Care

काळ्या पाण्याच्या चहाचा करा केसावर वापर, होतील महिनाभरात केस काळे

Dipali Naphade  |  Dec 2, 2020
काळ्या पाण्याच्या चहाचा करा केसावर वापर, होतील महिनाभरात केस काळे

आजकाल सतत धावपळीमध्ये स्वतःची काळजी घेणं जरा कठीणच होतं. विशेषतः आपल्या केसांची. पुरूषांपेक्षाही महिलांना दुप्पट काम असतं.  घर आणि ऑफिस सर्वच जबाबदारी त्यांना पेलायची असते. त्यामुळे खाणं – पिणं असो अथवा आपलं सौंदर्य जपणं असो सगळीकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होत असते. उरलेली कसर प्रदूषण आणि जंक फूड भरून काढतात. याचा शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होत असतो. सर्वात जास्त  परिणाम होतो तो म्हणजे केस सफेद होण्यावर. केस लवकर पांढरे होण्याचे कारण हेच आहे की, केसांची नीट काळजी घेतली जात नाही. इतकंच नाही प्रदूषणासह केसांवर इतके प्रयोग केले जातात की केस लवकर पांढरे होतात. पण तुम्हाला जर नैसर्गिकरित्या आपले केस काळे राखायचे असतील तर तुम्ही चहाच्या पानांची मदत घेऊ शकता. हा  उपाय जुना आहे मात्र अत्यंत परिणामकारक आहे. यामुळे केसांना नुकसानही पोहचत नाही. कारण  यामध्ये कोणतेही केमिकल नसते आणि त्याशिवाय तुमचे केस नैसर्गिक स्वरूपात काळे राहण्यास मदत मिळते. केस काळे ठेवण्यासाठी तुम्ही चहाच्या पाण्याने धुऊ शकता. पंधरवड्यातून तुम्ही हा प्रयोग एकदा जरी केलात तरी तुम्हाला याचा उत्तम परिणाम मिळू शकतो. 

लांब घनदाट केस हवे असतील तर टाळा ‘या’ चुका

केसांसाठी काय साहित्य वापरावे आणि कसे वापरावे

Shutterstock

केस काळे राखण्यासाठी चहाचा वापर करण्यासाठी लागणारे  साहित्यही अगदी घरातच मिळते.  त्यामुळे तुम्हाला वेगळा खर्च अथवा बाहेरून  काही आणण्याची गरज भासत नाही. 

साहित्य 

करण्याची पद्धत 

Black Tea मुळे आरोग्य राहतं फिट, सौंदर्यासाठीही होतो उपयोग

चहामुळे कसे होतात केस काळे

चहाच्या पानांमध्ये अथवा चहा पावडरमध्ये मेलनिन आणि केराटिनचा समावेश असतो. त्यामुळे आपल्या सफेद केसांना काळे करण्यासाठी याचा उपयोग होतो. तुम्ही जर हर्बल ब्लॅक टी चा वापर केला तर यामध्ये असणारे अधिक प्रमाणातील टॅनिन हे शरीरातील डीटीएच हार्मोन प्रॉडक्शन थांबविण्यास मदत करते आणि केस अधिक चमकदार आणि काळे करण्यासाठीही मदत  करते. डीटीएच हार्मोन प्रॉडक्शनमुळेच केसांना अधिक नुकसान पोहचते. केसांची वाढ होण्यापासून हे रोखते. तसंच यामुळे केसगळतीचे प्रमाणही वाढते आणि वयाच्या आधीपासूनच केस सफेद होण्यास सुरूवात होते. हे हार्मोन तयार होणं बंद झाल्यावर केसांची वाढ होते आणि केस अधिक काळेभोर आणि घनदाट होण्यास सुरूवात होते.  यासाठी चहा पावडरचा चांगला उपयोग होतो. चहाच्या पाण्याने तुम्ही तुमचे केस अधिक चांगले काळे आणि घनदाट करू शकता. 

उरलेल्या चहाच्या चोथ्याचे फायदे तुम्हाला करतील आश्चर्यचकीत

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Care