घरात मुलांचा जन्म होणे म्हणजे आनंदाचे वातावरण. पहिली दोन वर्ष कशी निघून जातात हेदेखील कळत नाही. पण एकाच वेळी घरात दोन मुलं झाली की दुप्पट आनंद घेऊन येतात. जुळ्या मुलांचा जन्म घरात झाला की, एक वेगळेच वातावरण असते. अगदी आपल्याला जुळी मुलं होणार आहेत हे कळल्यानंतर जुळी मुले असतील की जुळ्या मुली असतील इथपासून आपण विचार करू लागतो. मग सर्वात पहिला विचार मनात येतो तो म्हणजे जुळ्या मुली असतील तर जुळ्या मुलींची नावे (Twin Baby Girl Names In Marathi) काय ठेवायचे अथवा जुळ्या मुलांची नावे (Twins Baby Boy Names In Marathi) काय ठेवायची. इतकंच नाही तर काही जणांना एक मुलगा आणि एक मुलगी एकाच वेळी होतात. अर्थात जुळ्या मुला मुलींची नावे काय असावीत (Girl And Boy Twins Baby Name In Marathi) असाही प्रश्न पडतो. मुलगा झाला तर बाळासाठी कृष्णाची नावे लोक शोधताना दिसतात. मुलींसाठी थोडं गोड आणि नाजूक नाव बघतात. जुळ्या मुलांची नावे मराठीत खास तुमच्यासाठी आम्ही या लेखातून देत आहोत. य वरून मुलींची नावे (Y varun mulinchi nave) ही तुम्ही वाचू शकता.
Table of Contents
- जुळ्या मुलींची नावे (Twin Baby Girl Names In Marathi)
- जुळ्या मुलांची नावे मराठी (Twins Baby Boy Names In Marathi)
- जुळ्या मुला मुलींची रॉयल नावे (Royal Twins Baby Name In Marathi)
- जुळ्या मुलामुलींची नावे (Girl And Boy Twins Baby Name In Marathi)
- जुळ्या मुलामुलींची आधुनिक नावे (Modern Twin Baby Girl & Boys Names In Marathi)
जुळ्या मुलींची नावे (Twin Baby Girl Names In Marathi)
गरोदर असल्यावर जेव्हा कळतं की आपल्याला आता जुळी मुलं होणार आहेत. तेव्हा साहजिकच त्या मुली असतील की मुलं हा विचार आपल्याला मनात येतोच. मग अशावेळी जर जुळ्या मुली झाल्या तर त्यासाठी आपण जुळ्या मुलींची नावे (Julya Mulinchi Nave Marathi) शोधून ठेवतो. अशीच काही सुंदर आणि अप्रतिम जुळ्या मुलींची नावे (Twins Baby Name In Marathi) खास तुमच्यासाठी.
