवा तडजोड ही अंतिम नसते. जर त्यामुळे राष्ट्राचे, धर्माचे, सत्याचे अहित होत असेल तर ते वचन किंवा संधी मोडण्यातच हित असते. 

युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वीच हे ओळखणे गरजेचे असते की मित्र कोण व शत्रू कोण आहे. जो मित्राचे सोंग घेऊन द्रोह करतो त्याला ओळखणे आवश्यक आहे. 

संकटसमयी किंवा अपयश पदरात पडले तरी धीर सोडू नये. उलट अपयशाचे कारण जाणून घेऊन पुढे जात राहावे. 

जर तुमचे उद्देश्य योग्य असेल तर, ते सत्य आणि न्यायासाठी असेल तर ते साध्य करण्यासाठी साधन कुठलेही असो, त्याने फरक पडत नाही. 

निष्पक्ष व तटस्थ व्यक्तीवर कधीही भरवसा ठेवू नये. जी व्यक्ती सत्य, न्याय आणि धर्माच्या बाजूने आहे केवळ तीच व्यक्ती विश्वासास पात्र आहे. 

कोणतेही संकट आले, कितीही वाईट वेळ आली तरी ज्ञानाची कास सोडू नये. ज्ञानच आपले सगळ्या संकटांतून रक्षण करते. 

वाचा – गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचे महत्व जरूर जाणून घ्या

श्री कृष्ण जन्माष्टमी स्टेटस मराठी । Shri Krishna Janmashtami Status In Marathi

श्री कृष्ण जन्माष्टमी स्टेटस मराठी

तो येतो दंगा करायला हातात घेऊन बासरी, त्याच्या मुकुटात आहे मोरपीस आणि त्याची मुद्रा आहे हसरी..फोडून दही हंडी करतो धमाल , असा आमचा श्रीकृष्ण कन्हैया आहे कमाल.. दहीहंडीच्या शुभेच्छा!

गोपाळकाल्याचा उत्सव आहे मोठा, आनंदाला नाही तोटा! श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी… दहीहंडीच्या शुभेच्छा!

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीकृष्ण माधव गोविंद मुरारी,  यशोदेचा कान्हा नटखट भारी… गोपाळकाल्याच्या शुभेच्छा!

गोपाळकाला गोड झाला, गोविंदाने गोड केला.. राधे कृष्ण, गोपाळ कृष्ण! हरे कृष्ण हरे कृष्ण हरी हरी! 

वाचा – यंदा दहीहंडी साजरी करा घरीच, ऐका ही हिट बॉलीवूड गाणी 

श्री कृष्णाचे प्रेमावरील कोट्स । Shrikrishna Quotes On Love In Marathi 

युद्धात कूटनीती सांगणारा, भगवद्गीतेचे ज्ञान देणारा  श्रीकृष्ण हाच गोकुळातील कान्हा देखील आहे. तोच राधेचा मोहन आहे. कपटी माणसाचे दात त्याच्याच घशात घालणारा श्रीकृष्ण मात्र त्याच्या भक्तांसाठी मातेप्रमाणे वत्सल होतो. राधा व कृष्णाचे नाते हे असेच हळवे आहे. राधाचे कृष्णवरचे प्रेम म्हणजे भक्तीचे उच्चतम शिखर आहे जे गाठणे सामान्य माणसाला शक्य नाही. खरे प्रेम म्हणजे काय हे जाणून घ्या राधा-कृष्णाच्या नात्यातून! वाचा राधे कृष्ण कोट्स मराठी –

श्री कृष्ण कोट्स मराठी

प्रेम असावं तर राधा -कृष्णासारखं, लग्नाच्या बंधनात बांधलं गेलं नसलं तरी कायम हृदयात जपलेलं… 

प्रेमात दिखावा आला की प्रेमातील पावित्र्य नष्ट होतं!

एखाद्यावर खरे प्रेम केल्याशिवाय प्रेमाचा खरा अर्थ समजू शकत नाही. 

प्रेम म्हणजे दोन आत्म्यांचे एकरूप होणे. जसे राधेने कृष्णाच्या हृदयात तर कृष्णाने राधेच्या हृदयात असणे!

बदल हा जगाचा नियम आहे. पण जे कोणत्याची परिस्थितीत बदलत नाही तेच खरे प्रेम असते. 

खरे प्रेम तेच, जे न सांगताही एकमेकांची वेदना समजून घेते आणि न बोलताही एकमेकांचे दुःख वाटून घेते. 

श्री कृष्णाचे प्रेरणादायी विचार मराठी। Motivational Shri Krishna Quotes In Marathi

कृरुक्षेत्रात आपलेच नातलग शत्रुपक्षात बघून हतबल झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगून लढायला तयार केले. आपल्याही आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपल्याला निराश वाटते, प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही असे वाटते. अशावेळी आपल्याला प्रेरणा मिळण्याची गरज असते. वाचा श्रीकृष्णाचे प्रेरणादायी विचार –  

श्री कृष्णाचे प्रेरणादायी विचार मराठी

जर तुम्ही तुमचे लक्ष्य गाठण्यात अयशस्वी झालात तर तुमची रणनीती बदला, तुमचे लक्ष्य नाही. 

जेव्हा एखादी समस्या निर्माण होते, त्याबरोबरच त्या समस्येवरील उपाय देखील तयार होतो. 

कोणला तोंडदेखली क्षमा करण्यास एक क्षणही लागत नाही पण मनापासून क्षमा करण्यास एक जन्मही अपुरा पडतो. 

चमत्कार त्यांच्याबरोबर घडतात, जे तो घडण्यावर विश्वास ठेवतात. 

अपेक्षा व इच्छांचा त्याग करणे हा सुख मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे. 

माणसाचे पतन त्याच क्षणी सुरु होते जेव्हा तो आपल्या प्रियजनांना खाली खेचण्याचा विचार करू लागतो. 

अज्ञानी लोक फक्त स्वतःच्या लाभासाठी कार्य करतात पण बुद्धिमान लोक मात्र विश्वकल्याणासाठी कार्य करतात. 

आयुष्यात काहीही झाले तरी निराश होऊ नये कारण त्त्यावेळी तुम्ही दुबळे नाही तर तुमचा काळ खराब असतो. 

ज्याप्रमाणे आपल्या ध्येयापासून भरकटलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने ज्ञान देऊन पुन्हा योग्य मार्गावर आणले होते, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने तुम्हाला तुमच्या जीवनात योग्य मार्ग दाखवावे हीच त्या केशवाचे चरणी प्रार्थना आहे. श्रीकृष्णाच्या उपदेशांनी तुमचे जीवन उजळून निघावे, म्हणून वाचा श्री कृष्ण कोट्स मराठी । Shri Krishna Quotes In Marathi. श्रीकृष्णाने केलेला उपदेश वाचून तुम्हाला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळेल. हे कोट्स तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करू शकता कारण ज्ञान हे दान दिल्यानेच वाढते.

अधिक वाचा – श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 

Read More From xSEO