DIY सौंदर्य

तेलकट त्वचा चमकदार करण्यासाठी वापरा हे तेल, पाहा फरक

Dipali Naphade  |  Jul 8, 2021
तेलकट त्वचा चमकदार करण्यासाठी वापरा हे तेल, पाहा फरक

प्रत्येक महिलेची त्वचा (Skin) वेगळी असते हे प्रत्येकाला माहीत आहे. पण सर्वात जास्त समस्या झेलावी लागते ती तेलकट त्वचा (oily skin) असणाऱ्या महिलांना.  तेलकट त्वचा असणाऱ्या महिलांच्या त्वचेवर कोणतेही क्रिम अथवा पावडर अथवा तेल उपयुक्त ठरत नाही. त्यामुळेच त्यांच्या त्वचेवर बऱ्याचदा पुरळ येणे, मुरूमं येणे हे दिसून येते. याशिवाय सतत पिंपल्स आल्यामुळे चेहऱ्यावर काळे डागही पडतात. तेलकट त्वचा काळजी घेण्यासाठी आणि तजेलदार बनविण्यासाठी तुम्हाला गरज आहे ती अशा तेलाची जे तुमच्या त्वचेच्या समस्यांवर उपयोगी ठरू शकतात. अशाच काही तेलांबाबत आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. तुम्ही या तेलाचा वापर करून तुमच्या तेलकट त्वचेची काळजी अधिक चांगल्या रितीने घेऊ शकता. तुमच्या त्वचेची समस्या यामुळे कमी होण्यास नक्की मदत मिळेल. 

रोझहिप ऑईल (Rosehip Oil)

रोझहिप ऑईल (Rosehip Oil)

 

रोजहिप ऑईलमध्ये विटामिन ए आणि लिनोलिइक अॅसिड असते जे तुमच्या त्वचेला मॉईस्चराईज करण्यासह मुरूमांची समस्या दूर करण्यासह मदत करते. यासह वाढत्या वयाची निशाणी कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. तसंच या तेलाचा वापर केल्याने त्वचा अधिक तजेलदार दिसून येते. रोझहिप ऑईल बाजारात सहजरित्या मिळते. पण याची खरेदी करताना रोझ ऑईल आणइ रोझहिप ऑईल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत याची खात्री करूनच मग खरेदी करा. हे एकच आहे असे समजू नका. हे दोन्ही तेल वेगवेगळे आहे. 

आर्गन ऑईल (Argan Oil)

आर्गन ऑईल (Argan Oil)

 

आर्गन ऑईल हे अत्यंत लाईटवेट असते. आर्गन ऑईलचा त्वचा आणि केसांसाठी खूपच फायदा होतो. तुमच्या त्वचेमधील सीबम प्रॉडक्शनची पातळी नियंत्रित करण्यासाठीही याचा उपयोग होतो. आर्गन ऑईल लावल्याने तेलकट त्वचेपासून सुटका मिळते. या तेलातील गुणधर्म विटामिन ई आणि अँटिइन्फ्लेमेटरी घटक हे त्वचेला चमक देण्यासह त्वचेवरील मुरूमं कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतात.

जोजोबा ऑईल (Jojoba Oil)

जोजोबा ऑईल (Jojoba Oil)

 

तेलकट त्वचेला मॉईस्चराईज करून अधिक मऊ आणि मुलायम करण्यासाठी तुम्ही जोजोबा ऑईलचा उपयोग करून घेऊ शकता. हे तुमच्या तेलकट त्वचेमधील  सीबम प्रॉडक्शनची पातळी नियंत्रित करते आणि त्वचा चिकट होऊ देत नाही. पण याचा जास्त प्रमाणात उपयोग करू नका. तुमच्या त्वचेसाठी केवळ एक ते दोन थेंब जोजोबा ऑईलचा वापर उत्तम ठरतो. तेलकट त्वचेसाठी वाईप्स चा वापरही बरेचदा केला जातो. 

टी ट्री ऑईल

टी ट्री ऑईल (Tea Tree Oil)

 

तुम्ही तेलकट त्वचेने हैराण असाल आणि त्यातही चेहऱ्यावर सतत पिंपल्स (pimples) येत असतील तर तुम्ही टी ट्री ऑईलचा नक्कीच वापर करायला हवा. याचा वापर करण्यापूर्वी अगदी हलके डायल्युट करा. यामधील अँटीबॅक्टेरियल घटकांमुळे येणारे पिंपल्स आणि बॅक्टेरिया मारून टाकण्यास मदत मिळते. तसंच तुमची त्वचा अधिक चमकदार बनविण्यासाठी आणि चिकटपणासून सुटका करून देण्यासाठी याचा उपयोग होतो. 

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, प्रत्येक ब्युटी ट्रिटमेंट (Beauty Treatment) ही प्रत्येक त्वचेसाठी नसते. तेलकट त्वचा ही बऱ्याच जणांची असू शकते. पण तेलकट त्वचेसह तुम्हाला कोणत्याही गोष्टींची अलर्जी असेल तर त्याची तुम्ही काळजी घ्यायला हवी. कोणतीही नवी गोष्ट त्वचेवर वापरण्यापूर्वी तुम्ही नेहमी पॅच टेस्ट करून घ्या अथवा तुमच्या त्वचेच्या डॉक्टरांकडून सल्ला घ्या. कोणत्याही सल्ल्याशिवाय ब्युटी ट्रिटमेंट, क्रिम अथवा तेलांचा वापर करू नका. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

 

Read More From DIY सौंदर्य