ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
अंकिता लोखंडेचं फायनल ठरतंय…लवकरच वाजवा रे वाजवा!

अंकिता लोखंडेचं फायनल ठरतंय…लवकरच वाजवा रे वाजवा!

गेल्या कित्येक दिवसांपासून अंकिता लोखंडे आणि बिझनेसमन विकी जैन यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. लवकरच ही जोडी लग्न करणार असंही म्हटलं जात आहे. त्यावर अंकिताने आता फायनली शिक्कामोर्तब केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. अंकिताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंवरून विकी जैनबरोबर दोन फोटो पोस्ट केले आहेत ज्यामधून हे दोघं लवकरच लग्नाची आनंदाची बातमी सर्वांना देणार आहेत हे निश्चित झाल्याचं दिसून येत आहे. अंकिताने तिच्या सोशल मीडियावरून विकीबरोबरचे दोन ते तीन फोटो पोस्ट केले असून यांच्यामधील नातं आता स्पष्ट झालं आहे. या फोटोवरून विकीने अंकिताला लग्नासाठी मागणी घातली असावी असंच वाटत आहे. 

अंकिताचे आढेवेढे…तरीही विकीवरील प्रेम स्पष्ट

Instagram

अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना मध्यंतरी खूपच उधाण आलं होतं. तर या जोडीने लग्नसाठी आठ बेडरूमचा बंगलाही मुंबईत विकत घेतला असल्याच्या बातम्या काही महिन्यांपूर्वी आल्या होत्या. अंकिता आणि विकी एकमेकांना डेट करत असून विकीने अंकिताला लग्नाची मागणी घातली असावी असं अंकिताने पोस्ट केलेल्या फोटोंमधून दिसून येत आहे. अंकिताने पहिला फोटो पोस्ट करत ‘ब्लिसफुल’ अशी कॅप्शन दिली आहे. या तिच्या फोटोंवर तिचे सहकलाकार आणि तिच्याबरोबर काम करणारे सर्व तिचे हितचिंतक तिचं अभिनंदन करत आहेत. तर दुसरा फोटो अंकिताने पोस्ट केला असून त्यामध्ये विकीला टॅग करत ‘मी विचार करेन’ असं सांगत अंकिता आढेवेढे घेत असल्याचं दिसत आहे. पण या फोटोमध्ये दोघेही अतिशय आनंदी दिसत असून लवकरच लग्नाची गोड बातमी आपल्या चाहत्यांना देतील अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांनाही आता निर्माण झाली आहे. या फोटोवर अंकिताचा ‘मणिकर्णिका’मधील सहकलाकार वैभव तत्त्ववादी यानेही तिला ‘हो म्हण’ अशी कमेंट दिली आहे. तर प्रार्थना बेहेरे, हिमांशु मल्होत्रा, अमृता खानविलकर या कलाकारांनी तिला रिप्लाय दिले आहेत.  

ADVERTISEMENT

अंकिताच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाचे वारे

Instagram

अंकिताने आपल्या करिअरची सुरुवात ‘पवित्र रिश्ता’ या बालाजी टेलिफिल्म्सच्या मालिकेपासून केली. ही मालिका खूप वर्ष चालली आणि अंकिताने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. याच मालिकेत तिची आणि सुशांत सिंह राजपूतची जोडी जमली. मात्र काही वर्षांच्या नात्यानंतर या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यानंतर अंकिता मध्यंतरीच्या काळात गायब झाली होती.  पण मणिकर्णिकानंतर पुन्हा एकदा अंकिताला चांगलं यश मिळालं आहे. अंकिताच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाचे वारे वाहायला लागले असून अंकिता आणि विकी जैन लवकरच लग्न करणार आहेत असं दिसून येत आहे. 

विकीबरोबर खरेदी केला 8 बीएचकेचा बंगला

ADVERTISEMENT

Instagram

अंकिता गेले कित्येक महिने विकी जैनला डेट करत आहे. मणिकर्णिकाच्या प्रमोशनच्या वेळी तिने हे मान्यही केलं आहे. तर काही दिवसांपूर्वी एका मित्राच्या लग्नात अगदी आनंंदात नाचताना आणि किस करताना या दोघांचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. अंकिताला नेहमीच कधी लग्न करणार? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. पण अंकिता आणि विकीने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. पण आता या जोडीने शहरामध्ये 8 बीएचकेचा बंगला खरेदी केल्याची बातमी आहे. लग्न झाल्यानंतर दोघंही या घरामध्ये शिफ्ट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याचवर्षी अंकिता आणि विकी लग्नबंधनात अडकणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. 

हेदेखील वाचा –

अंकिता लोखंडे लवकरच करणार लग्न, खरेदी केलं 8 बीएचके घर

ADVERTISEMENT

अंकिता लोखंडेने केलं आपल्या बॉयफ्रेंडला किस, व्हिडिओ व्हायरल

मणिकर्णिकामधील ‘झलकारी बाई’ साकारण्यासाठी अंकिता लोखंडेनं घेतलं ‘हे’ खास प्रशिक्षण

03 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT