आरोग्य

नवजात बाळाच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्स

Dipali Naphade  |  Feb 28, 2020
नवजात बाळाच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्स

घरात नवजात बाळाचा जन्म झाल्यानंतर सगळ्यांचे हजारो सल्ले येत असतात. पण नवजात बाळाच्या त्वचेची नक्की काळजी कशी घ्यायची हा प्रश्न आपल्याला नेहमीच सतावत असतो. कितीही सांगितलं तरी डॉक्टरांचा सल्ला हा सहसा आपण मानतोच. आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी आपल्या घरातील मोठ्या माणसांचे उपाय आणि काळजी आपण घेतच असतो. पण नक्की बाळाची काळजी घेण्याची कोणती योग्य पद्धत आहे, उत्पादने निवडताना नक्की काय गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात या सगळ्याबाबत ‘POPxo मराठीने’ जाणून घेतले, अमेरिकन अकॅडेमी ऑफ पेडिएट्रिक्सचे (एफएएपी) फेलो आणि कॅलिफोर्निया, वलेन्सीया मधील डिस्कव्हरी पेडिएट्रिक्सचे सह-संस्थापक डॉ. पॉल एस. होरोविट्झ यांच्याकडून. डॉ. पॉल हे जे अँड जे कन्ज्युमर आयएनसी ने आयोजित व प्रायोजित केलेल्या क्लिनिकल रिसर्च स्टडीज चे प्रिन्सिपल इन्व्हेस्टीगेटर आणि एक लेखकही आहेत

नवजात बाळाला अंघोळ घालण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती?

Shutterstock

बाळांना दर २ ते ३ दिवसांनी अंघोळ घालण्याची गरज असते.  त्यांच्या त्वचेच्या स्वच्छतेसाठी फक्त पाणी पुरेसे ठरत नाही.  लहान बाळांसाठी सुरक्षित असल्याचे सिद्ध झालेले क्लिंजर वापरणे योग्य ठरते.  अंघोळीसाठी पाणी कोमट आणि बाळाला आरामदायी वाटेल असे असावे.  लहान बाळांच्या अंगातून बऱ्याच प्रमाणात उष्णता अतिशय पटकन बाहेर निघून जात असते त्यामुळे बाळाला ज्या खोलीत अंघोळ घालणार आहात ती खोली स्वच्छ, चांगली आणि उबदार असावी.  बाळाला अंघोळ घालताना तुमचा हात कायम त्यांच्या अंगावर असावा, कपडा किंवा क्लिंजर अशी कोणतीही वस्तू घ्यायची झाल्यास बाळाच्या अंगावरील तुमचा हात अजिबात बाजूला होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे.

बाळाला अंघोळ घालणे ही बाळासोबत बोलण्याची, त्याला / तिला गाणी म्हणून दाखवण्याची आणि बाळाला मसाज करण्याची देखील अतिशय उत्तम संधी असते.  अशा वेगवेगळ्या गोष्टी करून तुम्ही बाळाच्या अंघोळीच्या वेळेचा खूप चांगला उपयोग करून घेऊ शकता.  अंघोळ पूर्ण झाल्यावर बाळाचे अंग हलक्या हाताने पुसून कोरडे करा आणि त्यावर एखादी क्रीम लावा जेणेकरून त्यांच्या त्वचेवरील संरक्षक आवरण कायम तसेच राहील.

घरातील ‘या’ गोष्टींमुळे पोटात असणाऱ्या बाळावर होऊ शकतात दुष्परिणाम

बाळासाठी स्किनकेअर उत्पादने निवडताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात?

