लाईफस्टाईल

महिला दिनानिमित्त काय गिफ्ट्स देता येतील तुमच्या आयुष्यातील स्पेशल ‘महिलांना’ (Gifts For Women’s Day In Marathi)

Dipali Naphade  |  Mar 4, 2019
महिला दिनानिमित्त काय गिफ्ट्स देता येतील तुमच्या आयुष्यातील स्पेशल ‘महिलांना’ (Gifts For Women’s Day In Marathi)

खरं तर आपण प्रत्येक दिन महिलांचा असतो असंच म्हणतो. पण काही दिवस खास असतात आणि त्यापैकीच एक आहे 8 मार्च हा दिवस. हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.  पण हा दिवस 8 मार्च ला का साजरा करण्यात येतो हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. सर्वात पहिल्यांदा या दिवसाची सुरुवात 1909 मध्ये झाली. या दिवसाला अधिकृत मान्यता 1975 मध्ये प्राप्त झाली जेव्हा संयुक्त राष्ट्र संघाने एका थीमसह हा दिवस साजरा केला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाची पहिली थीम ‘सेलिब्रेटिंग द पास्ट, प्लॅनिंग फॉर द फ्यूचर’ होती. जगभरातील विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान आणि कौतुक या दिवशी करण्यात येतं. महिलांनी आर्थिक, राजनैतिक आणि सामाजिक क्षेत्रात कमावलेल्या स्थानाकरिता हा दिवस साजरा करण्यात येतो. आज बऱ्याच क्षेत्रांमध्ये महिला पुढे आहेत. पण भूतकाळात अशी स्थिती नव्हती. महिलांना कोणतीही गोष्ट करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं.

कशी झाली सुरुवात (How It Started)

न्यूयॉर्क शहरात 1908 मध्ये 15000 महिलांनी मतदानाचा हक्क मागण्यासाठी, कामाचे तास कमी करण्यासाठी आणि चांगला पगार मिळवण्यासाठी पहिल्यांदा आंदोलन केलं. त्यानंतर एक वर्षाने अमेरिकेतील सोशालिस्ट पार्टीच्या घोषणनुसार 1909 मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये पहिला राष्ट्रीय महिला दिवस 28 फेब्रुवारीला साजरा करण्यात आला.तर 1910 मध्ये क्लेरा झेटकिन या जर्मनीतील एका सोशल डेमोक्रेटिक पार्टीच्या महिला ऑफस लीडरने आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. एका परिषदेमध्ये 17 देशांच्या 100 महिलांनी या प्रस्तावावर आपली मंजुरी दिली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिवसाची स्थापना झाली. महिलांना मतदानाचा अधिकार देणं हा त्यावेळचा उद्देश होता. 19 मार्च 1911 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. मात्र 1913 पासून हा दिवस 8 मार्चला साजरा करण्यात येतो.

वाचा – भारतीय ज्वेलरी ब्रँड

महिलांचं आयुष्यातील महत्त्व (Importance Of Women)

पुरुष असो वा महिला प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी महिला असते जिचं खूप महत्त्व असतं. मग ती आई असो, बहीण असो, पत्नी असो वा मुलगी. महिला दिन आल्यानंतर तिच्या खास दिवशी तिला आनंदी करणं गरजेचं असतं. अगदी वर्षभर आपल्याला तिचं मन जपायचं असतंच. पण या खास दिवशी तिच्यासाठी अनेक वेगवेगळी आणि तिला आवडणारी गिफ्ट्स आपण तिला देऊ शकतो. सध्या अगदी बाजारातही महिला दिनानिमित्त खास गोष्टी विकण्यासाठी आणण्यात येतात. त्यामुळे या महिला दिनानिमित्त तुम्ही तुमच्या आयुष्यात खास महिलेला फक्त महिला दिनाच्या शुभेच्छा किंवा फक्त महिला दिनाच्या कविता व्यतिरिक्त अजून काय देऊ शकाल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अर्थात महिलांना देण्यासाठी बऱ्याच वस्तू असतात. पण तुमचा अमूल्य वेळ ही नक्कीच खास गोष्ट आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या घाईघाईच्या वेळातून तिच्यासाठी थोडा का असेना पण खास वेळ नक्की काढा. या खास वेळेत तुम्ही तिला काय गिफ्ट घेऊन द्या हे आम्ही तुम्हाला सांगतो.

लहान असो वा मोठी कोणत्याही मुलीला कपडे हा अगदी आवडता विषय आहे. सध्या विविध ब्रँड्स आणि वेगवेगळ्या ठिकाणी अप्रतिम कपडे मिळतात. तुमच्या खास व्यक्तीला नक्की कसे आवडतील याची निवड करून तिच्यासाठी खास कपडे घेऊन जा. त्यासाठी तुम्ही लिवायकोचे कपडेदेखील घेऊ शकता. यामध्ये काय व्हरायटी आहे हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो. आपण येथे महिला दिनाच्या कोट्सबद्दल देखील वाचू शकता.

लिवा प्लेड अँड चेक्स (Liva Plaid And Checks)

यामध्ये वेगवेगळे चेक्सचे पॅटर्न उपलब्ध आहेत. सध्या चेक्सचा ट्रेंड आहे. स्कॉटिश प्लेड्सपासून ते अगदी गिंगहॅम, फ्लॅनेल, मद्रास चेक्ससारखे प्रिंट्सही उठून दिसतात. असे प्रिंट्स आधीही लोकप्रिय होते. शिवाय असे प्रिंट्स कोणत्याही सीझनमध्ये वापरता येत असल्यामुळे जास्त विचार करावा लागत नाही. यामध्ये पारंपरिक जुन्या पद्धतीने बफेलो चेक्स वा सेल्टिक टार्टनही आहेत. शिवाय इनकॉर्पोरेटेड आणि तुम्हाला आवडणाऱ्या स्टाईलनुसारदेखील प्लेड्स परिधान करता येतात. डोळ्यांना सहज दिसेल आणि त्रासदायक होणार नाही अशा तऱ्हेने याची डिझाईन करण्यात आलेली असते. तुमची बहीण वा पत्नी कॉर्पोरेटमध्ये काम करत असेल तर अशा तऱ्हेचे लिवा प्लेड अँड चेक्सचा पर्याय हा उत्तम आहे. शिवाय यामध्ये लिवा क्रीम पॉली जॅकर्ड टॉप अथवा प्लेटेड ट्राऊजर हादेखील पर्याय उपलब्ध आहे. या कपड्याचा पोत अंगावर कपड्याचा गोळा होऊ देत नाही. केवळ ऑफिसवेअर नाही तर तुम्ही एखाद्या पार्टीला जाणार असलात तरदेखील असे कपडे उत्तम आहेत. त्यामुळे आपल्या जवळच्या महिलेला तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर हा एक चांगला पर्याय आहे.

महिलांसाठी सर्वात महत्त्वाचं काही असेल तर दागिने. दागिन्यामध्ये महिलांना नक्की तुम्ही काय गिफ्ट देऊ शकता याविषयी थोडंसं.

वाचा – महिला दिननिमित आयला पाठवा

कॅरेटलेन बटरफ्लाय इअररिंग्ज आणि आरण्य पेंडंट (Caratlen Butterfly Earrings And Arena Pendants)

स्त्रीचं आयुष्य हे फुलपाखराप्रमाणेच मुक्त, स्वच्छंदी आणि अनेक रंगांनी भरलेले असतं. स्वप्नांचा पाठलाग करत या स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी सध्या अनेक महिला झटत आहेत. प्रत्येकाला स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. याच प्रेरणेवर आधारित कॅरेटलेनने बटरफ्लाय कलेक्शन आणलं आहे.

प्रत्येक स्त्री ला हवेहवेसे वाटणारे असे नाजूक दागिने तुम्हाला इथे मिळतील. या महिला दिनानिमित्त तुम्ही तुमच्या आई, बहीण, पत्नी, मुलीला नक्कीच खुश करू शकता. वजनाने हलंकं आणि नियमित वापरण्याजोगे हे दागिने असल्यामुळे आपल्या आई, बहीण, मैत्रीण, पत्नी, प्रेयसी आणि अगदी ऑफिस कलिगला देण्यासाठीही ही कलेक्शन चांगलं आहे. शिवाय यामध्ये निसर्ग नियमानुसार प्रेरित होऊन झाडांच्या कोरलेल्या पानांवर आधारित रचन असून मध्यभागी हिऱ्याचं कोंदण असलेलं पेंडंटदेखील आहे. याचं नाव आरण्य असून कोणत्याही महिलेला आपलासा वाटेल असाच हा दागिना आहे.

वाचा – जागतिक महिला दिन माहिती

रेयना कलेक्शन (Reyna Collection)

कोणत्याही महिलेसाठी आभूषण ही फारच जवळची गोष्ट असते. पु. ना. गाडगीळनेदेखील महिलांसाठी अनेक आभूषण बनवले आहेत. आता महिला दिन लक्षात घेऊन रेयना कलेक्शन आणलं आहे. बऱ्याच महिलांना नाजूक आभूषणं जास्त आवडतात. सध्या बऱ्याच महिला या ऑफिसला जाणाऱ्या असल्यामुळे त्यांना अगदी नाजूक आणि प्रत्येक कपड्याला शोभेल अशी पेंडंट्स हवी असतात. हाच विचार करून हे कलेक्शन आणण्यात आलं आहे.

