जसं वाईन जितकी जुनी तितकी जास्त चांगली लागते. तसंच काहीसं बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारबाबत होताना दिसतंय. जसं जसं अक्षयचं वय वाढतंय तसं तसं त्याच्या भूमिका आणि चित्रपट अजून छान होत आहेत. त्यासोबतच त्याच्या यशाचं पॅरामीटरही उंची गाठत आहे. एकीकडे त्याच्यासोबतच अभिनेता वर्षाला कमी चित्रपट करताना दिसत असताना अक्षय मात्र याला अपवाद दिसत आहे. अक्षयची घौडदौड सध्या जोरदार सुरू आहे.
2019 च्या संपूर्ण ऑगस्ट महिन्यात स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर लोकप्रियतेमध्ये बॉलीवूड सुपरस्टार अक्षयकुमार अग्रेसर राहिलेला दिसून आला आहे. Mission Mangal चित्रपटाच्या यशामुळे खिलाडी कुमार बराच कालावधी नंबर वन स्थानावर राहिलेला दिसतोय. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मीडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.
मिशन मंगलमध्ये पाच अभिनेत्रींसोबत अक्षयकुमारची भूमिका होती. पण त्याचा परिणाम उलट चांगलाच दिसून आला. प्रेक्षकांनी आणि फिल्म क्रिटीक्सनी खिलाडीचं कौतुक केलं आणि या चित्रपटाला भरघोस यश मिळालं. स्कोर ट्रेंड्सच्या आकडेवारीनुसार, डिजीटल न्यूज (सोशल मीडीया प्लॅटफॉर्म आणि वेबसाईट), व्हायरल न्यूज आणि प्रिंटन्यूजवर ऑगस्टच्या चारही आठवड्यात 100 गुणांसह अक्षय कुमार पहिल्या क्रमांकावर असलेला दिसून आलाय. 29 ऑगस्टनंतर अक्षयच्या रॅंकिंगमध्ये थोडा फरक पडून तो तिस-या स्थानावर पोहोचला. परंतु ऑगस्ट महिन्यातल्या संपूर्ण आकडीवारीवर नजर टाकल्यास दिसून येईल की, अक्षयने सलमान, शाहरुख, रणवीर आणि वरुणला मागे टाकत ऑगस्ट 2019 च्या संपूर्ण महिन्यावर राज्य केलं आहे.
खिलाडी अक्षयचं मिशन ऑगस्ट यशस्वी झाल्यानंतर आता तो पुढच्या चित्रपटांसह सज्ज आहे. ज्यामध्ये Suryavanshi, Housefull 4, लक्ष्मीबॉम्ब आणि एक म्युझिक व्हिडिओ यांचा मुख्यतः समावेश आहे. हाऊसफुल 4 चं पोस्टर लाँच नुकतंच करण्यात आलं असून यामध्ये अक्षय कुमार टक्कल केलेलं दिसत असून धनुषधारी झालेला दिसत आहे. हा चित्रपट हाऊसफुल सीरिजचा असल्याने अर्थातच विनोदी असणार आहे. तसंच या चित्रपटाची स्टारकास्टही तगडी आहे.
स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात की, “अक्षयच्या डिजीटल प्लॅटफॉर्म आणि पोर्टल्सवर असलेल्या लोकप्रियतेमुळे आणि मिशन मंगलच्या बॉक्स ऑफिसवरच्या धमाकेदार यशामुळे अक्षयच्या लोकप्रियतेत कमालीचा फरक पडला. सोशल मीडीया प्लॅटफॉर्म आणि व्हायरल न्यूजमध्ये अक्षयकुमार अग्रेसर स्थानावर राहिला.”
हे कौल कसे ठरवले जातात याबाबत अश्वनी कौल पुढे सांगतात की, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून हा डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजीटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. ज्याच्या साहाय्याने आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत पोहोचू शकतो.”
P.S : POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन. त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत. शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुूटदेखील आहे. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौंदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.
हेही वाचा –
म्हणून अक्षय कुमार आजही आहे ‘खिलाडी’
‘हेरा फेरी 3’ मध्ये पुन्हा अक्षय कुमार,परेश रावल आणि सुनिल शेट्टीची जबरदस्त कॉमेडी