भारतीय सिनेमांमध्ये अनेक अभिनेत्यांनी अभिनयासोबतच प्रोडक्शन आणि दिग्दर्शनही केलं आहे. या बाबतीत बॉलीवूडमधील अभिनेत्रीही मागे नाहीत. भारतीय सिनेमा काही बाबतीत खूपच लकी आहे. कारण अगदी सुरूवातीच्या काळातच अभिनेत्री-निर्माती देविका राणीच्या स्वरूपात भारतीय सिनेमाला निर्माती मिळाल्या होती. पण दिग्दर्शिकेसाठी मात्र वाट पाहावी लागली. चला पाहूया अशाच काही अभिनेत्री ज्यांनी दिग्दर्शिकेचीही भूमिका निभावली.
कंगना रणौत
बॉलीवूडमध्ये सध्या सतत चर्चेत असणारी क्वीन कंगना रणौत अशी अभिनेत्री आहे जिने स्वतःच्या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. 2019 मध्ये आलेल्या मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने पहिल्यांदाच ही जबाबदारी पार पाडली.
हेमा मालिनी
बॉलीवूडची ड्रीमगर्ल हेमामालिनीने दक्षिणेतून येऊन इथे आपलं खास स्थान निर्माण केलं. उत्तम अभिनय करून मग हेमामालिनीने अनेक चित्रपटही दिग्दर्शित केले. या चित्रपटांमध्ये दिव्या भारती – शाहरूख खान स्टारर दिल आशना है, मोहिनी, टेल मी ओ खुदा सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. दिल आशना है चित्रपटामुळे हिरो म्हणून शाहरूख खानला चमकण्याची संधी मिळाली होती.
रेवती
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री रेवती काही चांगल्या हिंदी चित्रपटातही भूमिका केल्या आहेत. त्या सिनेमांमध्ये तिने अभिनेत्रीचं काम केलं. त्यानंतर तिने दिग्दर्शनाचा मार्ग अवलंबला. फिर मिलेंगे हा शिल्पा शेट्टी आणि सलमान खान स्टारर एड्स रोगावर भाष्य करणारा हा चित्रपट रेवतीने खूपच सुंदररित्या प्रेक्षकांसमोर मांडला होता. तसंच तिने मुंबई कटींग आणि केरला कॅफे यासारखेही चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
अपर्णा सेन
महान फिल्मकार सत्यजीत रे यांच्या तीन कन्या या चित्रपटातून वयाच्या फक्त 15 व्या वर्षी चित्रपटांमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री म्हणजे अपर्णा सेन. अपर्णा सेनने अभिनयात तर यश मिळवलंच त्यासोबतच चांगली दिग्दर्शिका म्हणूनही स्वतःला सिद्ध केलं. दिग्दर्शिका म्हणून आपल्या पहिल्या चित्रपटात 36 चौरंगी लेनमध्ये तिने गंभीर सिनेमाप्रती असलेली ओढ दाखवून दिली. तिने परोमा, सती, परोमितार एक दिन, मिस्टर अँड मिसेज अय्यर, द जापानीज वाईफसारख्या चर्चित चित्रपटाचं उत्तम दिग्दर्शन केलं.
कोंकणा सेन शर्मा
आपल्या आईच्या पावलांवर पाऊल टाकत कोंकणा सेननेही दिग्दर्शन केलं आहे. ती उत्तम अभिनेत्री तर आहेच. जिला दोन राष्ट्रीय पुरकार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले आहेत. आपल्या आईप्रमाणेच अपर्णानेही दिग्दर्शनात हात अजमावला आहे. नामकोरन नामक बंगाली शॉर्ट फिल्ममध्ये तिने दिग्दर्शित केल्यानंतर डेथ इन गंज नामक फिचर फिल्मही केली. या चित्रपटासाठी तिला बेस्ट डेब्यू दिग्दर्शक म्हणून फिल्मफेअर अवार्ड मिळालं होतं.
नंदिता दास
आर्ट फिल्म्समधील मोठं नाव असलेली अभिनेत्री म्हणजे नंदिता दास. जिच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. 2008 साली आलेल्या फिराक या चित्रपटाचं दिग्दर्शन करून तिने आपली छाप सोडली. त्यानंतर 2018 मध्ये आलेल्या मंटो या सिनेमानेही खूप वाहवा मिळवली.
पूजा भट्ट
दिग्दर्शक वडील महेश भट्ट यांची मुलगी आणि अभिनेत्री पूजा भट्टनेही आपल्या वडिलांप्रमाणे दिग्दर्शनात हात आजमावला. 2003 साली आलेल्या पाप या सिनेमाचं दिग्दर्शन तिने केलं होतं. त्यानंतर तिने हॉलिडे, धोखा, कजरारे आणि जिस्म 2 सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
हेही वाचा –
या बॉलीवूड अभिनेत्री हुबेहूब दिसतात त्यांच्या ‘आई’सारख्या
Flashback : सलमान खान ते आलिया… पाहा तुमच्या सेलेब्सचे Audition videos
असे बॉलीवूड स्टार्स ज्यांचं यश त्यांच्या आईला पाहता आलं नाही