प्रत्येक ऋतू आणि हवामानात होणाऱ्या बदलानुसार फॅशन बदलत असते. त्यामुळे ऋतू बदलला की तुम्हालाही तुमचं वॉर्डरोब त्याप्रमाणे अपडेट करावं लागतं. सरणाऱ्या ऋतूत लागणारे कपडे नीट पॅक करून ठेवावे लागतात. तर येण्याऱ्या ऋतूनुसार तुमच्या वॉर्डरोबमध्ये काही बदल करावे लागतात. सध्या उन्हाळ्याला जोरदार सुरूवात झाली आहे. त्यामुळे सर्वांनी त्यांचे हिवाळ्यातील कपडे पॅक करून खास उन्हाळ्यासाठी शॉपिंग केलीच असेल. पण असं असलं तरी अशा काही गोष्टी आहेत ज्या कोणत्याही ऋतूत तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायला हव्या. याचं कारण ऋतू कोणताही असला तरी या पाच गोष्टींची फॅशन नेहमीच इन असते.
व्हाईट शर्ट –
व्हाईट शर्ट ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला कोणत्याही ऋतूत फॅशनेबल ठेवू शकते. थंडी असो, उन्हाळा असो वा पावसाळा तुम्ही तिनही ऋतूत व्हाईट शर्ट नक्कीच घालू शकता. शिवाय एखाद्या ऑफिस इंटरव्हूवसाठी, प्रेझेंटेशनसाठी अथवा ऑफिस डिनरसाठी तुम्ही व्हाईट शर्ट घालणं नेहमीच सोयीचं ठरतं. कोणत्याही फॉर्मल ट्राऊझर अथवा स्कर्टवर व्हाईट शर्ट ऑफिससाठी घालता येतं. याशिवाय ऑफिस व्यतिरिक्तही अनेक ठिकाणी तुम्ही व्हाईट शर्टने फॅशन करू शकता.
ब्लॅक ड्रेस –
उन्हाळा, पावसाळा अथवा हिवाळा कोणत्याही ऋतूत तुम्हाला पार्टीसाठी पटकन तयार व्हायचं असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे. त्यामुळे वॉर्डरोबमध्ये हा ड्रेस नेहमी हाताला पटकन लागेल असाच ठेवायला हवा. शिवाय बऱ्याचदा पार्टीमध्ये ब्लॅक अॅंड व्हाईट, ब्लॅक अॅंड रेड अशी थीम असते. अशा वेळी ब्लॅक पार्टी वेअर ड्रेस तुमच्या नक्कीच फायद्याचा ठरतो. काळ्या रंगामुळे पार्टीत तुम्हाला क्लासिक आणि वर्सेटाईल लुक मिळू शकतो. त्यामुळे एखादा ब्लॅक शॉर्ट ड्रेस तुमच्या वॉर्डरोबमध्ये कोणत्याही ऋतूत असायला हवा.
रिस्ट वॉच –
कोणत्याही ड्रेसवर जोपर्यंत तु्म्ही एक छान रिस्ट वॉच घालत नाही तोपर्यंत शोभा येत नाही. तुमच्याकडे यासाठी रिस्ट वॉचचं एक छान कलेक्शन असायला हवं. कारण पावसाळा, हिवाळा अथवा उन्हाळा तुम्हाला तुमचा प्रत्येक लुक कम्पीट करण्यासाठी रिस्ट वॉच हवंच असतं. तुम्ही यामध्ये क्लासिक मेटल पासून लेदर बेल्टपर्यंत कोणताही प्रकार निवडू शकता. शिवाय ब्रॅंडनुसार निरनिराळ्या लुकवर निरनिराळी रिस्ट वॉच घालू शकता. मात्र यासाठी तुमच्या वॉर्डरोबमध्ये ती सहज मिळतील अशा ठिकाणी ठेवायला हवी.
व्हाईट स्नीकर्स –
फूटवेअर मध्ये तुम्ही सीझन आणि तुमच्या लुकनुसार निरनिराळे प्रकार निवडू शकता. पण व्हाईट स्नीकर्सला कशाचीच तोड नाही. कारण कोणत्याही ऋतूमध्ये वेकेशनवर जाण्यासाठी तुम्हाला व्हाईट स्नीकर्स हवेच असतात. कारण स्नीकर्स घातल्यामुळे तुम्हाला खूप आरामदायक वाटू शकतं. शिवाय व्हाईट कलरमुळे ते तुमच्या कोणत्याही आऊटफिटसोबत मॅच होऊ शकतात.
सनग्लासेस –
सनग्लासेस फक्त उन्हाळ्यातच घालावे असा काही नियम नाही. त्यामुळे सनग्लासेसची एक छान पेअर प्रत्येक ऋतूत तुमच्यासोबत असायला हवी. कारण जरी उन्हाळा नसला तरी तुमचे पफी आईज अथवा डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी सनग्लासेस नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक ऋतूत तुमच्याजवळ ते असणं फायद्याचंच ठरू शकतं.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
सीक्वेन कॅरी करताना या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्या
उन्हाळ्यात ट्रेंडी आणि कूल दिसण्यासाठी ट्राय करा या फॅशन टिप्स
Read More From अॅक्सेसरीज
पायांत चांदीचे पैंजण घालणे ही केवळ जुनी परंपरा नव्हे, त्यामागे आहे वैज्ञानिक कारण
Vaidehi Raje