DIY सौंदर्य

थंडीतही वापरायची असेल मॅट लिपस्टिक तर वापरा या सोप्या टिप्स, होणार नाहीत ओठ कोरडे

Dipali Naphade  |  Dec 21, 2020
थंडीतही वापरायची असेल मॅट लिपस्टिक तर वापरा या सोप्या टिप्स, होणार नाहीत ओठ कोरडे

सगळीकडेच हळूहळू बऱ्यापैकी थंडावा पसरू लागला आहे. थंडीमध्ये केवळ त्वचाच नाही तर त्यासह ओठही कोरडे पडतात. तुम्ही थंडीत कितीही लिप बाम अथवा तूप लावले तरीही ओठांचा कोरडेपणा हा राहतोच. थंडीमुळे केवळ कोरडेपणाच नाही तर ओठ फाटण्याचे प्रमाणही वाढते. त्यामुळे ओठांचा लुक खराब होतो. या दिवसात मॅट लिपस्टिक लावायची असेल तर नक्कीच त्रास होतो. मॅट लिपस्टिक ही सध्या ट्रेंडमध्ये आहे पण यामध्ये मॉईस्चर कमी असतं त्यामुळे ओठ कोरडे पडल्यानंतर त्या लिपस्टिकचा उपयोग होत नाही आणि लिपस्टिक लावल्याने ओठ ओढल्यासारखेही वाटतात. मग अशावेळी थंडी मॅट लिपस्टिकच लावायची नाही का असा प्रश्न जर निर्माण झाला तर त्याचं उत्तर नक्कीच लावायची नाही असं नाही. तुम्हाला जर थंडीच्या दिवसात मॅट लिपस्टिक वापरायची असेल तर तुम्ही आम्ही सांगितलेल्या टिप्सचा वापर करू शकता. त्यामुळे ओठ कोरडे पडणार नाहीत आणि तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मॅट लिपस्टिकचा वापर करता येईल. जाणून घेऊया काय आहेत या सोप्या टिप्स. 

लिप स्क्रब

थंडीमध्ये ओठ कोरडे होतात आणि फुटतात. कोरड्या ओठांवर मॅट लिपस्टिक लावल्याने ओठांचा कोरडेपणा अधिक वाढतो. कारण यामध्ये मॉईस्चराईजरची कमतरता असते. ओठांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी आणि मॅट लिपस्टिक लावण्यापूर्वी तुम्ही ओठांना स्क्रब करायला हवा. लिप स्क्रब केल्याने ओठांंवरील डेड स्किन सेल्स नीट होतात. यासाठी तुम्ही साखर आणि नारळाच्या तेलाचा वापर करा. नारळाच्या तेलात साखर मिसळून व्यवस्थित क्रश करून घ्या. त्यानंतर तुमच्या ओठांना लावा. यामुळे ओठ मऊ आणि मुलायम होण्यास मदत मिळते. ओठांना स्क्रब केल्यानंतरच तुम्ही मॅट लिपस्टिकचा वापर करा.

गुलाबी रंगाचे ओठ हवे असतील तर करा घरीच Lip Balm तयार

लिप बामचा करा वापर

Shutterstock

कोणत्याही हंगामात ओठांची काळजी घेण्यासाठी तुम्ही लिप बामचा वापर करायला हवा. लिप बामचा वापर केल्याने ओठ हायड्रेट राहतात. तसंच ओठांवर लिप बाम लावल्याने तुमचे ओठ अधिक मऊ आणि मुलायम राहतात. तुम्ही मॅट लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना लिप बाम लावलात तर ओठ कोरडे पडत नाहीत. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा मॅट लिपस्टिक लावताना आधी लिप बामचा वापर करावा. 

फक्त लिपस्टिक नाही तर ‘हे’ 5 Lip Balm करतील तुमच्या ओठांना अधिक आकर्षक

लिप मास्कचाही करून घ्या उपयोग

थंडीमध्ये कधी कधी लिप बामचा वापर करूनही ओठांचा कोरडेपणा जात नाही. मुळात ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांना हा त्रास जास्त होतो. अशावेळी ओठांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तुम्ही लिप मास्कचा उपयोग करून घेऊ शकता. लिप मास्कचा वापर करून तुम्हाला ओठांना योग्य पोषण देता येतं. त्यामुळे ओठ अधिक मुलायम राहतात. तसंच ओठांवर लिप मास्कचा वापर केल्यानंतर तुम्हाला बिनधास्त मॅट लिपस्टिक लावता येते. 

स्किनटोननुसार परफेक्ट न्यूड लिपस्टिक कशी निवडावी

क्रिमी मॅट लिपस्टिक वापरा

थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही क्रिमी मॅट लिपस्टिकचाही वापर करू शकता. बऱ्याच मॅट लिपस्टिक या क्रिमी नसतात. पण तुम्ही अशाच मॅट लिपस्टिकची निवड करा ज्या क्रिमी असतील. तुम्हाला मॅट फिनिशसह अनेक क्रिमी लिपस्टिक बाजारामध्ये मिळतात. ज्या तुमचे ओठ मऊ आणि मुलायम राखण्यासाठी मदत करतात. तसंच तुमच्या ओठांंना दिवसभर कोरडे होऊ देत नाहीत. त्यामुळे तुम्ही थंडीच्या दिवसांमध्येही बिनधास्त मॅट लिपस्टिकचा वापर करू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य