Festival

नवरात्रीमध्ये ‘या’ गोष्टी खरेदी करणं मानलं जातं शुभ

Aaditi Datar  |  Sep 30, 2019
नवरात्रीमध्ये ‘या’ गोष्टी खरेदी करणं मानलं जातं शुभ

तुमच्या आयुष्यात काही समस्या आहेत का, मग चिंता करू नका. देवीच्या कृपेने या नवरात्रीत या समस्या नक्की दूर होतील. नवरात्रीदरम्यान केले जाणारे अनेक उपाय ज्योतिष आणि वास्तूशास्त्रात सांगण्यात आले आहेत. जे केल्यास तुमच्या समस्या नक्कीच दूर होतील. ज्योतिषाचार्य आशिष मिश्र सांगतात की, नवरात्रीचे 9 दविस खूपच विशेष आणि शुभ असतात. जर तुमच्यावर देवीची कृपा व्हावी, अशी इच्छा असल्यास यंदाच्या नवरात्रीत करा काही खास गोष्टींची खरेदी. चला जाणून घेऊया नवरात्रीत नेमक्या कोणत्या गोष्टींची खरेदी केल्यास पूर्ण होतील तुमच्या इच्छा आणि तुम्हाला मिळतील नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

चांदीचं नाणं किंवा भांडं

नवरात्रीमध्ये जर तुम्ही चांदीचं नाणं किंवा भांडं खरेदी केलं तर ते तुमच्या घरासाठी खूप शुभ मानलं जातं. असं केल्याने संपूर्ण कुटुंबाची आर्थिक कष्टातून मुक्तता होते, असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, जर तुम्ही चांदीचं नाणं घेणार असाल तर त्यावर देवी लक्ष्मी किंवा गणपती यांचं चित्र असणं शुभ मानलं जातं.

देवी लक्ष्मीची प्रतिमा

जर तुमची इच्छा असेल की, घरांमध्ये नेहमी सुख-शांती आणि धन-धान्य सुबत्ता कायम राहावी तर नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी तुम्ही संध्याकाळच्या वेळी देवी लक्ष्मीचा फोटो घरी आणावा आणि देवघरात ठेवावा. हा फोटो घेताना लक्षात ठेवा की, त्यात देवी कमळावर बसलेली आणि तिच्या हातातून धनाची वर्षा होत असावी.

पताका (ध्वज)

जर तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल किंवा विदेश यात्रेला जाण्याची इच्छा असेल तर नवरात्रीमध्ये पताका (ध्वज) खरेदी करून त्याची पूजा करावी. हे तुम्हाला कोणत्याही दुकानात आरामात मिळेल. मग नवमीच्या दिवशी हा ध्वज घराच्या गच्चीवर लावावा. असं केल्याने तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

मोरपिस

देवीच्या सरस्वती रूपातील वाहन मोर आहे. याच कारणामुळे मोराच्या पंखाला शुभ मानले जाते. जर तुम्ही नवरात्रीत मोरपिस घरी आणलं आणि घरात लावल्यास लाभ होतो. मोरपिस ईशान्य कोनात ठेवल्याने संतानसुख मिळतं आणि घरामध्ये सकारात्मक उर्जा कायम राहते.

देवीचा धागा

या दिवसात देवीचा धागा घेणेही शुभ मानले जाते. असं म्हणतात की, हा धागा बांधल्याने तुम्हाला भगवान ब्रह्मा, विष्णू व महेश आणि तीन देवी लक्ष्मी, पार्वती व सरस्वतीची कृपा प्राप्त होते. यामुळे तुमचं वाईट नजरेपासून रक्षण होतं आणि रखडलेली काम मार्गी लागतात. फक्त यासाठी तुम्हाला खरेदी करायची आहे देवीच्या धाग्याची खरेदी आणि तुमच्या इच्छा मनात धरून नऊ गाठी बांधा. हे धागा देवीपुढे वाहून मग प्रसाद म्हणून पर्स किंवा लॉकरमध्ये ठेवावा.

जमीन किंवा घर खरेदी

तुम्ही पाहिलं असेल की, बरेचदा लोक जमीन किंवा नवीन घर खरेदी नवरात्रीच्या दिवसात करतात. कारण ज्याेतिष आणि वास्तूशास्रानुसार हे शुभ मानलं जातं. सूर्य अग्नी, शिव वायू, गणपती जल, विष्णू आकाश आणि देवी दुर्गा भूमीची देवी आहे. नवरात्रीमध्ये देवीची आराधना केली जाते आणि अशातच जर जमीन किंवा घरांमध्ये गुतंवणूक केल्यास ती नक्कीच लाभदायी ठरते. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

हेही वाचा –

प्रत्येकाला माहीत हव्या #Navratri शी निगडीत या गोष्टी

Navratri Special : नऊ दिवसांमध्ये देवीला दाखवण्याचे नेवैद्य

नवरात्रीत करा आरोग्यदायी ‘हादग्याची भाजी’

नवरात्रीच्या उपवासाचे 9 फायदे घ्या जाणून, शरीर राहतं निरोगी

Read More From Festival