बाळांसाठी सर्वोत्तम स्किनकेअर उत्पादने बनवताना नवजात बाळाच्या त्वचेच्या विशिष्ट गरजा आणि त्याची खास वैशिष्टये लक्षात घेतली जातात.  त्यामध्ये सुगंध असेल तर तो बाळांसाठी सुरक्षित असल्याचे सिद्ध करण्यात येते. उत्पादनाचे पॅकिंग योग्य प्रकारे असणे तसेच ते उत्पादन नवजात बाळांच्या त्वचेवर वापरण्यासाठी सुरक्षित असल्याचे देखील सिद्ध झालेले असले पाहिजे.  नवजात बाळांच्या त्वचेसाठी वापरावयाचे कोणतेही उत्पादन हे एका हाताने वापरता येईल अशाप्रकारे पॅक केलेले असावे जेणेकरून दुसरा हात कायम बाळासोबत ठेवता येतो.

नवजात बाळाच्या आईला माहीत हव्या ‘या’ 4 कंफर्टेबल ब्रेस्टफिडींग पोझिशन्स

नवजात बाळाला मसाज करणे महत्त्वाचे असते का? याचे काय तंत्र असावे?

Shutterstock

नवजात बाळांना मसाज केल्याने त्यांच्या शरीरातील विविध संवेदना जागृत होतात, बाळ आणि पालक यांच्यात प्रेम आणि आपुलकीचे सुंदर नाते निर्माण होण्यासाठी मसाज खूप उपयुक्त ठरतो.  वयाच्या पहिल्या दोन वर्षात दर सेकंदाला 40 हजार या वेगाने नवीन ब्रेन कनेक्शन्स विकसित होत असतात.  शरीरातील विविध संवेदनांना उत्तेजना मिळाल्यामुळे बाळांच्या संज्ञानात्मक, शारीरिक, भावनिक वाढीत मदत होते.

वाचा – बाळाच्या नामकरण विधीसाठी सुंदर मेसेज

खूप जोर देऊन मसाज करू नये, त्यामुळे बाळाच्या नाजूक त्वचेला इजा पोहोचण्याची शक्यता असते.  हलक्या हाताने, क्रमाक्रमाने मसाज करणे ही सर्वात योग्य पद्धत आहे.  बाळासाठी सौम्य आणि सुरक्षित म्हणून सिद्ध झालेले तेल, लोशन किंवा क्रीम यांचा वापर करावा.  भरपूर प्रमाणात ओलेइक ऍसिड असलेली तेले बाळाच्या त्वचेवर वापरू नयेत, मोहरीचे तेल अजिबात वापरू नये.  बाळांच्या नाजूक त्वचेसाठी खास बनवण्यात आलेली सौम्य आणि सुरक्षित म्हणून सिद्ध झालेले तेल किंवा दुसरे मलम वापरावे.  लहान बाळांना मसाज केल्याने बाळाला तसेच पालकांना देखील खूप फायदा मिळतो.

आईला असेल ताप आणि सर्दी, तर बाळाला स्तनपान करावे का

नवजात बाळाची काळजी घेताना पालकांकडून केल्या जातात अशा तीन हमखास चुका कोणत्या?

1.  फक्त पाण्याने अंघोळ घालणे.  नवजात बाळांना अंघोळ घालताना बाळांसाठी खास बनवण्यात आलेले क्लिंजर वापरावे, अंघोळीनंतर क्रीम लावावे.  मोहरीचे किंवा ऑलिव्ह तेल अजिबात वापरू नये.

2.  बाळांसोबत असताना बरेच पालक त्यांच्या फोनमध्ये व्यस्त असतात.  खरे तर पालकांचे संपूर्ण लक्ष बाळाकडे असायला हवे, बाळाचा आणि पालकांचा चेहरा समोरासमोर असायला हवा, बाळाची सर्व इंद्रिये जागृत होतील अशाप्रकारे त्याला खेळवले गेले पाहिजे.

3.  दुर्दैवाने अनेक माता बाळाला अंगावर पाजणे लगेचच बंद करतात.  योग्य मदत घेऊन आणि धीर बाळगून जवळपास सर्वच महिला आपल्या बाळांना अंगावरचे दूध पोटभर पाजू शकतात आणि बाहेरच्या दुधाचा पर्याय टाळू शकतात.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

नवजात बाळाच्या जन्माच्या घोषणेसाठी संदेश

Read More From आरोग्य