Care

ग्लोबल हेअर कलर म्हणजे काय आणि तो कोणी करावा?

Leenal Gawade  |  Nov 29, 2020
ग्लोबल हेअर कलर म्हणजे काय आणि तो कोणी करावा?

हेअर कलर करणे हा सध्याचा ट्रेंड आहे. पूर्वी पांढरे केस काळे करण्यासाठी फक्त केस रंगवले जात होते. पण आता मात्र लुक बदलण्यासाठी केसांना रंग केला जातो. केसांना रंग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. हल्ली ग्लोबल कलर आणि हायलाईट्स असे दोन प्रकार करुन पाहा असे स्टायलिस्ट कडून सांगितले जाते. पण ग्लोबल कलर म्हणजे काय तो कोणी करावा आणि रंगाची निवड कशी करावी. या केसांच्या महत्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेऊया.

घरगुती हेअर मास्कने करा घरच्या घरी हेअर स्पा

ग्लोबल कलर म्हणजे काय?

Instagram

 ग्लोबल ही केसांना रंग करण्याची एक पद्धत असून यामध्ये रुट ते टिपपासून केसांना एकच रंग दिला जातो. केसांना रंग देण्याची ही पद्धत पांढऱ्या रंगाना काळे करण्याची नसते. पण तुमची स्किनटोन उठावदार दिसण्यासाठी योग्य अशा रंगाची निवड केली जाते. ग्लोबल कलर केल्यामुळे तुमच्या लुकमध्ये नक्कीच फरक पडतो.  ग्लोबल रंग हा त्यामुळे इतर हेअर कलरपेक्षा वेगळा दिसतो. 

हेअर कलर करायचा विचार करताय, तुमच्या राशीनुसार निवडा या शेड

असे केले जाते ग्लोबल हेअर कलर

आयब्रोज कलर करण्यासाठी नैसर्गिक उपाय

कोणी करावे ग्लोबल हेअर कलर

Instagram

ग्लोबल हेअर कलर हे कोणी करावे हा प्रश्न तुम्हाला पडल असेल तर  तुम्ही या काही पॉईंटसकडेही लक्ष द्यायला हवे. 

ग्लोबल कलरचा साधारण  खर्च हा 5 ते 7  हजार रुपयांच्या घरात असतो. तुम्ही त्याची जितकी काळजी घ्याल तितका तुमचा रंग जास्त टिकतो. 

Read More From Care