DIY फॅशन

Vat Savitri Vrat 2022: वटपौर्णिमेच्या पूजेला नेसा या साड्या आणि दिसा अधिक सुंदर

Dipali Naphade  |  Jun 10, 2022
vat-savitri-2022-saree-look-fashion-in-marathi

वटसावित्रीची पूजा अर्थात वटपौर्णिमेचा सण हा महिलांसाठी अत्यंत खास असतो. वटपौर्णिमेची माहिती, या दिवसाची पूजा, वटपौर्णिमेच्या दिवशी घेतले जाणारे खास उखाणे हे सर्वच खूप विशिष्ट असते. या दिवशी सर्वच लग्न झालेल्या महिला साजश्रृंगार करून तयार होतात आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी पूजाअर्चना करतात. वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा करण्यात येते. वटसावित्री पूजेचे महत्त्वही अनेकांना माहीत आहे. सहसा या दिवशी सर्वच महिला साडी नेसण्याला प्राधान्य देतात. ज्यांना साडी कशी नेसावी हे माहीत नसते, त्या महिलादेखील आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मदतीने किमान या दिवशी साडी नेसण्याचा प्रयत्न करतातच. पारंपरिक आणि मनमोहक लुकसह वडाची पूजा करायला महिला या दिवशी घराबाहेर पडतात. अगदी गृहिणींपासून ते ऑफिसला जाणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी हा दिवस खास असतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या दिवशी वटपौर्णिमेच्या खास शुभेच्छाही दिल्या जातात. तुम्हालाही यावर्षीच्या वटपौर्णिमेला (Vat Purnima 2022) खास लुक करायचा असेल तर तुम्ही यापैकी काही साड्यांचा लुक नक्की करू शकता आणि दिसा अधिक सुंदर!

लाल बनारसी साडी (Red Banarasi Saree)

Instagram

वटपौर्णिमा हा सण मुख्यत्वे विवाहित महिलांसाठी खास असतो. या दिवशी सौभाग्यवती महिलांसाठी लाल, हिरवा असे रंग जास्त महत्त्वाचे ठरतात. लाल रंग हा लक्ष्मी मातेचे प्रतीक समजण्यात येते. त्यामुळे वटपौर्णिमेच्या सणासाठी तुम्ही खास लाल रंगाची बनारसी साडी (Banarasi Saree) नेसल्यास, अधिक उठावदार दिसेल. या साडीसह तुम्ही व्ही नेक ब्लाऊज घातला आणि न्यूड मेकअप लुक ठेवलात तर तुम्ही या सणासाठी तयार!

टीप – लाल बनारसी साडीसह तुम्हाला सोन्याचे दागिने घातल्यास अधिक आकर्षक दिसू शकतात. तसंच तुम्ही तुमचा लुक पूर्ण करण्यासाठी आंबाडा स्टाईल करून त्यावर गजरा लावा. मिनिमल मेकअप असला तरीही लाल साडीवर तुम्ही लिपस्टिकही लालच लावा. जेणेकरून तुमचा लुक पूर्ण होईल आणि दिसायलाही अधिक आकर्षक दिसेल. 

पिंक सिल्क साडी (Pink Silk Saree)

Instagram

गुलाबी हा असा रंग आहे जो कोणत्याही महिलेवर उठावदार आणि आकर्षक दिसतो. तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी काही खास लुक करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही गुलाबी रंगाची साडी नक्की नेसू शकता. साडीच्या लुकमध्ये अधिक आकर्षकता आणण्यासाठी तुम्ही या साडीसह कॉन्ट्रान्स्ट ब्लाऊज घाला. उदा. गुलाबी रंगाच्या साडीवर गडद निळ्या रंगाचा ब्लाऊज अधिक उठावदार दिसतो. 

टीप – तुम्ही गुलाबी आणि निळ्या बांगड्या, अत्यंत माफक दागिने आणि सहसा मोत्याच्या दागिन्यांचा वापर करावा. तसंच सिल्कच्या साडीवर तुम्ही कंबरपट्टादेखील घालू शकता. हे दिसायला अत्यंत सुंदर दिसते. 

हिरव्या रंगाची साडी नेसा (Green Saree For Vat Purnima)

Instagram

हिरवा रंग हा ऊर्जेचे प्रतीक आहे. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गडद रंगाची हिरवी साडी नेसणे अधिक सुंदर दिसू शकते. गोऱ्या आणि सावळ्या रंगांच्या महिलांसाठी हिरव्या रंगाची साडी अधिक उठावदार दिसते. हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे या साडीसह हिरव्या बांगड्या आणि केसात गजरा माळल्यास, तुमचा लुक पूर्ण होतो. यासह तुम्ही लाईट मेकअप करा आणि वटपौर्णिमेसाठी तयार व्हा. 

टीप – यासह तुम्ही फुल स्लीव्जचा ब्लाऊज घालू शकता. यामुळे तुमचा लुक अधिक एलिगंट दिसून येतो. 

दोन रंगाची डिझाईनर साडी 

तोच तोच पारंपरिक साडीचा वेश धारण करून कंटाळा आला असेल तर या वटपौर्णिमेसाठी तुम्ही दोन रंगाची डिझाईनर साडी नेसा. ज्या महिलांना जड आणि भरजरी साड्या आवडत नाहीत. त्यांच्यासाठी हा योग्य पर्याय आहे. या साडीला मॅचिंग असा ब्लाऊज तुम्ही घाला. 

टीप – तुम्ही जर या साडीसह व्ही नेक ब्लाऊज घालणार असाल तर केवळ चोकर घातला तरीही तुमचा लुक पूर्ण होतो. तुमच्या साडीचा रंग जर लाईट असेल तर तुम्ही अजिबात गडद मेकअप करू नका हे लक्षात ठेवा. 

या स्टाईल करून तुम्ही दिसा या वटपौर्णिमेला अधिक सुंदर आणि करा तुमचा लुक अप्रतिम!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन