साड्यांची फॅशन कधीही जुनी होत नाही. त्यामध्ये आधुनिक आणि पारंपरिक असाही मेळ बसवून आता नव्या फॅशन करून मुली साड्या नेसतात. पण सध्या चलती आहे ती स्ट्राईप्स साड्यांची. याचं वैशिष्ट्य म्हणजे स्ट्राईप्स साड्यांमध्ये तुम्ही तुमची अगदी जाडीही कमी दाखवू शकता. स्ट्राईप्स या काही आधुनिक कपड्यांवरच नाही तर आता साड्यांवरही इतके उत्तम दिसतात की बऱ्याच ठिकाणी आता स्ट्राईप्सच्या साड्यांची फॅशन जोर धरू लागली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे साडी ही कधीही आऊट ऑफ फॅशन होत नाही. कोणत्याही कार्यक्रमाला साडी सुंदरच दिसते. कोणत्याही महिलेचे सौंदर्य उठावदार दिसण्यासाठी साडीसारखी दुसरी फॅशन नाही असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. बॉलीवूड असो अथवा टीव्हीवरील मालिका हल्ली तुम्हाला बऱ्याच ठिकाणी स्ट्राईप्सच्या साड्यांची फॅशन दिसून येईल. यामध्ये नक्कीच आकर्षकता दिसून येते. ग्रेसफुल दिसण्यासाठी या साड्या उत्तम पर्याय आहे.
कोणत्याही वयाला साजेशी
स्ट्राईप्स साड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही वयातील मुलीला अथवा महिलेली ही साडी सुंदर आणि आकर्षक दिसते. केवळ ही साडी नेसताना वयानुसार कोणते ब्लाऊज घालायचे इतकीच काळजी घ्यायला हवी. तुम्ही जर तरूण असाल आणि तुमची अंगकाठी जर बारीक असेल तर तुम्ही स्ट्राईप्स साड्यांसह स्लिव्हलेस आणि बॅकलेस ब्लाऊज घातल्यास सुंदर दिसेल. तर मध्यमवयीन असाल तर तुम्ही स्ट्राईप्स प्रिंट्ससह तुम्ही थोड्या मोठ्या बाह्यांचा ब्लाऊज शिऊन घाला. तसंच स्ट्राईप्स साड्यांसह कधीही प्रिंटेड ब्लाऊज वापरणं चांगले दिसणार नाही. तुम्ही या गोष्टीची नक्की काळजी घ्या.
सुती आणि लिननमधील स्ट्राईप्ड साड्या
इतर साड्यांपेक्षा सुती आणि लिननमधील स्ट्राईप्सच्या साड्या या अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतात. सुळसुळीत साड्यांमध्ये बारीक मुली अधिक उठावदार दिसतात. त्यामुळे तुमच्या शरीराचा आकार पाहून तुम्ही या साड्यांची निवड करा. लग्न समारंभासाठी जर तुम्हाला स्ट्राईप्स साड्या हव्या असतील तर तुम्ही सिल्कच्या स्ट्राईप्स साड्यांचा विचार करावा. कारण त्या साड्यांचे डिझाईन्स अधिक आकर्षक आणि उठावदार समारंभामध्ये दिसते. यामुळे सणासमारंभाला तुम्हाला वेगळा लुक मिळतो.
साडी नेसताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी, मिळवा परफेक्ट लुक
रंग कोणता निवडावा
स्ट्राईप्समध्ये नक्की कोणता रंग निवडावा असाही प्रश्न पडतो. तर अशा साड्यांची फॅशन करताना नेहमी गडद रंगाची निवड करावी. कारण गडद रंग या साड्यांमध्ये उठावदार दिसतो. तसंच जितका अधिक गडद रंग तितकी तुमची साडी अधिक आकर्षक आणि तितकी तुमचा जाडपणा कमी दिसायला मदत मिळते. त्यामुळे पिवळा, निळा, हिरवा, काळा अशा रंगाच्या स्ट्राईप्स साड्यांची तुम्ही निवड करावी.
नववधूकरिता नऊवारी साडी प्रकार आणि खास डिझाईन्स
या साडीवर घालायचे दागिने
कोणत्याही साडीवर कोणते दागिने घालायचे ही फॅशनदेखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. स्ट्राईप्स साड्यांवर तुम्हाला मोत्यांचे दागिने अजिबातच चांगले दिसणार नाहीत. मात्र तुम्ही चोकर अथवा तुमच्या साडीच्या रंगानुसार गळ्यात एखादा नेकलेस घातलात तर चांगले दिसेल. कारण या साड्या मुळातच इतक्या सुंदर आणि उठावदार असतात की त्यावर भरभरून दागिने घालण्याची गरज भासत नाही. तुम्ही बसके कानातले आणि चोकर अशा स्वरूपाचा एखादा दागिना घालूनही या साडीची शान अधिक वाढवू शकता. स्ट्राईप्स साड्यांसह तुम्ही प्लेन हँडबॅग वापरलीत अथवा तुम्हाला आवडत असल्यास, क्लच वापरले तरीही तुमची फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट पूर्ण होते.
ब्रायडल आऊटफिटसाठी बनारसी साडी आहे उत्तम पर्याय