नातीगोती
व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या प्रेयसीला द्या ‘हे’ स्पेशल गिफ्ट (Valentines Day Gift Ideas In Marathi)
व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीला काय गिफ्ट द्यायचं हे तुमचं नक्कीच ठरलं असेल. पण अजून गिफ्ट काय द्यायचं हे तुम्ही ठरवलं नसेल तर गिफ्ट शोधण्यासाठी ही माहिती तुमच्या नक्कीच उपयोगाची आहे. खरंतर मुलींसाठी एखादं गिफ्ट घेणं खरंच खूप कठीण असू शकतं. मुलींना गिफ्ट देण्यासाठी अनेक पर्याय बाजारात सहज उपलब्ध असतात. या सर्व पर्यांयामधून तुमच्या खास व्यक्तीसाठी स्पेशल गिफ्ट शोधणं हे एखाद्या पुरूषासाठी नक्कीच आव्हानाप्रमाणे असू शकेल. शिवाय मुलींना सतत शॉपिंग करण्याची आवड असल्याने आपण निवडलेलं हे गिफ्ट तिला आवडेल का ? हा प्रश्नदेखील तुम्हाला पडू शकतो. पण असं असेल तर मुळीच चिंता करू नका कारण यावर सोपी युक्ती म्हणजे गिफ्ट घेण्याआधी तुमच्या प्रेयसीच्या आवडीनिवडी आणि मूड्सचा थोडा विचार करा. ज्यामुळे तुम्हाला गिफ्ट शोधणं सोपं जाईल. शिवाय हे खास गिफ्ट तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी घेत आहात ज्यातून तुम्ही तुमचं तिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करणार आहात. तुमच्या मनातील तिच्याबद्दलच्या या भावना अगदी प्रामाणिक असल्याने तिच्यापर्यंत त्या नक्कीच पोहचतील आणि ते गिफ्ट तिला नक्कीच आवडेल. आम्ही तुमच्यासोबत काही गिफ्ट आयडीयाज देखील शेअर करत आहोत ज्यामुळे तुम्हाला गिफ्ट शोधण्यासाठी नक्कीच मदत होईल. त्यामुळे या व्हॅलेंटाईन डेला खाली दिलेल्या गिफ्टपैकी एखादं गिफ्ट निवडा आणि तुमच्या गर्लफ्रेंडला खूश करा.
Table of Contents
प्रेयसीला देण्यासाठी ‘स्पेशल भेटवस्तू’ (Special Gifts For Valentines Day In Marathi)
लाल रंगाचा रोमॅंटिक ड्रेस (Red Colored Dress)
लाल रंग प्रेमाचं प्रतिक आहे. आपण तिला व्हॅलेंटाईन डेसाठी ड्रेस भेट म्हणून देऊ शकता. मुलींना निरनिराळ्या प्रकारचे ड्रेस आवडत असतात. तुम्ही मात्र तुमच्या प्रेयसीची आवड पाहून एखादा छान ड्रेस निवडू शकता. बाजारात विविध ब्रॅंडचे कपडे उपलब्ध असतात. त्यामुळे तुमच्या प्रेयसीच्या मापाचा अंदाज घेऊन त्यानूसार या ड्रेसची निवड करा.
मेकअप कीट अथवा वॅनिटी केस (Makeup Kit Or Vanity Case)
मेकअप मुलींचा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे या व्हॅलेंंटाईन डे ला तुम्ही तिला एखादी वॅनिटी केस गिफ्ट केली तर ते तिच्यासाठी फारच हार्ट टचिंग ठरेल. यात कॉम्पॅक्ट किट, फाउंडेशन, मस्करा, आयशॅडो आणि ब्रशेस असू शकतात. या गिफ्टचा अर्थ तुम्ही तिच्या आवडीनिवडींचा खास विचार करताय असा होतो. तुम्हाला यातलं फार काही कळत नसेल तर आम्ही सूचवलेलं हे वॅनिटी केस तिला अवश्य गिफ्ट करा.
डायमंड रिंग (Diamond Ring)
कपडे आणि मेकअप प्रमाणे मुलींना दागदागिन्यांचीही फार आवड असते. हिऱ्यांचे दागिने हा तर प्रत्येकीसाठी अगदी भावनिक विषय असतो. जेव्हा या व्हॅलेंटाईन डेला चित्रपटात दाखवल्याप्रमाणे गुडघ्यावर वाकून तुम्ही एखादी डायमंड रिंग अचानक तिच्या नाजूक बोटांमध्ये घालाल तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्यासारखे असतील. ‘काशी ज्वेलर्स’च्या या रिंगपैकी एखादी नाजूक रिंग तुम्ही तिच्यासाठी नक्कीच निवडू शकता. मात्र ती गिफ्ट करताना त्यावर एक छान प्रेमाचा संदेश अवश्य लिहा.
Also Read Celebrate Valentines Day In Marathi
हार्ट शेपमधील दागिने (Heart Shaped Jewellery)
या प्रेमदिनी ह्रदयाच्या आकारातील पेडंट अथवा रिंग तुम्ही तिला गिफ्ट करू शकता. या गिफ्टचा एक फायदा हा की हे गिफ्ट सतत तिच्या ह्रदयाजवळ राहील. ज्यामुळे तुम्ही तिच्या ह्रदयात सतत असाल. या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही तिच्यासाठी ‘कॅरेटलेन’ या ब्रॅंडचे हे विविध दागिने नक्कीच निवडू शकता. रुबी आणि गार्नेटमधले हे दागिने तिला नक्कीच आवडतील. शिवाय याचे रंग आणि डिझाईन्सदेखील सुंदर आहेत.
Also Read Things To Avoid On Valentines Day In Marathi
नाजूक डिझाईन्सचे डायमंड ब्रेसलेट अथवा नेकलेस (Diamond Bracelet Or Necklace)
या व्हॅलेंटाईन डे ला काहीतरी हटके करायचं असेल तर अचानक तिच्या नाजूक गळ्यात हा नेकलेस अथवा हातात हे ब्रेसलेट घाला. असं केल्याने तो क्षण तुम्हा दोघांसाठीही विस्मरणीय ठरेल. आम्ही तुम्हाला ‘पीएनजी’ ज्वेलर्सच्या दागिन्यांच्या काही डिझाईन्स सूचवत आहोत. या नाजूक डिझाईन्स तिला नक्कीच आवडतील. शिवाय तिच्यावर या अगदी शोभूनही दिसतील.
हॅंडलूम साडी (Handloom Saree)
कोणत्याही वयातील स्त्रीला साडी नेहमीच आवडत असते. त्यामुळे प्रेयसीला साडी गिफ्ट करणं ही कल्पनादेखील नक्कीच चांगली असू शकेल. सिल्क आणि हॅंडलूममध्ये हटके साड्यांचा सध्या ट्रेंड आहे. तुमच्या प्रेससीला कोणत्या प्रकारच्या साड्या आवडतात याचा विचार करून एखादी छान साडी तिच्यासाठी निवडा. सर्वच मुलींना नेहमी सिल्कच्या साड्या आवडतात. त्यामुळे तुम्ही तिला एखादी एलिंगट लुकची हॅंडलूम सिल्कची साडी गिफ्ट करू शकता. तिला जर डिझायनर साड्या तिला आवडत असतील तर त्या प्रकारातील साडी तिला गिफ्ट करा.
हेअर स्ट्रेटनर अथवा कर्लर (Hair Strainer Or Color)
आजकाल मुलींना पार्लरप्रमाणे घरीदेखील स्वतःला ग्रूम करायला खूप आवडतं. स्टायलिश कपडे घातल्यावर एलिगंट लुकसाठी विविध प्रकारच्या हेअरस्टाईल्स त्यांना करायच्या असतात. हेअर स्ट्रेट अथवा कर्ल करण्यासाठी हेअर स्ट्रेटनर आणि कर्लरची त्यांना नेहमी गरज असते. या व्हॅलेंटाईन डेला असं एखादं हेअर स्टायलिंग कीट तुम्ही तिला नक्कीच गिफ्ट करू शकता. ज्यामुळे तिला तुम्ही तिच्या आवडीनिवडीची किती काळजी घेता हेही जाणवेल.
स्टायलिश डिझायनर हॅंडबॅग (Stylish Designer Handbag)
निरनिराळ्या लुकसोबत निरनिराळ्या बॅग्ज मुलींना कॅरी करायला आवडतात. मुलींच्या वॉर्डरोबमध्ये विविध स्टाईल आणि पॅटर्नच्या बॅग असतात. त्यामुळे या व्हॅलेंटाईन डेला तिला एखादी स्टायलिश डिझायनर बॅग जरुर गिफ्ट करा. मात्र बॅग विकत घेण्यापूर्वी तुमच्या गर्लफ्रेंडच्या आवडत्या ब्रॅड आणि पॅर्टनविषयी अवश्य माहिती घ्या.
वाचा – व्हॅलेंटाईन डे साठी उत्कृष्ट
घड्याळ (Watch)
मुलींना विविध प्रकारच्या घड्याळयाचं कलेक्शन करायची आवड असते. प्रत्येक आऊटफीटवर निराळं रिस्टवॉच कॅरी करायला त्यांना फार आवडतं. आजकाल विविध ब्रॅडची आणि निरनिराळ्या पॅटर्नची घड्याळं बाजारात उपलब्ध असतात. मेटल, गोल्ड, लेदर पट्टे असलेली आणि मोठ्या आकाराची अथवा नाजूक डिझाईन्स असलेली अशा सर्वच घड्याळ्यांची सध्या फॅशन आहे. त्यातील सोनेरी रंगापेक्षा रोज गोल्ड कलरमधील घड्याळ मुलींना नक्कीच आवडू शकेल. तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडची आवड ओळखून एखादं घड्याळं तिला गिफ्ट करू शकता. शिवाय आजकाल स्मार्ट वॉच देखील ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळे एखादं स्मार्ट वॉच या व्हॅलेंटाईन डेला द्यायला काहीच हरकत नाही आहे.
होममेड साबण (Homemade Soap)
वातावरणातील धुळ आणि प्रदूषणापासून वाचण्यासाठी आजकाल मुली होममेड आणि नैसर्गिक सौदर्यप्रसाधनांना प्राधान्य देतात. बाजारात विविध प्रकारचे होममेड साबण उपलब्ध असतात. आम्ही तुम्हाला ‘अपरा ब्रॅंड’चे होममेड साबण सूचवत आहोत. या विविध सुगंधाच्या आणि मनमोहक डिझाईन्सच्या होममेड सोपमुळे तिचं मन नक्कीच मोहरुन जाईल.
वाचा – नव्याने तुमच्या जोडीदाराच्या प्रेमात पडू शकता
रेकॉर्डेड लव्हमेसेज (Recorded Love Message)
जर या व्हॅलेंटाईनडेला तुम्ही तिच्यापासून दूर असाल तर दूराव्यातून निर्माण झालेल्या प्रेमाच्या अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी हेच गिफ्ट अगदी योग्य ठरेल. कधी कधी दूर असल्यामुळे मेसेज अथवा फोनवरून आपल्याला आपल्या मनातील भावना आहेत तशा व्यक्त करता येत नाहीत. किंवा कधी कधी समोरच्या व्यक्तीपर्यंत त्या आहेत तशा पोहचतही नाहीत. जर या व्हॅलेंटाईनला जर तुम्हाला तिच्यापासून दूरराहावं लागणार असेल तर तुमच्या मनातील भावना रेकॉर्ड करा आणि हा लव्ह मेसेज त्याच्यापर्यंत कुरिअर करा. या गिफ्टमुळे ती नक्कीच भावनिक होईल आणि तुमच्यामधील प्रेमबंध आणखीनच दृढ होतील.
आम्ही तुम्हाला काही निवडक गिफ्टच्या कल्पना दिल्या आहेत. यातलं कोणंतही गिफ्ट तिला नक्कीच आवडेल. तुम्ही तिला काय भेटवस्तू देताय यापेक्षा त्या देताना तुमच्या मनात ते गिफ्ट देताना तिच्याबद्दल काय भावना आहेत हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे यातून निवडलेलं कोणंतही गिफ्ट तिच्यासाठी महत्त्वाचंच असेल. लक्षात ठेवा आपल्या प्रिय व्यक्तीजवळ आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘गिफ्ट देणं’ हे फक्त एक माध्यम आहे. त्यामुळे तुम्ही घेतलेलं यातलं कोणंतही गिफ्ट तिच्यासाठी ‘स्पेशल गिफ्ट’ च असेल. तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत हा व्हॅलेंटाईन डे स्पेशल आणि हटके करण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
You Might Like These:
प्रेम करता? घरी सांगायचय? तुमच्यासाठी खास टीप्स
Valentines Day: व्हॅलेंटाईन वीकमध्ये सेलिब्रेट करा हे ‘स्पेशल’ डेज
Valentines Day : ‘व्हॅलेंटाईन्स डे’ चा अर्थ तुम्हाला कळलाय का
‘व्हॅलेंटाईन डे’ 20 पद्धतींनी कसा सेलिब्रेट करता येईल
Valentines Day Gift Ideas in Hindi
फोटोसौैजन्य – इन्स्टाग्राम