DIY फॅशन

या थंडीत ट्राय करा हे ट्रेंडी कुल जॅकेट्सचे प्रकार

Leenal Gawade  |  Nov 17, 2020
या थंडीत ट्राय करा हे ट्रेंडी कुल जॅकेट्सचे प्रकार

थंडी सुरु झाली की, आपल्या कपड्यांमध्ये आपोआपच फरक पडू लागतो.या दिवसात सुरकुतलेली त्वचा पाहता आपल्याला स्लिव्हलेस किंवा शॉर्ट बाह्या असलेले कपडे घालण्याची इच्छा होत नाही. अशावेळी कपड्यांवर मस्त ट्रेंडी जॅकेट्स घालावेसे वाटतात. आपल्या देशातील काही भागात थंडी ही फार पडत नाही. त्यामुळे अशा थंडीत आपल्याला फार मोठे, जाडजूड जॅकेट घालता येत नाहीत. अशावेळी तुम्ही तुमच्यासाठी कुल, हलके- फुलके आणि ट्रेंडी जॅकेट्स निवडायला हवे. तुम्हाला असे जॅकेट्स शोधण्यासाठी फार कष्ट घ्यायला लागू नये म्हणून आम्हीच तुमच्यासाठी असे जॅकेट्स शोधले आहेत

बॉडीकॉन ड्रेस वापरायचे असतील तर लक्षात ठेवा या टिप्स

बॉम्बर जॅकेट (Bomber Jacket)

बॉम्बर जॅकेट हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारचे जॅकेट अनेकांच्या आवडीचे ठरत आहे. हे जॅकेट फार लांब नसते. हे जेमतेम कंबरेपर्यंत येईल इतके असते.  या जॅकेट्सचे हात लांब असतात. पण यासाठी वापरला जाणारा कपडा हा फार हलका असतो. तुम्हाला अगदी कुठेही आणि कोणत्याही बॅगमध्ये हे जॅकेट पटकन मावते. जर तुम्हाला जॅकेट्स घालायला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये छान भडक रंग निवडू शकता. हलके असल्यामुळे हे जॅकेट पटकन वाळते.

ब्लेझर कोट ( Blazer Coat)

ब्लेझर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण काही कालावधीपासून ब्लेझर जॅकेट हा प्रकार फारच प्रसिद्ध होऊ लागला आहे. ब्लेझर जॅकेट्स हा प्रकार थोडा लांब असतो. तो तुम्हाला अगदी कोणत्याही वेस्टर्न आऊटफिटवर आरामात घालता येतो.ऑफिसमध्ये किंवा एखाद्या पार्टीला जाण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.यामध्ये तुम्हाला थंडी मुळीच वाजत नाही. या ब्लेझर कोटमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स मिळतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याची निवड करु शकता. 

जीन्सवर घालता येतील असे लाँग टॉप्सचे प्रकार (Long Tops For Jeans In Marathi)

लाईटवेट डेनिम जॅकेट (Lightweight Denim Jacket)

डेनिम जॅकेट अनेकांना आवडते. पण ते कुठे न्यायचे म्हटले की, अनेकांच्या डोक्याला ताप होतो. जागा अडून राहू नये म्हणून दिवसभर हे जॅकेट घालावाे लागते. यालाच पर्याय म्हणून काही हलक्या डेनिम मटेरिअलमध्ये अशा प्रकारते जॅकेट मिळतात. तुम्ही अगदी आरामात त्याचा उपयोग करु शकता. असे लाईटवेटेड जॅकेट दिसायला फारच चांगले दिसते. तुम्ही याची स्वच्छथाही अगदी आरामात करु शकता. 

बेसबॉल जॅकेट (Baseball Jacket)

जर तुम्हाला स्पोर्टस प्रकारातील जॅकेट आवडत असतील तर तुम्ही बेसबॉल जॅकेट वापरु शकता. हे जॅकेट ही एखाद्या बॉम्बर जॅकेट प्रमाणे असते. यामध्ये फरक इतकाच असतो की, तुम्हाला यामध्ये एखादे स्पोर्टस सिंबॉल किंवा खेळाशी संबंधित काहीतरी असते. त्यामुळे असे जॅकेट्स तुमच्या अगदी कोमत्याही प्रकारच्या कपड्यांचा लुक वाढवतात आणि तुम्हाला थंडीपासून वाचवतात. 

पारदर्शक जॅकेट (Transparent Jackets)

आता सगळ्यात जॅकेटचे काम थंडीपासून वाचवणे असे असले तरी काही जॅकेट्स हे स्टाईल्ससाठी असतात. त्यापैकीच एक म्हणजे पारदर्शक जॅकेट्स.जाळीदार असे हे जॅकेट्स आरपार असते ते उठून दिसावे यासाठी त्याच्यामध्ये रंगाचा वापर कॉलर, हातांच्या कडा आणि जॅकेटचा पोटाकडील भाग याकडे केला जातो. त्यामुळे हे जॅकेट अधिक उठून दिसते. 


आता थंडीत काही कूल ट्राय करायचे असेल तर हे काही पर्याय नक्की वापरुन पाहा

ट्युब टॉपचे स्टायलिश आणि हटके प्रकार (Tube Tops For Women In Marathi)

Read More From DIY फॅशन