नावे | अर्थ |
आरूषी – आहाना | सूर्याची पहिली किरणे, सूर्याचे पहिले किरण |
आरझू – आकांक्षा | इच्छा, प्रबळ इच्छा असणे |
आशी – अशिता | आनंद, सुख, समाधान |
करिश्मा – कशिश | आकर्षक अशा मुली, अत्यंत सुंदर आणि आकर्षक |
अधाया – आकर्षा | शक्तीशाली, बलशाली, ताकदवान |
मोहिनी – मेनका | सुंदर, अप्सरांची नावे, दिसायला अत्यंत सुंदर अशा |
आशा – अपेक्षा | आशा, कोणतीही चांगली गोष्ट घडणार असा विश्वास असणे, एखाद्याकडून काहीतरी अपेक्षा असणे |
अमिशा – अनाया | सुंदर, अप्रितम |
चारू – चार्वी | दिसायला सुंदर, देखणी |
दीपा – दीपिका | प्रकाश, दैदिप्यमान |
संपदा – संपत्ती | धन, संपत्ती, दौलत |
गरिमा – अनिता | अत्यंत सुंदर पद्धतीने राहणारी, आकर्षक |
हेमा – हेमाक्षी | सोनेरी नयनांची अशी, सुंदर डोळे असणारी |
मेघना – मेघा | ढग, ढगांप्रमाणे गडगडणारी |
राणी – अवंतिका | राणी, राजाची राणी, राणीप्रमाणे जिचा औरा आहे अशी |
आर्या – शौर्या | पार्वतीचे नाव, शक्तिशाली, बलशाली, विश्वासू |
अंजली – गीतांजली | ओंजळ, आदरयुक्त, गाण्याचे एकत्रीकरण, सर्व सूर एकत्र करून म्हटलेली गाणी |
अर्चना – अपर्णा | आदरयुक्त, प्रार्थना, पानांशिवाय असणारे, पार्वतीचे एक नाव |
अस्मिता – सुश्मिता | यश, यमुना नदीचे एक नाव, सुंदर हास्य, गोड हास्य |
काव्या – दिव्या | कवीने लिहिलेली काव्य, कविता, सुंदर, दैदिप्यमान, प्रकाश |
गिरीजा – वनजा | डोंगरामध्ये जन्म घेतलेली, पार्वतीचे एक नाव, जंगलात जन्म घेतलेले, नैसर्गिक |
गीता – गितिका | कविता, हिंदूचे पवित्र पुस्तक, अतिशय लहान गाणे, सुंदर गाणे |
हरिका – विहारिका | पार्वतीचे नाव, अत्यंत मोठे, उच्च |
हसिनी – सुहासिनी | आनंददायी, अप्सरेचे नाव, कायम हसणारी, सतत आनंदी राहणारी |
ऐश्वर्या – सौंदर्या | सौंदर्याची खाण, संपत्तीने कायम भारलेली, सुंदर, अप्रतिम |
इंद्राणी – चंद्राणी | चंद्राची कोर, इंद्राचा अंश |
जया – विजया | दुर्गेचा अवतार, जिंकून येणारी, कायम जिंकणारी, विजयी राहणारी |
ज्योती – ज्योतिका | प्रकाश, आग, प्रकाश देणारी, बुद्धिमान |
कमला – विमला | कमळ, कमळातून जन्म घेतलेली, शुद्ध, पांढरी, सफेद |
कन्या – सुकन्या | मुलगी, अप्रतिम अशी मुलगी |
कविता – सविता | काव्य, सूर्य, सूर्याचा प्रकाश |
किर्तना – संकिर्तना | भजन, किर्तनाचा भाग, देवाची प्रशंसा करणारे किर्तन, संगीताचा प्रकार |
किर्ती – क्रिषी | जगभर होणारी प्रशंसा, शेतीचा भाग, प्रशंसा |
लेखा – सुलेखा | लिखाण, रेषा, चांगले हस्ताक्षर, नशीबवान |
मीनल – लीनल | अत्यंत मौल्यवान खडा, नम्रता, नम्र |
मुक्ती – युक्ती | स्वातंत्र्य, शक्ती, कल्पना |
नव्या – रम्या | तरूण, नवीन, सुंदर, नयनरम्य, अप्रितम असे |
निखिला – निशिता | पूर्ण, शुद्ध, पवित्रता |
वाचा – युनिक अशी म वरून मुलींची नावे
जुळ्या मुलांची नावे मराठी (Twins Baby Boy Names In Marathi)
जुळ्या मुलांची नावे मराठी (Twins Baby Boy Names In Marathi) मध्ये शोधणे तसं कठीण नाही. पण आपल्याला बऱ्याचदा वेगळी नावे हवी असतात. अशीच काही मुलांची नावे खास तुमच्यासाठी.
