लाईफस्टाईल

जागतिक मराठी भाषा दिन

Dipali Naphade  |  Feb 25, 2019
जागतिक मराठी भाषा दिन

जागतिक मराठी भाषा दिन म्हणजे 27 फेब्रुवारी. पण याच दिवशी हा दिवस का साजरा केला जातो हे सर्वांना माहीत आहे का? वास्तविक प्रत्येक मराठी माणसाला कुसुमाग्रजांची माहिती असायला हवीच. कुसुमाग्रज अर्थात ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. ‘नटसम्राट’ या महान नाट्यकृतीसाठी कुसुमाग्रजांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तर 1988 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सम्मानित झालेले कुसुमाग्रज हे दुसरे मराठी साहित्यिक होते. वि. स. खांडेकर यांच्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवल्यानंतर कुसुमाग्रज हे दुसरे मराठी साहित्यिक होते ज्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला होता. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर हा दिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

मराठी भाषेचे मूळ

असं म्हणतात मराठी भाषेचा उगम हा उत्तरेकडे झाला. मराठी भाषा ही मूळ आर्यांची भाषा होती. या भाषेला साधारणतः 1500 वर्षांचा इतिहास असल्याचंही सांगण्यात आलं आहे. या भाषेचा विस्तार नंतर सातपुडा पर्वतांच्या रांगांपासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील भागापर्यंत आणि मग दमणपासून ते अगदी दक्षिण टोक गोव्यापर्यंत झाला. वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश अशा अनेक टप्प्यांमधून मराठीचा विकास होत मराठी भाषेची उत्क्रांती होत गेली. मराठी भाषेतील पहिलं वाक्य हे श्रवणबेळगोळ मधील शिलालेखावर सापडलं असा उल्लेख आहे. कवी मुकुंदराज आणि ज्ञानेश्वर हे खरंतर मराठीचे आद्यकवी मानले जातात. तर शके 1110 मध्ये मुकुंदराजांनी लिहिलेला ‘विवेकसिंधु’ हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ असल्याचं म्हटलं जातं. काळ आणि स्थळानुसार मराठी भाषा बदलत गेली. त्यामधूनच मुख्य मराठी, मालवणी मराठी,  वऱ्हाडी, कोल्हापुरी, अहिराणी असे अनेक मराठीचे पोटप्रकारदेखील आले. तर पेशव्यांच्या काळामध्ये मराठी भाषेवर संस्कृतचे वर्चस्व प्रस्थापित झालेले दिसून आले. तर पेशवाईच्या अस्तानंतर इंग्रजी भाषेच्या सत्तेमध्ये मराठी भाषेची रचना बऱ्याच अंशी बदलली. इंग्रजांची सत्ता स्थापन झाल्यानंतर इंग्रजी साहित्याच्या प्रभावामुळे मराठीमध्ये अनेक कादंबरी, निबंध, लघुकथा असे नवे साहित्यप्रकार उदयाला आले. त्यामुळेच अनेक लेखक मराठीमध्ये नावाजले जाऊ लागले.

वाचा – मराठी भाषा दिन शुभेच्छा

मराठी भाषेची सद्यस्थिती  

वाचा – इंग्रजी शिका पटकन

मराठी भाषेची सद्यस्थिती नेमकी काय आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. खरं तर मराठी भाषिक लोकांनाच मराठी बोलण्याची बहुतांश वेळा लाज वाटते. पण खरंच याची गरज नसते. मराठी भाषेचं संवर्धन करायचं असेल तर, मराठीतील प्रत्येक बोलीभाषेचा विकास व्हायला हवा. यासाठी आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांनी आपल्या बोलीभाषाचे लाज न बाळगता दैनंदिन जीवनात वापर करायला हवा. तसंच आपल्या मराठी भाषेचे व्याकरण समजून घेणं, त्या भाषेचा अधिक विकास करून त्यामध्ये साहित्यनिर्मिती करणे यासारख्या गोष्टी प्राधान्य देऊन करायला हव्यात. भाषा शिक्षणासाठी शाळा गरजेची आहे. खरंतर आता मराठी शाळांमध्ये मुलांना कोणतेही पालक अॅडमिशन घेत नाही. पण असं असलं तरीही आपल्या मुलांना निदान मराठी भाषेची योग्य ओळख करून देणं हे पाल्याचं काम आहे आणि अशा तऱ्हेनेच मराठी भाषा टिकेल. खरं तर मराठी भाषा संवर्धनाची गळती थांबवणं हे आपल्या हाताताच आहे. मराठी शाळेत शिकलेले विद्यार्थी मराठी टिकवतील ही कल्पनाही साफ चुकीची आहे. वास्तविक सर्वच मराठी माणसांनी आपली भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. त्यासाठी जितकं जास्तीत जास्त जमेल तितकं मराठीमध्ये बोलायला हवं. मुळात आपल्या भाषेची लाज बाळगता कामा नये. प्रत्येक शाळेत जसं दर्जेदार इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न केला जातो. तसंच निदान मुंबईमध्ये मराठीदेखील तितकंच दर्जेदार शिकवण्याचा प्रयत्न व्हायला हवा. शिवाय आपल्या मुलांना इंग्रजीप्रमाणेच मराठी साहित्याची ओळख करून देत साहित्य घरामध्ये उपलब्ध करून द्यायला हवं. नुसतं नाक मुरडण्यापेक्षा आपणच त्यासाठी पावलं उचलायला हवीत.

