Weight Loss

वजन, त्वचेसह त्रिफळा चूर्ण फायदे मराठीत (Triphala Churna Benefits In Marathi)

Dipali Naphade  |  Oct 8, 2019
Triphala Churna Benefits In Marathi

वर्षानुवर्ष आपल्या शरीराच्या कोणत्याही समस्येसाठी योग्य उपचार हे आयुर्वेदात (Ayurveda) सापडतात. ही नक्कीच अतिशयोक्ती नाही. हे खरं आहे. आपली बदलती लाईफस्टाईल (lifestyle) आणि रोजचा थकवा यामुळे अनेक आजार शरीरामध्ये आपलं घर बनवतात आणि हे तथ्य आहे. पण आपण वेळीच आपल्या शरीराची काळजी घेतली तर तुम्ही या रोजच्या समस्यांपासून नक्कीच सुटका मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला साधारण 2000 वर्षोंपासून अस्तित्वात असणाऱ्या त्रिफळाचा (Triphala) वापर करता येईल. आयुर्वेदातील एक अत्यंत उत्कृष्ट आणि उपयुक्त असं त्रिफळा असून याच्या फायद्याची यादी ही खूपच मोठी आहे. आवळा, बहेड़ा आणि हरड़ या तीन वेगवेगळ्या वनस्पतींनी तयार करण्यात आलेलं त्रिफळा चूर्ण (Triphala Churna) हे बऱ्याच आजारांवर उपयुक्त असल्याचं मानलं जातं. तुम्ही तुमचा आज आणि भविष्यदेखील चांगलं करू इच्छित असाल तर नक्कीच तुम्हाला त्रिफळा चूर्णाच्या इतर फायद्यांविषयी जाणून घ्यायला हवं. केवळ आजारांसाठीच नाही तर वजन कमी करण्यासह त्वचेसाठीही त्रिफळा अत्यंत उपयुक्त आहे. पण त्यापूर्वी त्रिफळा चूर्ण फायदे मराठीत (triphala churna benefits in marathi) जाणून घेऊया.

त्रिफळा चूर्ण म्हणजे नेमकं काय? (Triphala Powder Meaning In Marathi)

Triphala Powder In Marathi

त्रिफळा एक आयुर्वेदिक हर्बल (herbal) चूर्ण आहे, ज्यामध्ये अमालकी (आवळा), बिभितकी (बहेडा) आणि हरितकी (हरड़) अशा तीन वनस्पतींचा वापर करून वाटून त्याचं चूर्ण बनवण्यात येतं. त्रिफला चूर्णच्या एका भागात हरड, दोन भाग बहेडा आणि पाव भाग आवळा असं मिश्रण असतं. याचा उपयोग वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी करण्यात येतो. या तीनही फळांमध्ये गोड, आंबट, कडू, खारट असे विविध स्वाद असतात. तीन फळांची पावडर असल्याने त्रिफळा चूर्ण हे एका अनोख्या स्वादाचं मिश्रण तर तयार होतंच शिवाय याचे पोषक गुणधर्म अनेक फायदे शरीराला मिळवून देतात. आयुर्वेदानुसार, तुम्हाला जर वात, कफ आणि पित्त यापैकी कोणतेही दोष असतील तर त्रिफळा चूर्ण खाल्ल्याने हे दोष नीट होऊन तुमचं शरीरस्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी मदत होते. 

Also Read: Home Remedies To Reduce Bad Breath In Marathi

त्रिफळा चूर्णाचे फायदे (Triphala Churna Benefits In Marathi)

Benefits of Triphala Powder In Marathi

तसे तर त्रिफळा चूर्णाचे फायदे आपल्याला माहीत आहेत. पण केवळ पचनशक्तीसाठी होणारा फायदा आपल्याला माहीत आहे. याशिवायदेखील या चूर्णाचं सेवन केल्याने फायदे होत असतात. नक्की काय फायदे आहेत ते पाहूया – 

वजन कमी करण्यासाठी

Lose Weight By Triphala Powder In Marathi

डोळ्यांकरिता फायदेशीर

Triphala Powder For Eyes In Marathi

त्वचेसाठी ठरतं उपयुक्त

Triphala Powder For Skin In Marathi

बद्धकोष्ठ

                                                             वाचा – या कारणांमुळे गरोदरपणात होते बद्धकोष्ठतेचा त्रास

दातांसाठीही उपयुक्त

Triphala Powder For Teeth In Marathi

केसांसाठी होतो फायदा

Triphala Powder For Hair In Marathi

‘दालचिनी’चे असेही फायदे असतील हे माहीत नव्हते

लहान मुलांचे दात होतात मजबूत

तोंडाला येणारा दुर्गंध घालवण्यासाठी

त्रिफळा चूर्ण केसांसाठी

Triphala Powder For Hair Growth In Marathi

हार्मोन्स संतुलित राहातं

रक्तदाबावर नियंत्रण आणतं

जखम बरी करण्यास होते मदत

Triphala Powder For Healing Wounds In Marathi

हाडांचा त्रास कमी करण्यासाठी

युरीन इन्फेक्शन

Triphala Powder For Urine Infection In Marathi

जाणून घ्या ओव्याचे आरोग्यदायी फायदे

अल्सरपासून मिळते सुटका

तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका

प्रतिकारशक्ती वाढवण्यास होते मदत

Triphala Powder For Enhance Immunity In Marathi

पचनक्रिया करतं चांगली

डिटॉक्झिफार म्हणून करतं काम

मधुमेहावरही ठेवतं नियंत्रण (Managing Diabetes)

Triphala Powder Managing Diabetes In Marathi

<h2 data-shortcode="त्रिफळा चूर्ण सेवन करण्याचे काही नियम" class="sticky" id="<strong>त्रिफळा-चूर्ण-कसे-खावेत्रिफळा चूर्ण कसे खावे (How To Consume Triphala Churna In Marathi)

Triphala Churna In Marathi

त्रिफळा चूर्ण घ्यायला हवं हे तर आम्ही तुम्हाला सांगितलं. पण ते नक्की कशा प्रकारे सेवन करायचं याचे काही नियम आणि पद्धती आहेत. त्याच आपण जाणून घेऊया –

1. त्रिफळा तुम्ही चहा अथवा काढा स्वरूपात पिऊ शकता. वजन कमी करायचं असेल तर त्रिफळा काढ्यामध्ये मध मिक्स करा आणि मग ते प्या. 

2. तांब्याच्या भांड्यात अथवा मातीच्या भांड्यात पाणी भरा आणि त्यात दोन चमचे त्रिफळा चूर्ण रात्रभर भिजत ठेवा. सकाळी कपड्यांमधून गाळून घ्या आणि मग तुमचे डोळे सकाळी या पाण्याने धुवा. तुमचे डोळे निरोगी राहण्यास मदत होते

3. एक चमचा त्रिफळा चूर्ण एक ग्लास पाण्यात साधारण 10- 15 मिनिट्सपर्यंत उकळून घ्या. हा काढा व्यवस्थित गाळून त्याने डोळे धुवा

4. रात्री झोपण्यापूर्वी 5 ग्रॅम त्रिफळा चूर्ण (Triphala Churna) कोमट पाण्यातून वा दुधातून प्यायल्यास, बद्धकोष्ठतेची समस्या नष्ट होण्यास मदत होईल

5. पचनतंत्राशी जोडली गेलेली समस्या दूर करण्यासाठी तुम्ही गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण मिक्स करून रोज प्या

6. तोंडाची दुर्गंधी नष्ट करण्यासाठी तुम्ही अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण मधामध्ये (honey) मिक्स करा आणि चाटा

7. हलक्या गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण मिक्स करा आणि त्याने चूळ भरा. यामुळे दात मजबूत होण्यास मदत होते

8. केसांच्या वाढीसाठी त्रिफळाच्या 2 कॅप्सूल्स (capsule) खा

9. केसांच्या मजबूतीसाठी आणि पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही त्रिफळा पेस्ट केसांना लावा आणि अर्धा तास तसंच ठेवून मग धुवा

10. साधारण 5 ग्रॅम त्रिफळा चूर्ण सेवन केल्याने दाद, खाज आणि त्वचा रोग (skin disease) यापासून सुटका मिळते

आरोग्य आणि चवीचा खजिना आहे जायफळ, जाणून घ्या फायदे आणि नुकसान

त्रिफळा चूर्णाने होणारं नुकसान (Side Effects Of Triphala Churna In Marathi)

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. त्याचप्रमाणे त्रिफळा चूर्णानेदेखील तुम्हाला काही नुकसान होऊ शकतं. नक्की काय नुकसान होतं ते जाणून घेऊया – 

1. गर्भवती आणि स्तनपान चालू असणाऱ्या महिलांनी याचं सेवन करू नये

2. त्रिफळा चूर्ण खाल्ल्यानंतर काही व्यक्तींना झोप येते

3. साधारण 6 वर्षांच्या खालच्या मुलांना त्रिफळा चूर्ण देऊ नये

4. तुम्हाा बराच काळ त्रिफळा चूर्ण (Triphala Churna) खायचं असेल तर याचं सेवन नक्की किती प्रमाणात करायचं हे ठरवून घ्या

5. त्रिफळा अधिक प्रमाणात घेतल्यास, तुम्हाला जंताची समस्या होऊ शकते

6. त्रिफळा चूर्ण जास्त खाल्ल्याने डायरिया (diarrhoea) होण्याचा धोका असतो

7. त्रिफळाचं प्रमाण अधिक झाल्यास, डिहायड्रेशन (dehydration) सारख्या समस्येलादेखील सामोरं जावं लागू शकतं

8. ज्या लोकांना त्रिफळा खाल्ल्याने झोप येण्याची समस्या (insomnia) आहे, त्यांनी सकाळऐवजी याचं सेवन रात्री करावं

9. त्रिफळाची मात्रा शरीरासाठी उष्ण असते. त्यामुळे अधिक खाल्ल्यास, घाबरण्यासारखं वाटू शकतं

10. याचं अधिक सेवन केल्यास, ब्लड शुगर (blood sugar)ची समस्यादेखील वाढीला लागते

त्रिफळा चूर्णासंदर्भात प्रश्नोत्तरं (FAQ’s)

1. त्रिफळा चूर्ण दिवसातून किती वेळा घ्यावं ?

त्रिफळा चूर्ण तुम्ही दिवसातून एक किंवा दोन वेळाच घ्या. त्यापेक्षा जास्त घेतल्यास, तुमच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

2. त्रिफळा चूर्ण शरीरासाठी उष्ण नसतं का ?

त्रिफळा चूर्णामध्ये तीन वनस्पतींचं मिश्रण असतं आणि आवळा, हरडा हे उष्ण पदार्थचं आहेत. त्यामुळे त्रिफळा चूर्ण नक्कीच उष्ण असतं. पण प्रमाणात खाल्ल्यास तुम्हाला त्याचा फायदा होतो. 

3. त्रिफळा चूर्ण गरोदर महिला खाऊ शकतात का ?

गरोदर महिलांनी अजिबात याचा वापर करू नये. एकतर या दिवसात प्रकृतीला उष्ण पदार्थांपासून दूर ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे त्रिफळा चूर्ण गरोदर महिलांनी खाऊ नये. 

Read More From Weight Loss