आयुष्य

‘या’ कारणामुळे लग्नानंतर अचानक वाढतं वजन

Aaditi Datar  |  Feb 20, 2020
‘या’ कारणामुळे लग्नानंतर अचानक वाढतं वजन

लग्न मानवलं वाटतं तुला…लग्नानंतर अशी कॉम्प्लिमेंट बऱ्याच जणांना हमखास मिळते. यामागील कारण आहे ते लग्नानंतर वाढणारं वजन. लग्न झाल्यावर बरेचदा अनेकजणांचं वजन वाढल्याचं निदर्शनास येतं. वयस्कर माणसं तर लग्नाआधी बारीक असणाऱ्यांना हमखास सल्ला देतात की, लग्नानंतर आपोआप जाड होशील. हे वजन वाढणं स्त्री आणि पुरूष दोघांना लागू होतं. लग्न होताच जेव्हा अचानक वजन वाढतं तेव्हा अनेकजण चिंतित होतात आणि मनात अनेक प्रश्नही येतात. काय आहेत लग्नानंतर वजन वाढण्याची नेमकी कारणं जाणून घेऊया.

पुरूषांपेक्षा महिला अग्रेसर 

नुकत्याच एका संशोधनात हे आढळून आलं आहे की, लग्नानंतर पाच वर्षांच्या आत 82 टक्के कपल्सचं वजन 5 ते 10 किलोने वाढतं. वजन वाढण्याच्या बाबतीत महिला अग्रेसर आहेत. कारण महिलांचं वजन पुरूषांच्या तुलनेत जास्त वेगाने वाढतं.  

सतत बाहेर खाणं

लग्नानंतर बरेचदा नातेवाईकांकडे जाणं, मित्रमैत्रिणींना भेटणं आणि बाहेर जेवण्याचं प्रमाणही वाढतं. असं अनेक आठवडे सुरू राहतं. तसंच हनिमूनला गेल्यावरही आपण बिनधास्तपणे बाहेर खाण्याचा मनमुराद आनंद घेतो. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आहारातील कॅलरीज वाढतात. 

खाण्यापिण्यातील बदल

लग्नानंतर मुलीचं घर बदलतं. त्यासोबतच तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींमध्ये बदल होतो. ज्यामध्ये खाण्यापिण्याच्या सवयी आणि आहाराचाही समावेश होतोच. माहेर आणि सासरचं जेवण आणि बनवण्याच्या पद्धती या वेगवेगळ्या असल्यामुळे साहजिकच पचनक्रियेवरही परिणाम होतो. शिवाय माहेर जेवणानंतरचा मिळणारा मोकळा वेळ सासरी मिळेलच असं नाही.

Canva

वेटलॉससाठी करून पाहा ‘ही’ योगासनं

हार्मोन्समध्ये होणारा बदल

लग्नानंतर शरीरसंबंधामुळे महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. यामुळे बरेचदा लग्नाआधी बारीक असणाऱ्या मुली अचानक लग्नानंतर जाड होतात. पण लग्नानंतर हा बदल प्रत्येक महिलेच्या बाबतीत घडतोच. याची कल्पना प्रत्येक महिलेला आधीच असायला हवी आणि याबाबत घाबरण्याचंही काहीच कारण नाही.  

जबाबदाऱ्यांमध्ये वाढ

लग्नानंतर स्त्रिया आपल्या आवडीने नाहीतर नवरा आणि सासरकडच्या लोकांच्या आवडीने जेवण बनवण्याला पसंती देतात. सासरकडच्यांना खूष करण्याच्या नादात भरपूर प्रमाणात तूप, तेल आणि मसाल्यांचाही वापर केला जातो. एवढी मेहनत करून केलेलं जेवण वाया जाऊ नये म्हणून बरेचदा गरजेपेक्षा जास्तही खाल्लं जातं. वेळेनुसार तुमच्या प्राथमिकतांमधील बदल हा वजन वाढण्यामागचं कारण आहे. 

तणाव (Stress)   

लग्नानंतर नव्या वातावरणात स्वतःला अॅडजस्ट करताना सुरूवातीला थोडं कठीण जातं. अशा वेळी नववधूच्या जवाबदाऱ्यांमध्ये वाढ झाल्याने तणावही वाढतो. ऑफिससोबतच घरीसुद्धा बेस्ट देण्याच्या प्रयत्नात नेहमी तणावात राहणं आणि स्ट्रेस ईटींगच्या आहारी स्त्रिया जातात. 

स्वतःकडे दुर्लक्ष करणं

लग्नाआधी बऱ्याच जणी आपल्या आरोग्याची काळजी घेतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करतात. पण लग्नानंतर या सर्व गोष्टी अचानक बदलतात. नको असतानाही तणाव घेणं आणि व्यायामासाठी वेळ न मिळणं. जेवणाच्या वेळा बदलणं यासारखी गोष्टी घडतात. असाही विचार केला जातो की, आता तर लग्न झालं, आता काय फरक पडतो.

भारतीय लग्नातील अजबगजब प्रथा-परंपरा

पती-पत्नीच्या वयामध्ये ‘या’ कारणामुळे असावं किमान 5 वर्षांचं अंतर

तर अशा सर्व गोष्टींमुळे लग्नानंतर बऱ्याच जणींच्या वजनात वाढ झाल्याचं आवर्जून दिसतं. तुमचंही नवीन लग्न झालं असेल तर वरील गोष्टींची वेळीच दखल घ्या. कारण लग्न झालं म्हणून वजन वाढू देणं किंवा तणावग्रस्त राहणं हे तुमच्या आरोग्यासाठी योग्य नाही. त्यामुळे निरोगी राहा आणि पौष्टिक खा.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

Read More From आयुष्य