हिरा प्रत्येक स्त्री चा जवळचा मित्र (Diamond Is A Close Friend Of Every Woman)

हिरा कोणत्या स्त्री ला आवडत नाही असं नाही. हिरा हा कदाचित प्रत्येक महिलेचा जवळचा मित्र असतो असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. हिऱ्याचे अगदी मोठे दागिने प्रत्येकाला घेणं परवडणारं नसतं. पण हिऱ्याचे पेंडंट्स वा कानातले वा चमकी तरी निदान आपल्याकडे असावी असं प्रत्येक महिलेला वाटतं. खिशाला परवडणारे असे हिऱ्याचे दागिने तुम्ही तुमच्या जवळच्या महिलेला काशी ज्वेलर्सच्या कलेक्शनमधून देऊ शकता.

दागिन्यांप्रमाणेच स्त्री ला स्वतःच्या त्वचेचीही सर्वात जास्त काळजी असते. त्यासाठी अनेक उत्पादनं बाजारामध्ये उपलब्ध असतात. पण नैसर्गिक उत्पादनं खूप कमी असतात. त्यामुळे या महिला दिनानिमित्त तुम्ही तुमच्या जवळच्या महिलेला ओरिफ्लेमचं उत्पादनही देऊ शकता. त्वचा हा प्रत्येक महिलेसाठी महत्त्वाचा भाग असतो.

ओरिफ्लेम ऑप्टिमल्स हायड्रा मायसेलर क्लिन्झिंग वॉटर (Oriflame Optimals Hydra Micellar Cleansing Water)

ओरिफ्लेमने भारतीय महिलांककिरता ऑप्टिमल्स हायड्रा मायसेलर क्लिन्झिंग वॉटर हे एक नवं उत्पादन सादर केलं आहे. या क्लिन्झिंग वॉटरमध्ये तपकिरी आणि हिरव्या शेवाळाचे आणि स्वीडिश नैसर्गिक घटकांचं मिश्रण आहे. त्यामुळे तुमच्या त्वचेला मुलायम ठेऊन अधिक चांगलं टोनिंग करण्यास मदत होते. तर यातील हायड्राईज टेक्नॉलॉजीमुळे तुमची त्वचा अधिक सशक्त होते आणि त्वचेतील आर्द्रता जपून त्वचा मुलायम आणि व्यवस्थित हायड्रेटेड राहते. तसंच तुम्ही मेकअप केला असाल तर हे क्लिन्झिंग वॉटर तुमच्या छिद्रातील मेकअपदेखील काढून टाकते आणि त्वचा टवटवीत बनवते. शिवाय डोळ्यांजवळच्या संवेदनशील भागासाठीदेखील हे उपयुक्त असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे इतके फायदे असलेलं हे ऑप्टिमल्स हायड्रा मायसेलर क्लिन्झिंग वॉटर तुमच्या प्रिय व्यक्तीला देणं कधीही फायदेशीरच आहे.

महिला दिन हा स्त्री चा सन्मान करण्याचा एक विशेष दिवस असला तरीही प्रत्येकाने महिलांचा रोज आदर आणि सन्मान करायला हवा. पण या स्पेशल दिवशी आपल्या जवळच्या महिलांना स्पेशल वाटून देणंही तितकंच गरजेचं आहे. त्यांना आवडतील अशी गिफ्ट्स त्यांना या दिवशी नक्की द्या. आम्ही तुम्हाला त्यासाठी या लेखाद्वारे मदत केली आहे. तुम्ही या व्यतिरिक्त तुम्हाला माहीत असलेल्या वस्तू दिल्यात तरीही त्यांचा दिवस खासच ठरणार आहे. शिवाय तुम्ही त्यांच्याबरोबर असणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं.

हेदेखील वाचा – 

वर्ष 2019 मध्ये बॉलीवूडमध्ये धडकणार महिला बायोपिक
Forbes List: दीपिका पदूकोण भारतातील सर्वात ‘श्रीमंत’ महिला सेलिब्रेटी
#StrengthOfAWoman : दीपिका पादुकोण, सोनम कपूरसारख्या अनेक बॉलीवूड अभिनेत्रींचा आहे वेगळा बिझनेस
Womens Day Wishes In English
Womens Day Captions In English
Womens Day Poem In English

Read More From लाईफस्टाईल