DIY फॅशन

सतरंगी चिक्की खणाला वेगळा ट्विस्ट, सोनाली कुलकर्णीचा वेगळा अंदाज

Dipali Naphade  |  Jun 5, 2022
sonalee-kulkarni-looks-glamm-in-new-traditional-contemporary-khun-crop top-pant-in-marathi

खण म्हटलं की, आपल्याकडे अगदी पारंपरिक खणाच्या साड्या आणि खणाचे ब्लाऊज हेच चित्र डोळ्यासमोर उभं राहातं. हल्ली खणाच्या साड्यांसाठी खास खणाच्या ब्लाऊजचे डिझाईन्स बनविण्यात येतात. तर सणांसाठी खणांच्या ट्विनिंग कॉम्बोलाही आजकाल पसंती मिळत आहे. इतर साड्यांप्रमाणेच आजकाल लग्नांमध्ये खणाच्या साड्यांचीही मागणी वाढली आहे आणि हेच नाही तर खणांच्या मंगळसुत्रांचाही ट्रेंड दिसून येत आहे. तर मग इतकी सगळी खणाची फॅशन असताना केवळ पारंपरिकच फॅशन का असावी? सतरंगी चिक्की खणाला एक वेगळा ट्विस्ट देऊन मीरा लूम अफेअर (Meera – The Loom Affair) ने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सह एक वेगळाच वेस्टर्न लुक (Western Look) फॅशनमध्ये आणला आहे. सोनाली कुळकर्णीचा वेगळा अंदाज नक्कीच चाहत्यांनाही आवडेल आणि खणाच्या कपड्यांची वेगळी फॅशन करण्यासाठी सध्याच्या तरूणाईला हा नक्कीच एक वेगळा फंडा मिळू शकतो. 

पारंपरिक आणि कंटेम्प्ररी लुकचे फ्युजन (Traditional And Contemporary Fusion Look)

सोनाली कुलकर्णीने सध्या आपल्या लुकमध्ये कमालीचे ट्रान्सफॉर्मेशन आणले आहे. तर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच सोनाली वेगवेगळे लुक शेअर करत असते. नुकतेच सोनालीने एक स्पेशल लुकचे फोटो शेअर केले आहेत, जे व्हायरल झाले आहेत आणि त्याचे कारण म्हणजे पारंपरिक आणि नव्या लुकचे फ्युजन असणारी सतरंगी चिक्की खणाची स्टाईल. ‘कोणं म्हणतं आपली खण साडी फक्त पारंपारिक पद्धतीनेच शोभून दिसते.’ असे कॅप्शन देत सोनालीने आपला मराठमोळा आणि फ्युजन असणारा असा लुक चाहत्यांसमोर आणला आहे. हा लुक  ‘मीरा – द लूम अफेअर’ या ब्रँडसाठी सोनालीने केला आहे. तर हा ब्रँड खणाच्या साडीसाठीच प्रसिद्ध आहे. या ब्रँडची सर्वेसर्वा असणाऱ्या सोनाली डाळवालेने हे नवे फ्युजन स्टाईल केले आहे. या नव्या फ्युजनला अत्यंत चांगला प्रतिसाद सोशल मीडियावर दिसून येतोय. 

“लग्न आणि इतर सणांसाठी खण अडकून बसतं. खण हे केवळ पारंपरिकच नसावं किंवा खण म्हटला की, केवळ सगळा साजश्रृंगारच करायला हवा असं नाही. खणामध्ये वेगवेगळे गडद रंग आहेत, त्यामुळे याचे वेस्टर्न आऊटफिट्स अधिक चांगले दिसतील असा विचार डोक्यात आल्यामुळेच हे दोन्ही लुक मी तयार केले” असं सोनाली डाळवालेने POPxo मराठीने संवाद साधला असताना सांगितले. 

तरूण पिढीसाठी आकर्षण

मल्टीकलरमध्ये असणारी ही चिक्की खण साडी वेगळ्या पद्धतीने स्टाईल करण्याचं एक धाडसच केल्याचं दिसून येतंय. आतापर्यंत खण म्हणजे पारंपरिकता असंच दिसून आलं आहे. मात्र खणाचा क्रॉपटॉप आणि पँटही होऊ शकते हे पाहून नक्कीच सध्याच्या तरूण पिढीला याचे आकर्षण वाटेल. गेल्या काही वर्षांमध्ये खणाच्या साडीचा ट्रेंड वाढताना दिसून येतोय. पण अजूनही तरूण मुलींना साडी नीट सांभाळता येतेच असं नाही. मग ज्यांना पारंपरिकता आणि आधुनिकता दोन्ही एकत्र जपण्याची इच्छा आहे अशांसाठी ही स्टाईल नक्कीच उपयोगी पडू शकते. क्रॉपटॉप आणि पँटमध्ये मुली अत्यंत कम्फर्टेबल असतात आणि त्यामुळेच खणाच्या कपड्यांधील ही स्टाईल तरूणाईला आकर्षित करेल असं दिसून येतंय. एक वेगळी स्टाईल करण्याचे धैर्य स्टायलिस्ट सोनालीने दाखवलंय आणि तितक्याच ताकदीने ही फॅशन अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पेलली आहे असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. तर आता यामध्ये अजून कोणत्या वेगळ्या स्टाईल्स येणार आहेत याचीही उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. 

मात्र या नव्या स्टाईलमध्ये सोनाली कुलकर्णीने आपल्या चाहत्यांचे होश उडवले आहेत हे मात्र नक्की!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन