DIY सौंदर्य

दुधीच्या सालीचा उपयोग करून चेहऱ्यावर आणा चमक, घालवा काळे डाग

Dipali Naphade  |  Aug 7, 2020
दुधीच्या सालीचा उपयोग करून चेहऱ्यावर आणा चमक, घालवा काळे डाग

दुधीची भाजी फारच कमी लोकांना आवडते. वास्तविक बऱ्याच जणांना आवडत नाहीच. पण दुधीची भाजी तुमच्या आरोग्यासह त्वचेसाठीही तितकीच फायदेशीर ठरते याची तुम्हाला माहिती आहे का? दुधीचा रस प्यायल्याने चेहऱ्यावर चमक येते. तसंच तुम्हाला मधुमेह असेल तर तो कमी करण्यासाठीही या रसाचा उपयोग होतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का दुधीच्या सालीचादेखील तितकाच उपयोग होतो. दुधीच्या सालीचा तुमच्या आरोग्यासाठी तर उपयोग होतोच पण याचा जास्त फायदा होतो तो त्वचेसाठी. चेहऱ्यावर काळे डाग घालवायचे असतील तर तुम्ही याचा उपयोग करू शकता.  याचा नक्की काय उपयोग आहे आणि त्याचा कसा फायदा होतो ते आपण या लेखातून पाहणार आहोत. दुधीच्या सालीमुळे नक्की काय फायदा होतो जाणून घेऊया.  

टॅनिंग

Shutterstock

बाहेर आपलं सतत येणंजाणं असतं. कडक उन्हामुळे त्वचा बऱ्याचदा बर्न होते अर्थात करपते. सनबर्नच्या कारणाने त्वचा करपून कोरडी आणि निस्तेज होते. यासाठी तुम्हाला दुधीच्या सालीचा उपयोग करून घेता येतो. दुधीच्या साली मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट तुम्ही चेहरा आणि मानेवर व्यवस्थित लावा. साधारण 15-20 मिनिट्सपर्यंत तुम्ही ही पेस्ट तशीच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोन वेळा केल्यास तुमच्या त्वचेवरील टॅनिंग निघून जाण्यास मदत मिळते. केवळ चेहऱ्यावरीलच नाही तर तुम्हाला हातावरही टॅनिंग झालं असल्यास, तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता.

तजेलदार त्वचेसाठी कच्च्या दुधात मिसळा पपई, मध आणि नियमित करा वापर

चमकदार त्वचा

Shutterstock

निस्तेज त्वचा असेल तर तुम्हाला दुधीच्या सालीचा चांगला फायदा मिळतो. दुधीमध्ये फायबर आणि विटामिन्स आढळते, जे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते. तुम्हाला जर तुमची त्वचा चमकदार हवी असेल तर त्यासाठी दुधीच्या सालीचा उपयोग करा. दुधीच्या सालीचा फेसपॅक बनविण्याआधी सर्वात पहिले या साली व्यसस्थित वाटून  घ्या. ही पेस्ट एका बाऊलमध्ये काढा आणि त्यात चंदन पावडर मिक्स करा. हे  मिश्रण एकत्र करून ते तुम्ही चेहऱ्याला लावा. साधारण अर्धा तास तसंच ठेवा आणि नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून तुम्ही हा प्रयोग साधारण दोन ते तीन वेळा केल्यास तुम्हाला उत्कृष्ट परिणाम दिसून येईल. तुमच्या चेहऱ्यावरील निस्तेजपणा जाऊन चमक परत येईल. 

डागविरहीत चेहऱ्यासाठी वापरा बडिशेपचा फेसमास्क

जळजळ होत असल्यास

कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने त्वचेवरी कधीतरी जळजळ होऊ लागते. मग अशावेळी दुधीच्या सालीचा उपयोग करून घेता येतो. याची पेस्ट जळजळ होणाऱ्या ठिकाणी लावली तर जळजळ होणे त्वरीत थांबते. तुम्हाला इतर कोणत्याही औषधाची यासाठी गरज भासत नाही. 

दुधी आणि गुलाबपाणी

Shutterstock

दुधीची साल उन्हात सुकवून वाटून घ्या.  त्याची पावडर तयार करा. या पावडरमध्ये गुलाबपाणी मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि 15-20 मिनिट्सपर्यंत तसंच ठेवा.  नंतर थंड पाण्याने धुवा.  हा फेसपॅक चेहऱ्याला लावल्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग निघून जाण्यास मदत मिळते. तसंच तुमच्या चेहऱ्यावर चमकही येते. दुधीच्या सालीची ही पावडर करून ठेवा आणि चेहऱ्यावर हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्यास, तुमचा चेहरा कमालीचा आकर्षक दिसेल आणि चेहऱ्यावरील चमक कायम राहील. निस्तेजपणा दूर होईल.  

चमकदार त्वचा आणि निरोगी आरोग्यासाठी प्या ‘हे’ ज्युस

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

Read More From DIY सौंदर्य