Planning

लग्नाच्या एक महिन्याआधी करून घ्या ही कामं

Aaditi Datar  |  Mar 11, 2020
लग्नाच्या एक महिन्याआधी करून घ्या ही कामं

लग्नाचा दिवस हा प्रत्येकासाठी खास असतो. अगदी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा घेतानाही लग्नाचा दिवस हमखास आठवतो. अशा या दिवसाची वाट प्रत्येकजण पाहत असतो. मग त्यात तुम्ही, तुमचे घरचे आणि अगदी मित्रपरिवारही सामील असतो. त्यामुळे सगळेच जण लग्नाच्या तयारीला कित्येक महिने आधीच लागलेले असतात. जसं जशी लग्नाची तारीख जवळ येते तसं घरातल्यांच्या आनंदालाही उधाण येते आणि थोडं टेन्शनही येतंच. अशावेळी लग्नाला एक महिना बाकी असेल तर तयारीबाबत सगळेच थोडं का होईन हायपर होतात. मग पाहूया कोणती कामं तुम्ही एक महिनाआधीच केली तर लग्नाच्या शुभेच्छा (Marriage Wishes In Marathi) देताना सगळेच तुमच्या लुकचं कौतुक करतील.

Shutterstock

लग्नाला काहीच दिवस उरले आहेत म्हटल्यावर काय आधी करावं आणि काय नाही ते कळतच नाही. गडबडीच्या नादात ज्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे त्या नेमक्या राहून जातात. अशावेळी नवरा नवरीने सर्वात आधी लिस्ट बनवून घ्यावी आणि त्यानुसार काम करून घ्यावी. 

लग्नासाठी जसं तुम्ही पार्लर एक्सपर्ट आधी बुक करता तसंच तुमच्या केसांकडे, शरीरांकडे आणि मुख्य म्हणजे दातांकडेही लक्ष दिलंच पाहिजे. कारण दात सुंदर असतील तर फोटोही नक्कीच छान येतील. त्यामुळे लग्नाच्या एक महिन्याआधी नीट डेंटल हेल्थ चेकअप करून घ्या. गरज असल्यास दातांना पॉलिशही करून घ्या. 

लग्नाच्या तयारीत काही दिवस बाकी राहिले असताना आजारी पडल्यास सगळ्याच मजेची कुस्करी होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला काही त्रास होत असल्यास किंवा सर्दी-खोकला झाला असल्यास दुर्लक्ष करू नका. हातपाय किंवा कंबर दुखत असेल तर डॉक्टरांची भेट घ्या. घरातील सर्व सदस्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्या आणि घरात आवश्यक औषधं व फर्स्ट एड आणून ठेवा.

Shutterstock

पर्सनल केयरपासून दागिने आणि कपड्यांपर्यंत तुम्हाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची गरजही पडणार आहेच. त्यामुळे शॉपिंगला जाण्याआधीही तुम्हाला काही तयारी करायला हवी. जसं ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्याची लिस्ट बनवून घ्या. कारण एकदा पाहुणे घरी येऊ लागले किंवा घरात लग्नाचे विधी सुरू झाल्यावर तुम्हाला घराबाहेर पडता येणं शक्य नसतं. त्यामुळे एक महिना उरलेला असतानाच गरजेच्या गोष्टींचं शॉपिंग करून घ्या. 

खरंतर लग्नात सुंदर दिसायचं असल्यास तुम्ही फक्त एक आठवडा नाहीतर किमान एक महिना आधी ब्युटी ट्रीटमेंटला सुरूवात करायला हवी. काही वेळा ब्युटी ट्रीटमेंटमुळे त्वचेला अलर्जी होण्याची शक्यता असते. जी बरं व्हायला वेळ लागू शकतो. त्यामुळे एक महिन्याआधी ट्रीटमेंटला सुरूवात केल्यास योग्य राहील. म्हणजे नेमक्या लग्नाच्या काही दिवस आधी अलर्जी होऊन लुक खराब होणार नाही. 

तुम्ही लग्नाच्या कामात किंवा ऑफिसच्या कामात कितीही बिझी झालात तरी एकमेकांना नक्की वेळ द्या. कारण लग्नाआधीचे दिवस हे परत येत नाहीत आणि तो काळही. यामुळे लग्नाआधी तुमचं बाँडिगही चांगल होईल आणि तुम्ही एकमेकांना चांगल समजूनही घ्याल. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना हे दिवस नक्की आठवतील. 

Shutterstock

मग लग्नाला एक महिना राहिला असेल तर वरीलप्रमाणे प्लॅनिंग करा आणि मस्तपैकी लग्नाआधी रिलॅक्स करून एन्जॉय करा.

हेही वाचा –

लग्न ठरलंय, पण भविष्याचा विचार केलाय का

मैत्रिणीचं लग्न ठरलंय? मग तुमच्या मनात हे विचार हमखास येणार

बाॅलीवूड सेलिब्रिटीज ज्यांचा साखरपुडा झाला पण लग्न मोडलं

Read More From Planning