Recipes

बेकिंग करताना उपयोगी पडणाऱ्या सोप्या टिप्स

Aaditi Datar  |  May 4, 2020
बेकिंग करताना उपयोगी पडणाऱ्या सोप्या टिप्स

आपण नेहमी बाजारात जातो तेव्हा बिस्कीट किंवा कुकीज हे मुलांसाठी विकत घ्यावचं लागतं. वाढदिवस म्हटल्यावर तर प्रत्येकासाठी हमखास केक ऑर्डर केला जातो. बरेचदा आपण घरीसुद्धा बेकिंगचा प्रयत्न करतो पण तितकासा यशस्वी न झाल्यास आपण बाहेरूनच आणण्याला पसंती देतो. पण आता टेन्शनच काम नाही. तुम्हाला जर बेकिंगची आवड असेल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत बेकिंगच्या काही सोप्या ट्रिक्स. ज्या वापरून तुम्हाला घरच्या घरी कुकीज आणि केक करता येईल.

Canva

मापासाठी साहित्य : बेकिंग करताना सर्वात आधी आवश्यक लागणारं साहित्य आहे मापाचे चमचे आणि इतर साहित्य. कारण जर योग्य माप घेऊन घटक मिश्रणात टाकले नाहीतर केक बिघडू शकतो. अनेकदा यामुळे तुमची रेसिपी फसू शकते. अशावेळी तुमच्याकडे मेजरमेंट स्पून आणि कप्स असणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी योग्य मापाने घटक वापरून केक बनवणं सोपं जाईल. 

इलेक्ट्रीक व्हिस्करचा वापर : बेकिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते सर्व घटक व्यवस्थित मिक्स करणं. जितकं चांगल्या पद्धतीने तुम्ही मिक्स कराल तेवढं चांगलं ते बेक होईल. त्यामुळे जर तुमच्याकडे इलेक्ट्रीक व्हिस्कर असेल तर त्याचा वापर नक्की करा. व्हिस्करमध्ये दोन प्रकार असतात. हँड व्हिस्कर आणि इलेक्ट्रिक व्हिस्कर. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक व्हिस्कर नसेल तर तुम्ही साध्या व्हिस्करचा वापर करू शकता. पण जर शक्य असल्यास इलेक्ट्रिक व्हिस्करचाच वापर करा. ज्यामुळे बेकिंग अगदी सोपं होईल. 

अंड्याचा वापर करताना : जर तुम्ही केक किंवा कुकीज बनवताना अंड्याचा वापर करणार असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. अंड थेट फ्रिजमधून काढून केकच्या मिश्रणात मिक्स करून नका. सर्वात आधी ते रूम टेंपरेचरला आणा आणि मगचे मिक्स करा. यामुळे तुमचा केक जास्त स्पाँजी होईल. 

कुकीज कटरचा वापर : केकचं डेकोरेशन एक मोठी जबाबदारी असते. जर तुम्हाला तुमचा केक छान आणि सोप्या रितीने डेकोरेट करायचा असेल तर तुम्ही कुकीज कटरचा वापर करू शकता. यामुळे तुम्हाला केक सजवणं सोपं जाईल आणि केकही छान दिसेल. लक्षात घ्या कधीही केक सजवताना बेकिंग डिशवर फॉईल पेपर लावायला विसरू नका.

फक्त नूडल्स नाही मॅगीपासून बनवा वेगवेगळ्या डिशेस

Canva

सोप्या केक रेसिपीज

मग तुम्हीही पुढच्या वेळी बेकिंगची आवड असल्यास या सोप्या टिप्सचा वापर नक्की करा. तुम्हाला या टिप्स नक्कीच उपयोगी ठरतील. तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. 

You Might Like These

नॉनव्हेज रेसिपी करा ट्राय (Non Veg Recipes In Marathi)

घरच्या घरी बनवा व्हॅनिला केक आणि द्या सरप्राईज

चॉकलेट एगलेस केक रेसिपी

Read More From Recipes