नावे | अर्थ |
आकाश – प्रकाश | गगन, सूर्याचा प्रकाश |
अभय – निर्भय | एखाद्याला घाबरण्यापासून वाचवणे, भयापासून दूर करणे, विश्वास देणे |
अबीर – कबीर | संत कबीर, टिळ्याचा एक भाग |
अच्युत – अर्चित | विष्णूचे नाव, सन्मानित |
आदेश – संदेश | एखाद्या गोष्टीसाठी मागणे, एखादा निरोप पाठवणे |
आल्हाद – प्रल्हाद | आनंददायी, सुखाचे, उत्साही, हिरण्यकशपूचा मुलगा |
अखिल – निखिल | संपूर्ण, समस्त, सर्व, सारा |
निर्मल – निश्चल | शुद्ध, सचेत, न हलणारा, पवित्र |
अमन – आकाश | शांतता, गगन |
अक्षर – अक्षत | लिखाण, शब्द, पवित्रता |
अमर – प्रेम | कायमस्वरूपी राहणारे प्रेम, एकत्र |
अमित – नमित | अत्याधिक, हद्दीच्या पलीकडील |
अनिश – तनिश | निरंतर, सतत, सुंदर, दागिना |
अनुराज – अनुराग | प्रेम, भक्ती, भावना |
पूर्व – अपूर्व | दिशा, अद्भूत, वेगळे |
अविन – अविक | शक्तिशाली, धैर्यवान, बलशाली |
देव – शिव | देव, भगवान, शंकराचे नाव |
धीर – वीर | धैर्य, वीरता, धैर्यवान, शक्ती |
दिनकर – शुभंकर | सूर्य, शंकाराचे नाव |
सुमेध – सुमेश | समजदार, अत्यंत हुशार |
हितेश – रितेश | सत्य, पर्जन्यदेवता, वेंकटेश्वर भगवान |
जतीन – ललित | शिव, तपस्वी, सुंदर, कोमल, संगीतकार जोडीचे नाव |
जयन – विजयन | विजय, जिंकणे, विजय मिळवणे |
करण – अर्जुन | कर्ण आणि अर्जुन, ऐतिहासिक नावे |
लव – कुश | राम आणि सीतेची मुलं |
मानव – प्रणव | मनुष्य, ओंकार, परमेश्वर |
मयुर – मयांक | मोर, चंद्र, चंद्राचा भाग |
विनय – विनेश | नम्र, पवित्र |
विशाल – विनोद | मोठा, हास्य |
शिशिर – मिहिर | ऋतू, सूर्य |
वैष्णव – वैभव | विष्णू पंथ, संपत्ती, धन, संपदा |
अधिक्य – आदित्य | अधिकार, सूर्य |
अद्विक – अद्वैत | युनिक, वेगळे |
अक्षित – रक्षित | डोळे, सुरक्षा करणारा |
रोमित – सुमीत | महत्त्वाकांक्षी, प्रतिभाशाली, सुंदर शरीर, सुडौल |
अनुज – तनुज | लहान भाऊ, पुत्र |
अर्श – दर्श | क्राऊन, कृष्ण |
अर्थ – समर्थ | एखाद्या गोष्टीला अर्थ असणे, एखादी गोष्ट पेलणारा |
अयान – युवान | सूर्याचे किरण, उगवत्या सूर्याचे किरण, वेगळा, तरूण, मजबूत |
आयुष – खुष | वय, आयुष्य, आनंदी, निरोगी आयुष्य |
जुळ्या मुला मुलींची रॉयल नावे (Royal Twins Baby Name In Marathi)
जुळ्या मुलामुलींची नावे जर तुम्हाला हवी असतील तर तीदेखील आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. मुलगा आणि मुलगी जन्माला आल्यानंतर आपल्याला कॉमन नावे नको असतात. मग अशावेळी रॉयल नावांची यादी आपल्याला हवी असते. जुळ्या मुलामुलींची (Twins Baby Girl And Boy Name In Marathi) रॉयल नावे जाणून घेऊया.
नावे | अर्थ |
अभय – अभया | भीती नसणारे |
अबिश – अबिशा | वडिलांचे, देव |
अजय – आभा | यश, चमकदार, चमकणारे |
आकाश – धरा | गगन, आकाश आणि पृथ्वी |
अक्षय – अक्षया | शाश्वत, नश्वर |
अक्षत – अक्षता | नश्वर, तांदूळ, लग्नविधीच्या वेळी दिला जाणारा आशीर्वाद |
अनिरूद्ध – अनुराधा | सीमा नसणारे, न थांबवता येणारा असा, नक्षत्र |
अनिश – अनिशा | जवळचा मित्र, चांगली मैत्री, अत्यंत जवळचे, प्रकाश, उजेड |
अनुज – अनुजा | लहान भाऊ, लहान बहीण |
अर्पित – अर्पिता | अर्पण करणारे, स्वतःला वाहून घेणारे असे |
अरमान – अर्मिता | इच्छा, आकांक्षा |
आर्यन – आर्या | कोणत्याही शक्तीच्या पलीकडील, शक्तीशाली, देवी दुर्गेचे एक नाव |
आयुष – आयुश्री | वय, आयुष्य वाढवणारे, आशीर्वाद |
भैरव – भैरवी | संगीतातील एक राग, शंकराचे नाव आणि पार्वतीचे नाव |
भूमिश – भूमिका | पृथ्वीचा एक अंश, एखादी व्यक्तिरेखा निभावणे |
दीप – दीपिका | प्रकाश, उजेड |
दीपक – ज्योती | दिव्याचा प्रकाश, वात, सुंदरता |
देव – देवयानी | देव, भगवान, देवता, देवीप्रमाणे |
हर्ष – हर्षिता | आनंद, उल्हास, सुख |
हेमांशु – हेमा | चंद्र, सोनेरी |
हृतिक – हृतिका | मनापासून, हृदयापासून, सत्य, लहानशी नदी |
इशान – इशानी | शिवाचे नाव, शंकाराचे नाव, पार्वतीचे एक नाव, श्रीमंत, राज्य करणारे |
इशांक – ईशान्या | हिमालयाचे टोक, ईशान्य दिशा, पार्वतीचे नाव |
जिगनेश – जिगिषा | तपास, संशोधन, जिंकण्याची इच्छा |
कनिष्क – कनिष्का | काळजी, जुन्या काळातील राजा, बुद्धकालीन नाव |
करण – करिना | कर्ण, शुद्ध |
संजय – संजना | विजय, शांत, स्वभाव |
सौरभ – सुरभी | सुगंध, सुगंधाचा अंश |
केयुर – केयुर | बाजूबंद, दागिना |
कृष्णा – तृष्णा | कृष्णाचे नाव, तहान |
पंकज – पंकजा | कमळाचे नाव, कमळ |
प्रीतम – प्रतिमा | जवळचे, प्रतिबिंब, प्रिय |
खुश – खुशी | आनंद, उत्साह |
मिहीर – मिहिरा | सूर्य, सूर्याचे नाव |
नयन – नयना | डोळे, सुंदर डोळे, चक्षू |
नील – निलांजना | नीळा रंग, डोंगर, निळ्या डोळ्यांची |
नीर – नीरजा | पाणी, जल, कमळ, कमळात उगवलेली |
पारिजात – प्राजक्ता | पारिजातकाचे झाड, फुल |
निशित – निशिता | जलद, मध्यरात्र, तीक्ष्ण |
प्रयुष – प्रयुषी | अत्यंत शुद्ध, पवित्र |
Family Whatsapp Group Names In Marathi
जुळ्या मुलामुलींची नावे (Girl And Boy Twins Baby Name In Marathi)
जुळ्या मुला मुलींची नावे तुम्ही तुमच्या बाळांसाठी शोधत असलात तर अर्थासह तुम्ही ही नावे नक्कीच जाणून घेऊ शकता
नावे | अर्थ |
प्रियम – प्रियंवदा | प्रिय, आपलासा, जवळचा |
मनिष – मनिषा | इच्छा, आकांक्षा |
नमन – निमिषा | नमस्कार, आनंद, एखाद्याला सुख देणे |
प्राकृत – प्रकृती | निसर्ग, नैसर्गिक असणारे |
पुनीत – पुनिता | शुद्ध, अत्यंत पवित्र असे |
राज – रजनी | राजा, रात्र |
रक्षित – रक्षिता | सुरक्षा करणारे |
रंजीत – रंजिता | विजय, जिंकून येणारे |
ऋषी – राशी | संत, ऋषीमुनी, एकावर एक ठेवलेले सामान, संपत्ती |
ऋषभ – ऋचा | बैल, स्त्रोत्र, वेद मंत्र |
रितेश – रितू | सत्यदेवता, हंगाम, ऋतू |
सनय – सान्या | अत्यंत जुने, जे कायम टिकून राहते, शनिवारच्या दिवशी जन्म झालेली |
संजित – संजिता | नेहमी जिंकणारा, बासरी |
संतोष – संतोषी | समाधानी, आनंदी, पार्वतीचा अवतार, देवी |
सत्या – नित्या | सत्य बोलणारा, नित्यनियमित |
शक्ती – भक्ती | शक्तीशाली, बलवान, एखाद्या देवावर असणारी श्रद्धा |
शनय – शनाया | जुने, टिकून राहणारे, सूर्याचे पहिले किरण |
शिखर – शिखा | डोंगराचे टोक, शेवटचे टोक |
श्रेय – श्रेया | एखाद्या गोष्टीबाबत चांगले बोलणे, शाबासकी देणे, लक्ष्मीचे नाव |
श्वेत – श्वेता | पांढरा, सफेद, पांढराशुभ्र असा |
सुचेत – सुचिता | अत्यंत हुशार आणि संवेदनशील |
सुमेध – सुमेधा | हुशार आणि संवेदनशील असणारे |
तनय – तान्या | मुलगा, कुटुंबातील मुलगी |
तेज – तेजस्वी | अत्यंत दैदिप्यमान, प्रकाश, उजेड, डोळे दिपवणारे |
उदित – उदिती | चमकदार, वृद्धी |
उन्नत – उन्नती | वाढ, वृद्धी, संपत्तीत होणारी वाढ, सुख, समाधान |
वैभव – वैभवी | वाढणारी संपत्ती, धन, संपदा |
वेद – वेदा | मंत्र, पवित्र, अत्यंत पवित्र, शुद्ध |
विद्युत – विदुषी | वेग, हुशार, अत्यंत बुद्धिमान |
यश – यशस्वी | प्रसिद्धी मिळवणारे, यशवंत |
रौनक – रोशनी | प्रकाश, उजेड |
पूर्वश – पूर्वी | पूर्वेकडून, पूर्व दिशेकडून |
प्रतीक – प्रतिक्षा | एखाद्या गोष्टीसमान, एखाद्याची वाट पाहणे |
संकेत – संहिता | एखाद्या गोष्टीबाबात आधीच जाणवणे, पाठ, लिखाण |
शुभम – शुभा | शुभ, चांगले |
अनमोल – अन्वी | मौल्यवान, अप्रतिम |
मोक्ष – मोक्षा | एखाद्या गोष्टीतून समाधानाने सुटका मिळणे |
नीरव – निधी | शब्दरहीत, पैसे, धन |
प्रगत – प्रगती | विकास करणारे, पुढे जाणारे |
अमन – अंजली | शांतता, ओंजळ |
जुळ्या मुलामुलींची आधुनिक नावे (Modern Twin Baby Girl & Boys Names In Marathi)
आपल्या मुलांची नावे इतर मुलांशी मिळती जुळती असावी असं बऱ्याच पालकांना वाटत नाही. मग अशावेळी अनेकदा आपण आधुनिक नावांचा अर्थात मॉडर्न नावांचा शोध घेत असतो. अशीच काही जुळ्या मुलांची आधुनिक नावे तुमच्यासाठी.
