पिरेड्स प्रत्येक महिन्याला येतात पण प्रत्येक महिन्याला आपल्याला नवीन काहीतरी शिकवून जातात. काहींना आजही त्यांचे पिरेड्स येणार की नाही याचा अंदाज बांधता येत नाही. मग काय आयत्यावेळी सॅनिटरी पॅडसोबत न बाळगल्यामुळे त्यांची पुरती फजिती होते. तुम्हालाही पिरेड्स जवळ आले हे ओळखता येत नाही. मग तुम्हाला पिरेड्सची लक्षणे माहीत हवीत.
ओटी पोटात खूप दुखणे
shutterstock
इतर वेळी पोटात दुखणे आणि पिरेड्स येण्याआधी पोटात दुखणे यामध्ये बराच फरक आहे. पिरेड्सच्या वेळचे पोटात दुखणे हे फारच वेगळे असते. तुम्हाला अध्येमध्ये ओटी पोटातून कळ येऊ लागते. ही कळ इतकी असह्य करणारी असते की, तुमचा मूड कितीही चांगला असला तरी तो खराब होतो. तुम्हाला काहीही कारण नसताना असे पोटात दुखू लागले की, समजून जावे तुमचे पिरेड्स आता जवळ आहेत असे समजावे.
पिरेड्समध्ये फ्लो सुरळीत होण्यासाठी करा हे घरगुती उपाय
पिंपल्स येणे
shutterstock
पिरेड्स जवळ आले की, काहींना हमखास येतात ते पिंपल्स… डोक्यावर, गालावर मोठे मोठे पिंपल्स यायला हमखास सुरुवात होते. अचानक गालावर आलेला पिंपल्स फोडायचा प्रयत्न अनेक जणी करतात. पण हे पिरेड्सचे लक्षण आहे हे मात्र विसरतात.पिरेड्स येणार आहेत हे संकेत देण्यासाठी येणारे पिंपल्स पिरेड्स आले की, हळूहळू जातात. त्यामुळे ते फोडून किंवा त्यावर अघोरी उपाय करुन काहीही उपयोग होत नाही.
छाती जड वाटणे
shutterstock
पिरेड्स येण्याचे आणखी एक लक्षण आहे ते म्हणजे छाती दुखण्याचे. म्हणजे होतं असं की, काही जणांना पिरेड्स येण्याच्या काही दिवस शरीरावर स्तन असल्याचे सतत जाणवत राहते. याचे कारण असे की स्तनाग्रे या दिवसात फारच दुखायला लागतात. स्तन जड झाल्यासारखे वाटू लागतात. ते इतके त्रासदायक वाटतात की, शरीरावर त्याचे असणे नको होते. काहींना या दिवसात स्तनाग्रांचा आणि स्तनांचा आकार बदलेला जाणवतो. काहींना या ठिकाणी सूज असल्यासारखे जाणवते. शरीरात हा बदल दिसू लागला की, पिरेड्स जवळ आले हे अनेकांना कळून चुकते. तुम्हालाही पिरेड्सच्या आधी असे काही होत असेल तर तुम्हालाही पुढच्या वेळी पिरेड्स समजण्यास मदत होऊ शकेल.
पिरेड्समध्ये तुम्ही तर करत नाही या 5 चुका (5 mistakes every girl do in her periods)
अंग सूजल्यासारखे वाटणे
shutterstock
छाती जड वाटण्यासोबतच काहींना अंग देखील सुजल्यासारखे वाटू लागते. दोन दिवसांपूर्वी होणारे कपडे उगाचच अंगावर खूप तंग वाटू लागतात. शिवाय काहींना पायाला सूज येणे. पोट सुटणे किंवा चेहरा सुजल्यासारखेही वाटू लागते. अशी काही लक्षणे दिसली की हमखास तुमची पिरेड्स जवळ आले असे समजावे.
सतत काहीतरी खावेसे वाटणे
shutterstock
इतरवेळी काहीही खाण्याची इच्छा नसली तरी काही जणांना पिरेड्समध्ये आणि पिरेड्स येण्याच्या काळात खूप काही खावेसे वाटते. खाण्याची ही हौस इतकी वाढते की, मिट्ट गोड, तिखट चटपटीत खाण्याचा मोह आवरत नाही. शेवपु री, पाणीपुरी, इडली चिली, चॉकलेट सँडवीच, मसाला टोस्ट अशी पदार्थांची नाव जरी घेतली तरी सुद्धा ती खावीशी वाटतात. सतत काहीतरी समोर असावे आणि आपण ते खात राहावे असे सतत वाटत राहते.
पिरेड्सच्या दिवसांमध्ये दुखतं पोट, जाणवतो थकवा मग हे नक्की करा
जर तुम्हालाही यापैकी काही लक्षणं जाणवतं असतील तर मग तुमची मासिक पाळी जवळ आली हे समजावे.