बचत आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं सुखी आणि संपन्न जीवनासाठी खूप गरजेचं आहे. कारण सर्वच गोष्टी पैशांने विकत घेता येत नसल्या तरी सुखसुविधांसाठी पुरेसा पैसा लागतोच…. अनेकांना प्रश्न पडतो की गुंतवणूक नेमकी कोणत्या वयापासून सुरू करावी. बचत करणं सर्वच वयोगटासाठी गरजेचं असलं तरी तज्ञ्जांच्या सल्लानुसार लहान वयात गुंतवणूक करणं नेहमीच फायदेशीर ठरतं. त्यामुळे तुम्ही कॉलेजला जाणारे विद्यार्थी असा अथवा नुकतीच नोकरी अथवा उद्योग सुरू केलेले तरूण तुम्ही या वयातच स्वतःला बचतीची आणि पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्याची सवय लावायला हवी. वयाच्या विशीत गुंतवणूक केल्यास तुमच्या उतार वयात तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. यासाठीच योग्य वयातच तुमच्या आर्थिक गुंतवणूकीची गणितं ठरवा आणि बचतीला लागा.
#MoneyTips : या सोप्या ideas ने वाचवा तुमचे पैसे (Tips To Save Money In Marathi)
लहान वयात गुंतवणूक करण्याचे फायदे
लहान वयात गुंतवणूक केल्यामुळे तुमचे आयुष्य सुखी आणि सुरक्षित होऊ शकते. जर तुम्हाला वाटत असेल की बचत करण्यासाठी तुम्ही अजून लहान आहात तर ही कारणं तुम्ही नक्की वाचायला हवीत.
जास्त बचत जास्त फायदा –
लहान वयात बचत करण्यामुळे तुम्हाला योग्य वयात बचतीची सवय लागते. कारण जितके जास्त तुम्ही पैसे वाचवाल आणि गुंतवणूक कराल तितका जास्त फायदा तुम्हाला भविष्यात मिळतो. एकदा ही विचारसरणी तुमच्या मनाने पक्की केली की आपसूक तुमचे हात बचतीकडे वळतात. यासाठी आता तुम्हाला फक्त तुमचे अनावश्यक खर्च आणि प्रलोभने टाळायला हवीत. कारण हेच पैसे तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी उपयोगी पडतील.
जास्त रिकव्हरी टाईम –
पैसे गुंतवणूक करताना काही वेळा अनेक आव्हानांना समोर जावं लागतं. जेवढी जास्त गुंतवणूक तेवढाच धोकाही जास्त असू शकतो. मात्र जे लोक लहान वयात गुंतवणूक करण्यास सुरूवात करतात. त्यांच्यासाठी जोखीम नेहमीच कमी असते. कारण त्यांच्याकडे रिकव्हरी टाईम इतरांपेक्षा जास्त असतो. म्हणूनच प्रत्येकाने लहान वयात गुंतवणूक करायला हवी. ज्यामुळे भविष्यात जास्त पैसे कमवता येतात.
जास्त वेळेमुळे पैशांचे योग्य मुल्य –
लहान वयात गुंतवणूक केल्यामुळे तुमचा गुंतवणूक काळ वाढतो. ज्यामुळे तुम्हाला चक्रवाढ व्याजाने परतावा मिळतो. कारण पैसै गुंतवणूक करण्याचा काळ जितका जास्त तितकं तुमच्या पैशांचे मुल्य वाढत जाते. जर तुम्ही खूप लहान वयात गुंतवणूकीला सुरूवात केली तर तुमच्या निवृत्तीच्या काळात तुम्हाला चांगला फायदा होतो. शिवाय यामुळे तुम्ही योग्य वयात गुंतवणूक आणि आर्थिक गणिते शिकता. काळानुसार तुमच्या पैशांमध्ये वाढ होत जाते. सहाजिकच तुम्ही लवकर श्रीमंत होता आणि इतरांपेक्षा जास्त सुखवस्तू जीवन जगता. ‘या’ सोप्या टिप्स वापरून करा बचत आणि व्हा श्रीमंत
भविष्य सुरक्षित होतं –
जीवनात कधी तुम्हाला जास्त पैशांची गरज लागेल हे सांगू शकत नाही. अनेक वेळा अपरिहार्य कारणांसाठी खर्च करावा लागतो. अशा वेळी लोकांकडे कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र जर तुम्ही लहान वयात गुंतवणूक केलेली असेल तर कठीण काळात तुमच्या हातात पुरेसा पैसा असतो. लहान वयात गुंतवणूक करणाऱ्या लोकांचे भविष्य नेहमीच सुरक्षित असते. उलट तुम्ही स्वतःसोबत इतरांना पण मदत करण्यासाठी पात्र ठरता. तरूण वयात तुमच्याकडे इतके पैसे असता की तुम्ही एखाद्या गरजूला पैशांची मदत करू शकता. घरगुती खर्चासाठी महिन्याचे बजेट ठरवताना फॉलो करा या सोप्या टिप्स
जोखीम घेण्याची क्षमता वाढते –
तरूण गुंतवणूकदारांमध्ये वयस्कर गुंतवणूकदारांपेक्षा जोखीम घेण्याची क्षमता जास्त असते. वय झाल्यानंतर जोखीम घेण्यापेक्षा स्थिर आयुष्य जगणं जास्त सोयीचं असतं. पण तुम्ही लहान वयातच श्रीमंत झाल्यामुळे तुम्ही उद्योगक्षेत्रात उंच भरारी घेऊ शकता. असं म्हणतात की “More the risk, more is the reward”म्हणजे आयुष्यात जोखीम घेण्याची क्षमता जितकी जास्त तितका फायदापण जास्त मिळतो. थोडक्यात तरूण वयात गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला फायदाच जास्त मिळतो.
असा सुरू करा घरगुती व्यवसाय, सहज सोप्या कल्पना (Home Business Ideas in Marathi)
Read More From आपलं जग
नागपंचमी मराठी माहिती | Nag Panchami Chi Mahiti | Nag Panchami Information In Marathi
Aaditi Datar