Natural Care

उन्हाळात पाय टॅन होऊ नयेत म्हणून अशी घ्या काळजी (Tips On Foot Care In Marathi)

Leenal Gawade  |  Mar 26, 2019
उन्हाळात पाय टॅन होऊ नयेत म्हणून अशी घ्या काळजी (Tips On Foot Care In Marathi)

सध्या बाहेर फारच उकडू  लागलयं. या उन्हापासून वाचण्यासाठी तुम्ही तुमच्यामध्ये अनेक बदल करायला सुरुवात केली असेल. म्हणजे  कॉटनचे कपडे, गॉगल आणि हा सर्वात महत्वाचे सनस्क्रिन… हे लावल्याशिवाय तुम्ही घराबाहेर पडतच नसाल. पण तुमच्या पायांचे काय? म्हणजे उन्हातून बाहेर भटकून आल्यानंतर तुम्ही तुमचे पाय पाहिले आहेत का? हो अगदी बरोबर तुमचे पाय तुम्हाला काळवंडलेले दिसतायत नाहीत का? म्हणजे चपला काढल्यानंतर त्याचे चट्टेही पायावर स्पष्ट दिसू लागतात. उन्हामुळे तुमचेही पाय काळवंडलेले असतील आज आम्ही तुम्हाला काही झटपट टीप्स सांगणार आहोत. जे तुम्ही रोजच्या रोज केलेत तर उत्तम

आपले पाय काळजी कशी घ्यावी (Tips On Foot Care In Marathi)

स्क्रब (Scrub)

बाहेरुन आल्यानंतर पाय धुवायची अनेकांना सवय असते. जर तुम्हाला शक्य असेल तर माईल्ड स्क्रबने तुम्ही तुमचा पाय स्क्रब करा. स्क्रब माईल्ड असेल तर तुमचा पायांना त्याचा त्रास होणार नाही. या शिवाय तुम्ही कॉफी, शुगर, सॉल्ट स्क्रब असे स्क्रबदेखील आठवड्यातून दोनदा वापरल्यास उत्तम. स्क्रबमुळे तुमच्या पायांवरील मृत त्वचा निघून जाते. 

Also Read How To Prevent Shoe Bite In Marathi

पायांना मॉश्चरायझरची गरज (Hydrate Legs In The Heat)

तुमच्या चेहऱ्याला ज्याप्रमाणे मॉश्चरायझरची गरज असते अगदी त्याचप्रमाणे तुमच्या पायांनी मॉश्चरायझर्सची गरज असते. कारण पायांना उन अधिक काळ लागत राहिले तर तुमचे पाय आपोआप शुष्क दिसू लागतात. शिवाय तुमच्या पायांवर अधिक सुरकुत्या दिसतात. पाय काळवंडण्यापेक्षा पाय शुष्क असेल तर ते अधिक खराब दिसतात. त्यामुळे तुम्ही स्क्रब केल्यानंतर पायाला चांगले मॉश्चरायझर लावा. पायांची काळजी घेताना चांगल्या प्रॉडक्टची निवड करणे गरजेचे असते.

पायांच्या भेगांवर असे करा घरगुती इलाज

सॉक्सचा करा वापरा (Use Socks)

आपण सगळेच वेगवेगळ्या कपड्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या चपला घालत असतो. तुम्ही रोजच बूट घालाल असे होत नाही. त्यामुळे शक्य असल्यास स्कीन कलरचे सॉक्स चपलांच्या आत घातल्यास उत्तम. त्यामुळे तुमच्या पायांना लावलेले मॉश्चरायझरही टिकून राहिल. पण घरी आल्यानंतर तुम्ही दिवसभर घातलेले सॉक्स धुणे महत्वाचे आहे. कारण दिवसभरात तुम्हाला आलेला घाम त्या सॉक्सने टिपला असेल. त्यामुळे साहजिकच त्यावर बॅक्टेरिया असतील म्हणून सॉक्स वापरणार असाल तर रोज स्वच्छ धुतलेले सॉक्स वापरा. उन्हाळ्यात पातळ सॉक्सची निवडही योग्य ठरेल. (शिवाय तुम्ही काळ्या रंगाचे सॉक्स मुळीच घालू नका कारण ते उष्णता शोषून घेतात)

मुलायम आणि कोमल पायांसाठी असे करा घरगुती उपचार

पाय फुटण्याचा त्रास

सर्वसाधारणपणे थंडीत अनेकांना टाचा फुटण्याचा त्रास होतो. पण काहींना हवामानात बदल झाले तरी हा त्रास होतो. त्यामुळे कडक उन्हाळाही अनेकांना बाधतो. अशावेळी तुमच्या पायांची काळजी घेणारे हिल प्रोटेक्टरही बाजारात मिळतात. ते तुम्ही वापरु शकता. त्यामुळे तुमच्या टाचा फुटणार नाहीत.

पायांची स्वच्छता महत्वाची (Keep Your Feet Clean)

पायांच्या स्वच्छतेसाठी पेडिक्युअर हे महत्वाचे आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही महिन्यातून किमान दोनदा घरच्या घरी पेडिक्युअर करा.  पेडिक्युअरमध्ये तुमचे स्क्रबिंग, मॉश्चरायझिंग आणि मसाज देखील होऊन जाते त्यामुळे तुमच्या पायांच्या सौंदर्यात अधिक भर पडते.

घरच्या घरी असे करता येईल पेडिक्युअर

सनस्क्रिन लावा (Use Sunscreen)

तुमच्या तोंड आणि हातांप्रमाणे तुमच्या पायांनाही सनस्क्रिन लावा जेणेकरुन सूर्याच्या किरणांचा त्यावर जास्त परिणाम होणार नाही. चांगल्या प्रतीचे सनस्क्रिन त्यासाठी निवडता.

वाचा – पायांची काळजी कशी घ्यावी

(सौजन्य- Shutterstock)

 

Read More From Natural Care