नावे | अर्थ |
अनम – अनामिका | आशिर्वाद, अनामिका बोट |
अमृत – अमृता | अमूल्य, ज्यामुळे कधीही मरण येत नाही असे |
अमर्त्य – अमर्त्या | अमर, मरण न येणारे |
चंदन – चांदनी | सुगंधित लाकूड, चंदन, चंद्राची तारका |
दीप – दीपाली | प्रकाश, उजेड देणारे, ज्योती |
ध्रुव – ध्रुवी | तारा, अढळ |
हरप्रीत – हरप्रिता | सकारात्मक, एखाद्या गोष्टीसाठी वाहून घेतलेले |
हर्षिल – हर्षिनी | आनंद, उत्साह, सकारात्मकता |
हेमल – हेमाली | सोनेरी |
क्रिष – क्रिषी | शेतकरी |
आदित्य – नित्या | सूर्य, नियमित |
आदर्श – आदर्शा | एखाद्यापुढे चांगल्या गोष्टी ठेवणे |
अभिनय – अभिज्ञा | एखाद्या गोष्टीची नक्कल करणे, एखादी गोष्ट माहीत असणे |
नकुल – नकुसा | पांडवांपैकी एक |
अमेय – अमेया | गणपतीचे एक नाव |
अन्विक – अन्विका | शक्तिशाली, बलशाली |
अनय – अनन्या | आकर्षक, अतुलनीय |
पद्मेश – पद्मश्री | विष्णू, पद्माची पत्नी |
प्रेम – प्रणिता | प्रेमाचा भाग, प्रणय |
प्रांशुळ – प्राण्वी | शंकराचे नाव, प्राण, जीव |
भार्गव – भार्गवी | भगवान शिव, पार्वतीचे एक नाव, शुक्र ग्रह |
भुवन – भावना | पृथ्वी, संवेदना |
चिन्मय – चेतना | परमात्मा, परमेश्वर, संवेदना |
दक्ष – दक्षा | एखाद्या गोष्टीसाठी अत्यंत तयार असणे |
दर्श – दर्शिनी | अतिसुंदर, भगवान कृष्ण, देखणे असे |
देवांश – देवांशी | देवाचा अंश |
गौरेश – गौरांगी | शिव, भगवान शंकाराचे नाव, पार्वतीचे एक नाव |
गिरीष – गौरी | शिव भगवान, शंकर, पार्वती |
हृदयांश – रिद्धीमा | हृदयाच्या जवळ असणारा, हृदयाचा भाग, सुंदर-आकर्षक असणारी |
इंद्रेश – इंद्रायणी | इंद्राचा अंश, नदीचे नाव |
ईश्वर – ईश्वरी | देवाचा अंश, भगवान, देव |
उज्वल – उज्वला | भविष्य, चांगली उन्नती, प्रगती |
तृप्त – तृप्ती | समाधान, आनंद |
तेजस – तेजस्विनी | तेज, प्रकाश |
तनुज – तनुजा | लहान भाऊ, बहीण |
तविष – तविषा | स्वर्ग, मजबूत, धैर्यवान |
सुयश – सुयशा | यशप्राप्ती |
सुलेख – सुलेखा | अप्रतिम, सुंदर, आकर्षक, सरळ रेष |
श्रीहित – श्रीहिता | हितासह |
साहिल – सोहा | उत्सवाचे नाव, तारा |
तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. तुम्हीही तुमच्या जुळ्या मुलांसाठी यातील नावे नक्की निवडा. याशिवाय वाचा र अक्षरावरून मुलींची नावे खास तुमच्या बाळासाठी.