आरोग्य

कोरोनापासून बचावासाठी सॅनिटाईजर नाही साबणच उत्तम

Aaditi Datar  |  Mar 18, 2020
कोरोनापासून बचावासाठी सॅनिटाईजर नाही साबणच उत्तम

चीनमधल्या वुहान शहरातून जगभरात थैमान घालणारा कोरोना आता भारतातही पोचला आहे. भारतातही या रोगाचे रूग्ण आढळले असून लोकांना या रोगापासून बचावासाठी स्वच्छता बाळगण्याची सूचना दिली जात आहे. सुरूवातीपासूनच स्वच्छतेसाठी साबण किंवा सॅनिटाईजरने हात धुण्याचा सल्ला दिला जात आहे. पण जशीही बातमी व्हायरल झाली तसं लोकांनी सॅनिटाईजरवर उड्या मारल्या आणि अनेक दुकानातून माल संपला. बनावटी सॅनिटाईजरचा काळाबाजार होत असल्याचंही उघड होत आहे. अशा परिस्थितीत स्वच्छता राखण्यासाठी आपल्याला हाताने काळजी घेण्यासाठी सॅनिटायझरची आवश्यकता नाही. कारण गड्या आपुला साबण बरा. हो..जाणून घ्या कसं.

विशेषज्ञांनी केलेल्या संशोधनातून हे समोर आलं आहे की, कोरोना व्हायरसपासून बचावासाठी साबण हा उत्तम पर्याय आहे. साबण या व्हायरसमधील लिपिडचा आरामात नाश करतं. खरंतर साबणामध्ये फॅटी एसिड आणि मीठासारखी तत्त्वं असतात. ज्याला एंफीफाइल्स असं म्हटलं जातं. साबणातील ही तत्त्वं व्हायरसच्या बाहेरील आवरणाला निष्क्रिय करतात. पण यासाठी तुम्ही किमान 20 सेकंड हात धुण्याची गरज आहे. ज्यामुळे हा चिकट पदार्थ नष्ट होतो. जो व्हायरसला तुमच्या हातावर चिकटवून ठेवतो. तुम्हाला अनेकवेळा साबणाने हात धुतल्यावर हे जाणवलं असेल की, साबणाने हात धुतल्यानंतर त्वचा कोरडी पडते आणि हाताला सुरकुत्या पडतात. हे यामुळे होतं कारण साबणामध्ये खोलवर जाऊन किटाणु मारण्याची क्षमता असते. 

 

सॅनिटाईजर साबणांएवढं प्रभावी का नाही

सॅनिटाईजर हे नेहमी जेल किंवा क्रिमच्या रूपात असतं. कोरोनाशी लढण्यासाठी सॅनिटाईजर उत्तम पर्याय नसल्याचंही समोर आलं आहे. कोरोनाचा सामना फक्त तेच सॅनिटाईजर करू शकतात ज्यामध्ये अल्कोहोल जास्त प्रमाणात असेल. तसंच वारंवार सॅनिटाईजरचा वापर हा तुमच्या शरीरासाठी चांगला नसतो. कारण सॅनिटाईजर तुमच्या त्वचेतून रक्तापर्यंत पोचून पेशी आणि त्वचेचं नुकसान करू शकतो. त्यामुळे सामान्यपणे आपल्या वापरात असलेला साबण हा जास्त चांगला पर्याय आहे.

पाहा कोरोनापासून बचावासाठी कशा पद्धतीने हात धुवावा. तुम्हीही खालीलप्रमाणे किमान 20 सेकंड्स हात धुवा. पण हात धुत असताना पाण्याचा अपव्यय टाळा.

कोरोना व्हायरसमुळे आत्तापर्यंत चीन, ईटली आणि ईराणसारख्या देशात अनेकांवर मृत्यू ओढावला आहे. पण घाबरण्याऐवजी कोरोनाचा लढा द्या. लक्षात घ्या जर तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर कोरोना तुमचं काहीच बिघडवू शकत नाही. तुमच्या घरातील लहान्यांची आणि ज्येष्ठ नागरिकांची जास्त काळजी घ्या. अफवांना बळी पडू नका. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO च्या वेबसाईट आणि सोशल मीडियावरील अकाउंटची माहितीच फॉलो करा. जास्तीत घरात राहा आणि बाहेर जाणं टाळा. मग कोरोना तुमच्या वाट्याला येणारच नाही.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

हेही वाचा –

Corona Virus: अफवांना बळी पडून असे वागत असाल तर वाचा

सावधान! कोरोनापासून स्वत:ला वाचवण्यासाठी अशी घ्या काळजी

#Corona मुळे पापाराझ्झींनाही ब्रेक

corona virusमुळे चित्रपटांवर होणार परिणाम, थिएटर राहणार 31 मार्चपर्यंत बंद

Read More From आरोग्य