लाईफस्टाईल

170+ भन्नाट वटपौर्णिमा उखाणे | Vat Purnima Ukhane In Marathi 2022

Dipali Naphade  |  Jun 12, 2022
vatpournima-ukhane-in-marathi

सुवासिनींसाठी वटपौर्णिमा हा सण नेहमीच महत्त्वाचा असतो. वटपौर्णिमेचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा कशी करायची याची सर्वसाधारणपणे सर्वांना माहिती असते. वटपौर्णिमेला सुवासिनींसाठी खास संदेश देण्यात येतात. हा सण नववधूंसाठीही खास असतो. पूजा केल्यानंतर बायको आपल्या नवऱ्यासाठी उखाणे घेते. बायका मस्त वडाच्या झाडाकडे नटून थटून जातात, एकमेकांना नवऱ्यासाठी वटपौर्णिमा चे उखाणे किंवा वटसावित्री पौर्णिमा चे उखाणे (marathi ukhane for vat purnima) घ्यायला लावतात, परंतु खास वटपौर्णिमा चे उखाणे कसे घेणार? कारण साधे उखाणे ठीक आहे पण स्पेशल वट पौर्णिमेचे उखाणे बायकांना माहित नसतात, मग गोंधळ होतो. त्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी नवीन vat purnima special ukhane घेऊन आलो आहोत. मराठी उखाणे नवरीसाठी असतात, तर नवरदेवासाठीही उखाणे घेतले जातात. आपल्याकडे खास सणांसाठी वेगवेगळे उखाणे घेतले जातात. तर आता वटपौर्णिमेच्या सणाच्या दिवशी सुंदर वटपौर्णिमा उखाणे खास तुमच्यासाठी.  

नववधूसाठी सुंदर वटपौर्णिमा उखाणे | Nav Vadhusathi Marathi Vat Pournima Ukhane

नववधूसाठी सुंदर वटपौर्णिमा उखाणे | Nav Vadhusathi Marathi Vat Purnima Ukhane

नववधूसाठी लग्नानंतर पहिला सण हा नेहमीच खास असतो. त्यातही ज्या मुलींची लग्न मे महिन्यात होतात त्यांच्यासाठी वटपौर्णिमा हाच लग्नानंतर पहिला सण ठरतो आणि त्यामुळे तो अगदी खास असतो. आपल्या पतीच्या आयुष्यासाठी करण्यात येणारा वटपौर्णिमेचा हा उपवास नेहमीच खास मानला जातो. अशा वटपौर्णिमेच्या दिवशी घेण्यासाठी खास वटपौर्णिमा उखाणे (vat purnima ukhane in marathi)

आयुष्यात सुखदुःख दोन्ही असावे,
…..रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे 

आज वटपौर्णिमा म्हणून, सात फेरे मारते मी वडाला, 
सातही जन्मी मिळू दे….रावांसारखे पती, असे मागणे आहे आजच्या दिवशी देवाला 

बोलत असतानाही होते मी मग्न, 
…….रावांसारखे पती भेटू देत, सात जन्म 

वटपौर्णिमेच्या दिवशी, वडाची पूजा मी करते, 
……रावांना 100 वर्ष आयुष्य मिळू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते (vat pournima ukhane)

वडाची पूजा करते, ठेऊनी निर्मळ मन, 
…रावांचे नाव घेत, आज आहे वटपौर्णिमेचा सण 

वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस, 
….रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस 

आज आहे वटपौर्णिमा, म्हणून ठेवलाय मी उपवास, 
….रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाखातर खास

वटपौर्णिमेच्या दिवशी 5 सुवासिनी स्त्रियांची ओटी मी भरते
….रावांचे नाव घेत, वटपौर्णिमा आहे म्हणून मी लाजते  (vat purnima che ukhane)

वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यााठी जमल्या साऱ्या बायका
…रावांचे नाव घेते, आता सर्वजण ऐका 

वडाची पूजा करून, गुंडाळते सफेद धागा
…रावांच्या जीवनात सदैव असू दे केवळ माझ्यासाठीच जागा 

पोथी पुराणे वाचून, बोध होतो मनाला
…रावांचे नाव घेते, वटसावित्रीच्या सणाला 

कांजीवरम साडी, बनारसी खण 
…रावांचे नाव घेते आज आहे वटसावित्रीचा सण 

वडाची फांदी लाऊन, करते मी वृक्षारोपण, 
…रावांच्या संगतीने करेन मी कुटुंबाचे संगोपन 

वटपौर्णिमेच्या दिवशी असते फणसाची खूप मागणी 
…रावांची होईन मी साताजन्माची राणी 

सुहासिनींचा मेळा जमला, वटपौर्णिमेसाठी
….रावांचे नाव घेऊन निघाले मी वडाच्या पूजेसाठी (vat purnima special ukhane)

नवऱ्यासाठी खास वटपौर्णिमा चे उखाणे | Marathi Vat Purnima Special Ukhane For Husband

नवऱ्यासाठी खास वटपौर्णिमा उखाणे | Marathi Vat Purnima Ukhane For Husband

वटपौर्णिमा हा सणच असतो खास नवऱ्यासाठी. बायको आपल्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी वडाची पूजा करतात. नवऱ्यासाठी खास वटपौर्णिमा उखाणे (marathi ukhane for vat purnima)

श्रावणात आकाशात पसरला, इंद्रधनुष्याचा रंग
…राव नेहमीच राहू देत माझ्या संग

वटपौर्णिमा आहे खरं तर सुवासिनींसाठी मोठा सण 
…रावांनी जिंकले पहिल्याच भेटीत माझे मन 

थाटात पार पडला आज वटपौर्णिमेचा सोहळा
…रावांचे नाव ऐकण्यासाठी आज सर्वजण गोळा

आजच्या दिवशी, वडाची पूजा करण्याची आहे प्रथा 
….रावांसोबत ऐकणार मी, सावित्री आणि सत्यवानाची कथा (vat purnima che ukhane)

झाडं तोडून निसर्गाला देऊ नका त्रास, 
…रावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमेसाठी खास 

सौभाग्यवतींसाठी आहे, वटपौर्णिमेचा सण मोठा 
…रावांना कधीही नको होऊदे व्यवसायात तोटा 

वटपौर्णिमेसाठी आज, नेसले नवीन साडी 
…रावांनी आज घेतली माझ्यासाठी नवीन गाडी 

….रावांसोबत असाच संसार राहू दे सुखाचा 
सण आहे आज वटपौर्णिमेचा 

वटपौर्णिमेचा सण म्हणजे आनंदाचा क्षण, 
…रावांचे नाव घेते, सुखात राहू दे सर्वजण 

पावसाच्या चाहुलीने होतेय पक्षांचे कूजन
…रावांचे नाव घेते आणि करते वडाचे पूजन (vat pournima ukhane)

वटपौर्णिमेला जमल्या सर्व महिला, खेळूया गेम 
…रावांचे प्रेम आयुष्यभर राहू दे सेम 

आज वटपौर्णिमेला आणले बाजारातून फणसाचे गरे, 
…रावांचे नाव घेते, सुखात राहू दे सारे 

देव बनवतो, साताजन्माची गाठ, 
…रावांच्या दीर्घायुष्यासाठी वडाला मारते फेरे सात 

पावसाच्या सरीने, सुखी झाले पक्षी
…रावांचे नाव घेते, तुम्ही सर्वजण साक्षी (vatpornima ukhane)

आज देवाकडे मागणे मागते, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा 
…रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

मंगळागौर पूजेसाठी खास उखाणे

वटसावित्री पौर्णिमा चे उखाणे | Vat Pournima Ukhane In Marathi

बायकोसाठी वटपौर्णिमा उखाणे | Marathi Vat Purnima Ukhane For Wife

बायको वटपौर्णिमेच्या दिवशी नवऱ्यासाठी उपवास ठेवते. काही जण आपल्या बायकोसाठीदेखील उपवास ठेवतात. केवळ बायकोनेच का हा उपवास धरायचा आणि जन्मोजन्मी हीच सहचारिणी आपल्याला मिळावी यासाठी नवरेदेखील हा उपवास ठेवतात. वटपौर्णिमेच्या दिवशी बायकोसाठी वटपौर्णिमा उखाणे (vat purnima ukhane in marathi)

सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह
….हिचे नाव घेण्यास वटपौर्णिमेच्या दिवशी नको मला आग्रह

वटपौर्णिमेच्या दिवशी चंद्र निघाला गगनात
….नाव घेतो ….च्या अंगणात

जीवनाला सुगंध असावा चंदनाचा
…चे नाव घेताना धागा जोडला प्रेमाच्या बंधनाचा

मान राखून तुमचा, मित्रांनो घेतो मी उखाणा 
पण ……………… नाव घ्यायला लागतो मला बहाणा

सागर तेथे सरिता कवी तेथे कविता
….चे नाव घेतो तुमच्या आग्रहाकरिता

कर्ता करविता परमेश्वर त्यावर टाकतो मी भार
….चे नाव घेतो कर देवा संसाराची नौका पार

कळत नाही माझेच मला आहे स्वप्न की भास
…. चे नाव घेतो तुमच्यासाठी खास (वटसावित्री पौर्णिमा चे उखाणे_

गुलाबापेक्षा नाजूक दिसते शेवंती
….ला दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वराला वटपौर्णिमेच्या दिवशी विनंती

भरजरी साडीला जरतारी खण
…..चं नाव घेतो आज वटपौर्णिमेचा सण

कोल्हापूरच्या देवीचा सोन्याचा साज
….चं नाव घेतो वटपौर्णिमेचा सण आज

Latest वटपौर्णिमा चे उखाणे | New Vat Purnima Ukhane In Marathi

Latest वटपौर्णिमा उखाणे | New Vat Purnima Ukhane In Marathi

वटपौर्णिमेसाठी उखाणे घेताना हल्ली नव्या पिढीच्या मुलींना वेगवेगळे आणि मजेशीर उखाणे घ्यायलाही आवडते. नव्या पिढीच्या महिलांसाठी Latest वटपौर्णिमा चे उखाणे (vat pournima ukhane)

वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा, 
…रावांची मी, आयुष्यभर करेन सर्वांची सेवा 

वृक्षाच्या छायेत, वनदेवी घेते विसावा
…रावांचे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा

पानापानावर पसरले कोवळे कोवळे ऊन
…रावांचं नाव घेते …ची सून (vatpornima ukhane)

भरजरी साडीला जरीचा खण
… रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण

दाराच्या अंगणात प्राजक्तांच्या फुलांचा सडा
वटपौर्णिमेचा सण आज हातात भरते … रावांच्या नावाचा हिरवा चुडा

वडाची पूजा आज मनोभावे करते
… रावांसाठी दीर्घायुष्य मागते

दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
………चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी

नाजूक अनारसे साजूक तुपात तळावेत,
…… सारखे पती जन्मोजन्मी मिळावेत

संसाराच्या देव्हा-यात उजळतो नंदादीप समाधानाचा
…रावांचे नाव घेऊन, वटपौर्णिमेच्या दिवशी आशिर्वाद अखंड सौभाग्याचा

अलंकरात अलंकार ठरतं मंगळसूत्र मुख्य 
वटपौर्णिमेच्या सणाच्या दिवशी सांगते…रावांचा आनंद हेच माझं सौख्य  (vat pournima ukhane)

पारंपरिक वटसावित्री पौर्णिमा चे उखाणे | New Traditional Vat purnima Ukhane In Marathi

New वटपौर्णिमा पारंपरिक उखाणे | New Traditional Vat purnima Ukhane In Marathi

महाराष्ट्रीयन सणांना पारंपरिक उखाण्यांचे खूपच महत्त्व आहे. असेच वटपौर्णिमेच्या पारंपरिक सणासाठी काही New वटसावित्री पौर्णिमा चे उखाणे (vat purnima che ukhane) खास तुमच्यासाठी. वटपौर्णिमा उखाणे घ्या पारंपरिक स्वरूपात 

तीन वर्षातून एकदा येतो अधिकमास 
…रावांचे नाव घेते आज केला वटपौर्णमेचा उपवास 

वटवृक्ष सांगतो, सत्यवान-सावित्रीचा इतिहास…
…रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेसाठी खास

वडाची पूजा करून, मागितले दीर्घायुष्याचे दान…
…रावांसोबत, मी संसार करीन छान

वडाच्या झाडाला घातल्या, प्रदक्षिणा एकशे आठ…
…रावांसोबत बांधली, मी जन्मोजन्मीची गाठ (vat purnima che ukhane)

रामाने सीतेसाठी, उचलले शिवधनुष्य…
…रावांसाठी मागते, देवाकडे दीर्घायुष्य

वटपौर्णिमेला आहे, वडाला खूपच महत्त्व…
…रावांची वाढत राहो, कीर्ती आणि कर्तृत्व

पतिव्रता धर्माचा, सावित्री आहे आदर्श…
…रावांचे नाव घेताना, होतो खूपच हर्ष

वटपौर्णिमेचे व्रत, निष्ठेने करते…
…रावांसाठी मी, दीर्घायुष्य मागते

सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न 
….रावांसोबत झाले आताच माझे लग्न

वडाची पूजा मनोभावे करते वटपौर्णिमेच्या दिवशी 
….. रावांसाठी दीर्घायुष्य मागते सर्वांना ठेऊन साक्षी

वटपौर्णिमा स्पेशल उखाणे | Vat Purnima Special Ukhane In Marathi

वटपौर्णिमा स्पेशल मराठी उखाणे | Vat Purnima Special Ukhane In Marathi

वटपौर्णिमा हा अनेक महिलांसाठी खास दिवस असतो. आजही आपल्या पतीसाठी अनेक महिला हे व्रत अगदी मनोभावे करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या मैत्रिणींसह वडाची पूजा करायलाही अनेक जणी ऑफिसला खास सुट्टी घेऊन जातात. अशाच महिलांसाठी वटपौर्णिमा स्पेशल मराठी उखाणे (vat purnima ukhane in marathi)

देवीची भरली ओटी वाचला देवीचा पाठ
….. रावांबरोबर बांधली जन्मोजन्माची गाठ

जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी
 …… रावांची साथ जन्मोजन्मी असावी

नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे 
….. रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे

वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा मी करते 
….रावांना 100 वर्ष आयुष्य लाभू दे इच्छा हीच व्यक्त करते

वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस 
….रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस (vat purnima ukhane in marathi)

गुरूंनी दिले ज्ञान, आईवडिलांनी दिले संस्कार
वटपौर्णिमेच्या दिवशी देते वचन, …रावांसोबत करेन संसाराची नौका पार 

वटपौर्णिमेच्या दिवशी होत आहे वडाच्या फांदीची तोड 
…रावांचं नाव घेऊन सांगते, फांदीची पूजा करण्याचा वेडेपणा सोड

सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात
…रावांचं नाव घेऊन सांगते, वटपौर्णिमेच्या पूजेसाठी सोडा माझी वाट 

मावळला सूर्य, चंद्र उगवला आकाशी, 
….रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेच्या दिवशी 

बांधते धागा वडाला, त्या धाग्यात नात्याचे बंधन 
…रावांच्या चरणी आता साता जन्माचे समर्पण

निष्कर्ष – वटपौर्णिमा उखाणे | Vat Purnima Ukhane In Marathi

वटपौर्णिमा उखाणे तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही नक्की या लेखाचा आधार घ्या. या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तुम्ही नववधूसाठी सुंदर वटपौर्णिमा उखाणे, नवऱ्यासाठी खास उखाणे, बायकोसाठी वटपौर्णिमा उखाणे, Latest वटपौर्णिमा उखाणे, New वटपौर्णिमा पारंपरिक उखाणे नक्कीच येथून मिळवू शकता. वटपौर्णिमा उखाणे, vat purnima ukhane in marathi, vat pournima ukhane, vatpornima ukhane, वटसावित्री पौर्णिमा चे उखाणे, vat purnima che ukhane, vat purnima special ukhane, वटपौर्णिमा चे उखाणे, marathi ukhane for vat purnima

Read More From लाईफस्टाईल