साहित्यासाठी मराठी लायब्ररी उपलब्ध

मराठी साहित्य खूपच प्रसिद्ध आहे. अगदी बालकथांपासून सर्व कथा मराठी साहित्यामध्ये लिहिल्या जातात. त्यामुळे आपल्या पाल्याला मराठी साहित्याची आवड लावायची गरज आहे. इंग्रजी पुस्तकं आणि मराठी पुस्तकं दोन्ही आपल्या पाल्याने वाचावीत यासाठी मुळात पालकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, पै फ्रे्ंडस लायब्ररी असे अनेक पर्याय यासाठी उपलब्ध आहेत. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाबद्दल सर्वांनाच माहीत आहे. पण आता पै फ्रेंड्स लायब्ररीदेखील नावाजली जात आहे.

पै फ्रेन्डस् लायब्ररीची ठळक वैशिष्ट्ये:-

1) विविध विषयांवरील मराठी व इंग्रजीतील अडीच लाखांहून अधिक पुस्तके

2) डोंबिवलीत सहा वेगवेगळ्या ठिकाणी वाचनालयाची शाखा

3) पुस्तके घरपोच सेवेच्या माध्यमातून मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे गेली ८ वर्ष सेवा देण्यात येते

4) दिनांक १ जानेवारी २०१५ रोजी एका दिवसात १०२१ सभासद नाव नोंदणी करून थेट ‘लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड्स्’ मध्ये नाव नोंदवून प्रशस्ती पत्रक मिळवले

5) बालकुमारांसाठी दरवर्षी दिनांक २ ऑक्टोबर रोजी लेखक बालवाचक महोत्सवाचे आयोजन

6)बाल गोपाळांसाठी इंग्रजी व मराठी पुस्तकांचा खजिना

7)अडीच हजारांहून अधिक दिवाळी अंक

त्यासाठी तुम्हाला www.friendslibrary.in  यावर क्लिक करून अधिक माहितीदेखील मिळवता येते.

अशा लायब्ररी असताना तुम्हाला कुठेही आपल्या मुलांना मराठी शिकवताना कमतरता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं मात्र आवश्यक आहे.

केवळ दिन साजरा करू नका तर जपा

जागतिक मराठी दिन हा केवळ एक दिवस साजरा करू नका तर कायमस्वरूपी आपल्या भाषेचा अभिमान बाळगून ही भाषा जपण्याचा प्रयत्न केल्यास, या दिनाचं महत्त्व नक्कीच फळाला येईल. प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तीने इंग्रजी शिकतानाच तितकाच मराठी भाषेचा अभ्यास करावा. अगदीच अभ्यास करणं जमणार नसलं तरीही निदान आपली भाषा शुद्ध आणि व्यवस्थित बोलता येईल याची तरी काळजी घ्यावी. आपल्या येणाऱ्या पिढीला मराठीचं योग्य प्रशिक्षण देऊन नेहमी मराठीमध्येच बोलण्यास प्रवृत्त केल्यास, आपली भाषा आपण योग्य तऱ्हेने जपू शकतो, याचं भान नक्की ठेवा.

फोटो सौजन्य – Instagram 

हेदेखील वाचा 

‘टोटल धमाल’ ची बॉक्स ऑफिसवर धूम

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘ह.म.बने तु.म.बने’ समजवणार ‘गुड टच आणि बॅड टच’

अभिनेत्री स्मिता तांबेचं नवीन क्षेत्रात पदार्पण

महाराष्ट्र दिन शुभेच्छा (Maharashtra Day Wishes In Marathi)

Read More From लाईफस्टाईल