DIY सौंदर्य

थंडीत त्वचा का पडते काळी, काय आहे कारण

Dipali Naphade  |  Nov 15, 2021
darker skin in winter

थंडी सुरू झाल्यानंतर बऱ्याच व्यक्तींना त्वचा कोरडी पडण्याचा अथवा त्वचा काळी पडण्याचा त्रास होतो. थंडीच्या दिवसात थंड हवेमुळे त्वचेवर अधिक परिणाम होताना दिसतो. हा परिणाम आपल्याला नाही जाणवला तरी समोरच्या व्यक्तीला आपल्या त्वचेवर होणारा परिणाम पटकन जाणवतो. थंडीमध्ये त्वचा काळी आणि कोरडी होते. तुम्ही जर वेळीच त्वचेची काळजी घेतली नाही तर त्वचा अधिक कोरडी होते आणि त्रासदायक ठरते. पण त्वचा काळी पडते आहे याबाबत कोणालाच पटकन कळत नाही. थंडीत त्वचा काळी पडण्याचे नेमके कारण काय आहे याबाबत आपण या लेखातून जाणून घेऊया. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर तुम्ही नक्की ही कारणे जाणून घ्या.

थंडीत त्वचा काळी का होते?

थंडीत त्वचा सहसा काळी होते. पण थंडीच्या दिवसात त्वचा नक्की काळी पडण्याचं नेमकं कारण काय आहे असा प्रश्न बऱ्याच जणांना मनात येतो. पण तुम्हाला माहीत आहे का? उन्हाळ्याच्या दिवसांच्या तुलनेत थंडीमध्ये त्वचा अधिक काळवंडते. असं का? वास्तविक थंडीच्या दिवसात त्वचेची काळजी न घेतल्यामुळे त्वचा अधिक काळी आणि कोरडी होते. याची नक्की काय कारणे आहेत पाहूया.

सनस्क्रिन न लावणे – महिला सहसा थंडीच्या दिवसात सनस्क्रिन वापरत नाहीत, त्यामुळे त्वचा पटकन काळी पडते. उन्हाळ्यापेक्षा सनस्क्रिनचा वापर हा थंडीच्या दिवसात करायलाच हवा. कारण थंडीमुळे अधिक काळ उन्हात उभे राहणे लोकांना आवडते. पण थंडी असली तरीही ऊन आपले काम करतेच. सूर्याच्या किरणांमुळे त्वचा पटकन काळी होते. त्यातही त्वचा कोरडी असल्याने पटकन किरणे खेचली जातात. त्यामुळे तुम्ही त्वचेवर सनस्क्रिन लावायलाच हवे. 

कमी पाणी पिणे – थंडीमध्ये इतर वेळेपेक्षा कमी पाणी प्यायले जाते. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा अधिक कोरडी होते आणि काळी पडू लागते. थंडीत अधिक पाणी पिण्याने त्वचा चमकदार होते हे तुम्ही लक्षात ठेवायला हवे. तुम्हीदेखील थंडीमध्ये कमी पाणी पित असाल तर ही सवय वेळीच मोडा. थंडीत त्वचा हायड्रेट होणे गरजेचे आहे. 

थंड हवा – थंडीमध्ये हवा अधिक थंड आणि शुष्क अर्थात कोरडी असते. यामुळे त्वचा पटकन कोरडी होते आणि यामुळेच त्वचा काळी पडते. त्वचा काळी होऊ नये यासाठी तुम्ही चेहऱ्यावर थंडीत नेहमीच मॉईस्चरईजर लावाया हवे. मॉईस्चराईजर लावल्यामुळे त्वचा हायड्रेट होते आणि अधिक चांगली राहते. काळेपणा येत नाही. थंडीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही क्रिम अथवा लोशनचादेखील वापर करू शकता. 

गरम पदार्थांचे सेवन करणे – थंडीत त्वचा काळी पडण्याचे हेदेखील एक कारण आहे. तुम्ही थंडीमध्ये अधिकाधिक गरम पदार्थांचे सेवन करता. उदाहरणार्थ कॉफी, चहा, सूप, हॉट चॉकलेट. कॉफी, चॉकलेट यामध्ये कॅफीनचे प्रमाण असते, जे त्वचेला आतून डॅमेज करते अर्थात हानी पोहचवते. जास्त कॉफी आणि चॉकलेटचे सेवन थंडीमध्ये योग्य नाही. यामुळे त्वचा कोरडी होते आणि काळी पडते. तसंच त्वचा डिहायड्रेटही होते. थंडीमध्ये जास्तीत जास्त पाणी प्यायल्यास, तुमची त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेचा काळेपणा कमी होतो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य