लाईफस्टाईल

100+ बेस्ट योगा कोट्स इन मराठी | Yoga Day Quotes In Marathi

Dipali Naphade  |  Jun 20, 2022
100+ बेस्ट योगा कोट्स इन मराठी | Yoga Day Quotes In Marathi

जागतिक योग दिन (World Yoga Day) आपण 21 जून रोजी साजरा करतो. योगा हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग असायला हवा. कारण योगामुळे आणि ध्यानधारणेमुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही गोष्टी सुधारण्यास मदत मिळते. निरोगी आयुष्यासाठी योग महत्त्वाचे आहे. योगा हे आपले शरीर अधिक तंदुरुस्त राखण्यासाठी मदत करते. शीर्षासन, धनुरासन, भुजंगासन, मलासन, ध्यानधारणा, सूर्यनमस्कार असे अनेक योगप्रकार आहेत. तुम्हीही योगा दिनासाठी जर आपल्या मित्रमैत्रिणीला काही कोट्स पाठवणार असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास कोट्स आणले आहेत. योगा दिनाच्या शुभेच्छांसह (Yoga Day Wishes In Marathi) तुम्ही आता योगा कोट्सही पाठवू शकता. योगा कोट्स इन मराठी (Yoga Quotes in Marathi) खास तुमच्यासाठी. 

योग कोट्स मराठी | Yoga Quotes In Marathi

योग कोट्स मराठी – Yoga Quotes In Marathi

योगा म्हटलं की नक्की यामध्ये काय मिळतं असा प्रश्न अनेकांना पडतो. पण योगामुळे आयुष्यात खूपच फरक पडतो. तुमचं तन आणि मन शुद्ध राखण्यासाठी याचा उपयोग होतो. इतकंच नाही तर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीही याचा उपयोग होतो. असेच काही योग कोट्स मराठीमध्ये (Yoga Quotes In Marathi). 

चला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करूया,
आपण जगभर योग पसरवूया

आपले आरोग्य ही खरी संपत्ती आहे 
सोने आणि चांदीचे तुकडे नाहीत 
म्हणून योगाद्वारे आरोग्य टिकवा

निर्धार नियमित योग करण्याचा
आजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचा

योग आपल्याला अशी ऊर्जा देते 
जी आपण हजारो तास काम करूनही मिळवू शकत नाही

स्वस्थ जीवन जगणे, हे जीवनाचे भांडवल आहे,
रोज योग करणे ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे

योग म्हणजे मनातील चढउतार स्थिर करण्याची प्रक्रिया
मन शांत करण्याचा योग म्हणजे योग

योगाचा नियमित सराव करा,
आयुष्य आनंदी आणि निरोगी करा!

आमच्याकडे प्राचीन काळात आरोग्य विमा नव्हता 
परंतु एक पैसा खर्च न करता आपल्या आरोग्याची हमी देणारा एक अभ्यास
म्हणून आपल्या सर्वांमध्ये योग आहे

योग आहे आरोग्यासाठी क्रांती
तुमच्या आयुष्यात आणेल सुख आणि शांती

योग घोषवाक्य मराठी | Yoga Slogans In Marathi

योग घोषवाक्य – Yoga Slogans In Marathi

प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरेजेच आहे आणि यासाठी तुम्ही योगाभ्यास करायला हवा. योगासनाचे अनेक प्रकार आहेत आणि व्यायामाचे महत्त्वही आहे. योगाचा आपल्या आयुष्यात समावेश करून याचे महत्त्व आपल्या मित्रमैत्रिणींनाही पटवायला हवे. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तरीही तुम्ही योगाचा आधार नक्कीच घेऊ शकता. याशिवाय तुम्हीही वापरा अशी काही योग घोषवाक्य (Yoga Slogans In Marathi) आणि करा योगाभ्यास!

आरोग्याला द्या अधिक प्राधान्य, योगा येईल कामी!

मनाला अधिक आनंदी करूया, योगाकडे वळूया!

आयुष्य करायचे असेल निरोगी आणि आनंदी, योगाचा ध्यास घ्या मनोमनी!

नियमित करा योगाचा सराव, आरोग्याला द्या कायम सराव!

सकाळ अथवा संध्याकाळ, रोज करा योग

कधीही येणार नाही जवळ कोणताही रोग 

समाधान आणि संतोष ही सर्वात मोठी संपत्ती, मिळते केवळ योगपोटी!

नियमित करा योग, दूर करा रोग!

योग स्टेटस मराठी | Yoga Status In Marathi

निरोगी जीवनाची गुरुकिल्ली, म्हणजे रोजच्या आयुष्यात लावायलाच हवी योगाची हजेरी!

आरोग्यासाठी फायदेशीर आणि गुणकारी आहे योग, लाभ घ्यायलाच हवा रोज!

जीवनाचे करायचे असेल सार्थक तर योगाभ्यास हवा रोज!

योग आहे आरोग्यासाठी क्रांती, नियमित योगामुळे जीवनात येते सुख-शांती

स्वतःला बदलाल, तरच जग बदलेल, योग केल्यास आयुष्य आनंददायी ठरेल!

योग असेल जेथे, रोग नसेल तेथे!

योग असेल जिथे, आरोग्य वसेल तिथे!

योगाशिवाय मनःशांती नाही, योग असेल तिथे रोग नाही!

योग दिन कोट्स मराठी | Yoga Day Quotes In Marathi

योग दिन कोट्स मराठी – Yoga Day Quotes In Marathi

योग दिन आता अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही साजरा करण्यात येतो. 21 जून रोजी संपूर्ण देशभरातच नाही तर अगदी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा करण्यात येतो. अगदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यापासून योगा दिन साजरा करण्यात येतो. योगा किती महत्त्वाचा आहे याबाबत माहिती नेहमीच दिली जाते. योग दिन कोट्स मराठीमध्ये (Yoga Day Quotes In Marathi) खास तुमच्यासाठी. जाणून घ्या योगाविषयी आणि द्या योग दिनाच्या शुभेच्छा. 

सामूहिक योग करणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की योगप्रकार करू शकता. 
योग चैतन्य, एकाग्रता आणि उत्पादकता वाढवते; 
हे मानवी शरीर, मन आणि माणसाची भावना स्थिर करते. योग दिनाच्या शुभेच्छा! 

आपल्याला जर योग करायचा असेल तर 
योग करण्याची सर्वात आवश्यक साधने म्हणजे
आपले शरीर आणि आपले मन – योग दिनाच्या शुभेच्छा!

आजच्या काळात स्वतःच स्वतःशी जोडले जाण्यासाठी काही महत्त्वाचे असेल तर ते म्हणजे योग!

योग केवळ आत्म सुधारणेबद्दल नाही, ते आत्म-स्वीकृतीबद्दल शिकवते – योग दिनाच्या शुभेच्छा!

मोबाईल जसा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, योगाभ्यासदेखील अविभाज्य भाग बनवा आणि निरोगी राहा

योग खूप आश्चर्यकारक आहे, योगा केल्याने आपल्या आरोग्यावरील समस्या दूर होते
आणि त्याच वेळी आपल्याला स्वतःबाबत निरीक्षणदेखील कळते

योग हा धर्म नाही तर हे एक विज्ञान आहे,
निरोगीपणाचे विज्ञान आहे, तारुण्याचे विज्ञान आहे – योग दिनाच्या शुभेच्छा!

योगाने होते शरीर नियंत्रित, मन आणि आत्म्याचे आहे हे विज्ञान 

तन, मन, आत्मा आणि बुद्धी यांची सांगड घालणारा योग

तुमच्या आयुष्यात समतोल घेऊ येवो! योग दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!

निरोगी तन, मन आणि आत्म्याची शांती म्हणजे ‘योग’

वाचा – Yoga For Glowing Skin in Marathi

योग दिन शुभेच्छा मराठी | Yoga Day Wishes In Marathi

योग दिन शुभेच्छा मराठी – Yoga Day Wishes In Marathi

योग दिनाच्या शुभेच्छा मराठीमध्ये देणे तुम्हाला आता सहज शक्य आहे. योगाचे महत्त्व तुम्हाला कळले असेल तर तुम्ही या शुभेच्छा (Yoga Day Wishes In Marathi) देत आपल्या मित्रमैत्रिणींनादेखील प्रभावित करा. योगा करण्यासाठी तुम्ही दिवसातून कधीही वेळ काढू शकता. तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी वेळ काढायलाच हवा. योगाचे फायदे आणि महत्त्व हेदेखील जाणून घ्यायला हवे. या योग दिनाला तुम्हीही करा उत्तम सुरूवात आणि द्या योग दिन शुभेच्छा!

योग निसर्गाजवळ नेतो आणि योग देतो ईश्वराची अनुभूती – तुम्हा सर्वांना योगदिनाच्या शुभेच्छा!

योग करा, योगी बना आणि आपले जीवन सार्थकी लावा – योग दिन शुभेच्छा!

नियमित योगा करण्यावर द्या भर जे तुमचे शरीर सुदृढ ठेवण्यास, मदत करेल आयुष्यभर – Yoga Dinachya Shubhechha

मन ठेवायचे असेल शांत, तर योगा नियमित करणे आहे अनिवार्य! – योग दिनाच्या शुभेच्छा!

नियमित करा योगा, सुदृढ आरोग्य तुम्ही उपभोगा – योग दिनाच्या शुभेच्छा!

माणसाची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढवायची असेल तर तुम्ही योगाभ्यास करणे आहे महत्त्वाचे! – योग दिनाच्या शुभेच्छा!

जगाला आनंदी आणि सुदृढ करूया, चला सर्व योगाकडे वळूया – जागतिक योग दिन शुभेच्छा!

ज्यांना आजारांनी वेढलेले आहे, त्यांना योग हाच आधार आहे – योग दिनाच्या शुभेच्छा!

एक, दोन, तीन, चार, योगाचाच व्हायला हवा विचार! – योग दिनाच्या शुभेच्छा!

रोगमुक्त आयुष्य जगायचे असेल तर तुम्ही घ्या योगाचा आधार – जागतिक योग दिन शुभेच्छा!

योग ही एक प्रकारची मानसिक आणि शारीरिक ऊर्जा आहे. योगाचा आधार घेऊन तुम्ही आयुष्यभर निरोगी आणि आजारांपासून दूर राहू शकता. आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. सध्या याची काळजी घेणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्हाला तुमचे शरीर आणि मन निरोगी ठेवायचे असेल तर तुम्हीही योगाचा आधार घ्या. मनःशांती जपण्यासाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यसाठी, जागतिक योग दिन साजरा करण्यासाठी तुम्हीही तुमच्या मित्रमैत्रिणींना प्रवृत्त करा आणि त्यांनाही पाठवा शुभेच्छा! तंदुरूस्त राहा योग करा!

FAQ’s – योगा कोट्स इन मराठी | Yoga Quotes In Marathi

प्रश्न – योगा नियमित केल्याने खरंच फायदा होतो का?
उत्तर – योगामुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही फायदे होतात. त्यामुळेच जगभरात योगाचे महत्त्व वाढले आहे. तुम्हाला स्वतःला अधिक शांत करायचे असेल तर योगा उत्तम आहे. त्यामुळे नियमित योगा करणे तुमच्यासाठी आणि इतरांसाठीही फायद्याचे ठरते.

प्रश्न – योगाची मुख्य तत्वे कोणती आहेत?
उत्तर
– योग्य पद्धतीने नियमित व्यायाम, श्वासावर नियंत्रण ठेवणे, स्वतःला अत्यंत आराम वाटेल हे पाहणे, ध्यानधारणा करून सकारात्मक विचाराकडे आपले पावले वळणे हे योगाचे मुख्य तत्व आणि मिळाणारे फायदे आहेत.

प्रश्न – योगाचे मूळ नक्की कुठे आहे?
उत्तर –
योगाचे मूळ हे साधारण 5000 हजार वर्षापूर्वी उत्तर भारतामध्ये सापडते. ऋग्वेदामध्ये सर्वप्रथम योग हा शब्द नमूद करण्यात आला. अनादी काळापासून आपल्याकडे योगाचे महत्त्व आहे आणि म्हणूनच आता अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही योगा दिन साजरा करण्यात येतो.

हे देखील वाचा,

योग करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम, अन्यथा होईल नुकसान

निरोगी आरोग्यासाठी योगासनाचे प्रकार

Read More From लाईफस्टाईल