DIY फॅशन

नवीन वर्षी असं करा तुमचं वॉर्डरोब अपडेट

Trupti Paradkar  |  Dec 30, 2020
नवीन वर्षी असं करा तुमचं वॉर्डरोब अपडेट

नवीन वर्षाची सुरूवात उत्साह आणि आनंदात झाली आहे. हा उत्साह असाच वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी काही खास गोष्टी करायला हव्या. मागच्या वर्षीच्या कडू आठवणी पुसून टाकण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. जसं की नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तुमचं वॉर्डरोब अपडेट करणं. मागचं गेलं वर्षभर घरातच कोंडून पडल्यामुळे आणि वर्क फ्रॉम होममुळे वॉर्डरोबकडे विशेष लक्ष देता आलं नाही. मात्र त्याची सर्व कसर तुम्ही या वर्षी भरून काढून शकता. शिवाय नवीन वर्षात नवनवीन ठिकाणी फिरण्यासाठी, ऑफिसला जाण्यासाठी तुम्हाला तुमचं वॉर्डरोब अपडेट करावंच लागणार. यासाठीच जाणून घ्या या खास टिप्स

सर्वात आधी जुन्या वस्तू आणि कपडे वेगळे करा –

मागच्या वर्षीचे कपडे आणि वॉर्डरोबमधील नको असलेल्या वस्तू वेगळ्या करा. कारण एखादी नवीन गोष्ट मिळण्यासाठी आधी जुनी गोष्ट बाजूला करावी लागते. जुने कपडे फिकट झाले असतील, विरले असतील अथवा आता तुम्हाला त्याचं फिटिंग येत नसेल असे कपडे बाजूला करा. ज्यामुळे वॉर्डरोबमध्ये पुरेशी जागा निर्माण होईल. त्याचप्रमाणे या जुन्या कपड्यांची कृतज्ञता व्यक्त करा कारण त्यांनी तुम्हाला काही वर्षे खास लुक करण्यासाठी मदत केली आहे. त्याचप्रमाणे त्यातील चांगल्या अवस्थेत असलेले कपडे धुवून इस्त्री करा आणि गरजू लोकांना भेट द्या. ज्यामुळे त्यांची नवीन वर्षाची सुरूवात आनंदात होईल.

Instagram

शॉपिंगसाठी खास प्लॅन करा –

नवीन वर्षासाठी शॉपिंग करण्यासाठी खूप प्लॅनिंग करावं लागेल. कारण एकदम सर्व शॉपिंग करणं सर्वांनाच नक्कीच परवडणार नाही. यासाठी सर्वात महत्त्वाचे असलेले  आणि गरजेचे कपडे, वस्तू विकत घ्या. यासाठी पहिले काही महिने ठराविक रक्कम बचत करा. ज्यामुळे तुम्हाल तुमचे वॉर्डरोब अपडेट करता येईल. शिवाय  न्यू इअरचे सेल सुरू असताना शॉपिंग करा ज्यामुळे तुमचे पैसे वाचतील.

तुमच्या वॉर्डरोबमध्ये काय काय असायला हवं –

तुमच्या वॉर्डरोबमध्ये या गोष्टी आहेत का ते  तपासा आणि नसतील तर त्या खरेदी करा.

वेस्टर्न आऊटफिटसाठी –

डेनिम जीन्स, डार्क रंगाच्या एक ते दोन पॅंट, शॉर्ट पॅंट ब्लॅक आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट, दररोज वापरण्यासाठी आरामदायक टॉप आणि टी शर्ट, स्कार्फ, क्रॉप टॉप, जॅकेटचे काही प्रकार, पेन्सिल स्कर्ट, लॉंग स्कर्ट, शॉर्ट स्कर्ट, फॉर्मल पॅंट आणि शर्ट, जेगिग्ज

ट्रेडिशनल आऊटफिटसाठी –

कलमकारी, इकत, लखनवी, चिकनचे कुर्ते, काही इथनिक पंजाबी ड्रेस, एक ते दोन ट्रेडिशनल लेंगा, बनारसी आणि महेश्वरी दुप्पटा, खणाचा ड्रेस अथवा साडी, काळ्या, सोनेरी आणि मल्टीकलर रेडिमेड ब्लाऊज, कॉटनचे आरामदायक कुर्ते आणि मॅचिंग लेगिग्ज

इतर आऊटफिट आणि एक्सेसरिज –

 

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

साडी पेटीकोट विषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का

साडीत स्लिम आणि उंच दिसायचं असेल तर या टिप्स करा फॉलो

हिवाळ्यात ट्रॅव्हल करताना कॅरी करा हे सेलिब्रेटी स्टाईल पफर जॅकेट

Read More From DIY फॅशन