तुम्ही स्वतःला पूर्ण झाका किंवा नका झाकू, घरातून बाहेर पडल्यानंतर रोज तुम्हाला धूळ आणि मातीचा सामना करावाच लागतो. त्यामुळे चेहऱ्यावरील त्वचा अतिशयक कोरडी आणि काळी झाल्यामुळे त्रास होतो. इथे आम्ही अशाच मुलींना या ब्युटी प्रॉब्लेम्सना टाटा बाय बाय म्हणण्यासाठी काही ब्युटी हॅक्स सांगणार आहोत. तुमची त्वचा उजळण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये चेहऱ्याचे क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉईस्चरायजिंग करायला हवं.
क्लिंजिंग (Cleaning)
कधीही बाहेरून आल्यानंतर स्वतःचा चेहरा लगेच क्लिंजरने साफ करावा. तुमच्या चेहऱ्यावर जर पुळ्या असतील तर अँटीबॅक्टेरियल क्लींजरचा वापर करावा ज्यामुळे पोर्स उघडतात आणि त्यातील घाण साफ होते. क्लिंजिंगसाठी तुम्ही एरंडेल, ऑलिव्ह वा नारळाच्या तेलाचा वापर करूनही त्वचेमध्ये चांगला फरक जाणवू शकता. हे कोरड्या, डिहायड्रेटेड आणि अवेळी येणाऱ्या सुरकुत्यांच्या त्वचेसाठीदेखील उपयोगी असते.
क्लिंजिंग कसे करावे? (How To Cleanse)
याचा वापर करण्यासाठी थोडेसे गरम तेल आपल्या हातावर घेऊन काही मिनिट्स मालिश करावे. चेहऱ्यावरील ऑईल मसाज त्वचेवरील छिद्र आणि त्यातील साचलेला मळ साफ करण्यासाठी आणि रक्ताभिसरण वाढविण्यासाठी मदत करते. तसेच त्वचेवरील मेकअप साफ करण्यासाठीदेखील मदत करते. यानंतर गरम पाण्याने भिजलेला टॉवेल पिळून काही मिनिट्स आपल्या चेहऱ्यावर ठेवावा. असं केल्यामुळे तुमच्या त्वचेवरील पोर्स साफ होतील.
मेडिकल फेशियल म्हणजे नक्की काय?
क्लिनिंगसाठी मेडिकल फेशियलदेखील तुम्ही करू शकता. हे पार्लरमध्ये होणाऱ्या फेशियलपेक्षा खूपच वेगळं असतं. हे मेडिसिनल स्किन ट्रीटमेंट त्वचेच्या खास गरजेसाठी असते. सौंदर्य विशेतज्ज्ञ सर्वात पहिले तुमच्या त्वचेची तपासणी केल्यानंतर तुम्हाला योग्य मेडिकल साहित्य काय असेल याबद्दल सांगण्यात येते. या क्लिंजिंग मेडिकल फेशियलमध्ये चेहऱ्यावरील छिद्रामध्ये असणारे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सना अल्ट्रासोनिक उपचाराद्वारे सॉफ्ट एक्सट्रेशनमधून काढण्यात येतं. त्याने रक्ताभिसरणामध्ये सुधारणा होते आणि स्क्रबने डेड स्किन सेल्स साफ करून त्वचा चांगली आणि चमकदार होते.
नैसर्गिक क्लिंजर कसे बनवावे? (How To Make Natural Cleanser For Oily Skin)
चेहऱ्याला नैसर्गिकरित्या साफ करण्यासाठी घरच्या घरी क्लींजरचा वापर करण्यात येऊ शकतो. काकडीच्या रसामध्ये थोडंसं दूध घालून चेहऱ्यावर लावावे. हे अगदी नैसर्गिक तेलकट त्वचेसाठी क्लीन्सर म्हणून काम करते. हे तुमच्या चेहऱ्यावरील घाण आणि डेड स्किन काढून टाकते.
टोनिंग (Toning)
क्लिंजिंगनंतर सर्वात जास्त गरज असते त्वचेला ती टोनिंग अर्थात पोषणाची. बरेचसे लोक त्वचेची क्लिंजिंग तर करतात पण टोनिंग न केल्यामुळे त्यांना हवी तशी चमक चेहऱ्यावर येत नाही. खरंतर, टोनिंग हा क्लिंजिंगचाच एक महत्त्वाचा भाग असतो. चेहऱ्यावरील सुंदरता आणि चमक तशीच ठेवण्यासाठी याची गरज असते. टोनिंगमुळे त्वचेवरील जे अधिक तेल असते ते नियंत्रणामध्ये राहते आणि धूळ-मातीच्या कारणामुळे त्वचेवर जमा झालेली घाणही साफ होते.
लेझर टोनिंग टेक्निक नक्की काय आहे? (Laser Toning Technique)
त्वचेचा प्रकार पाहून त्वचेची क्लिंजिंग आणि टोनिंग करायला हवी. आजकाल आधुनिक लेजर टोनिंग टेक्निकचे प्रकारही आहेत, ज्यामुळे आपल्याला हवी तशी चमक चेहऱ्यावर मिळू शकते. अमेरिका आणि युरोपमध्ये हे टेक्निक खूपच प्रसिद्ध आहे. यामध्ये चेहऱ्यावर क्लिंजिंगनंतर सर्वात पहिले चारकोल सॉल्युशन लावण्यात येते, ज्यामध्ये स्किन व्हायटनिंग सेरम आणि विटामिन्स असतात. दुसऱ्या फेजमध्ये लेजर बीमद्वारे त्वचा आणि त्याखालील भागांमध्ये उत्तेजित करण्यात येते. लेजर टोनिंग ब्राऊन स्मॉट्स, फ्रॅकिल्स, डाग आणि पुळ्या हटवण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो.
Also read healthy routine according to ayurveda & skin care tips in marathi
घरगुती टोनर कसा बनवावा (Homemade Toner)
घरगुती टोनर बनवण्यासाठी पपई, काकडी, टॉमेटोचा रस अथवा केळ्याच्या पल्पचाही वापर करू शकता.
स्क्रबिंग (Scrubbing)
त्वचेच्या सफाईसाठी स्क्रबिंग हादेखील खूप चांगला उपाय आहे. हा त्वचेच्या बाहेरील डेड लेअर अगदी सहजपणाने काढून टाकतो. तसंच एक्स्ट्रा सीबममुळे बंद झालेले छिद्र उघडण्यास मदत होते जेणेकरून ब्लॅकहेड्स तयार होणार नाहीत. सीबम हे त्वचेचे नैसर्गिक मॉईस्चरायजर असते. स्क्रबिंगमुळे त्वचेचे रक्ताभिसरण आणि मऊपणा वाढतो.
स्क्रबिंग करण्याची योग्य वेळ काय (Right Time For Scrubbing)
त्वचातज्ज्ञांच्या मते स्क्रबिंग करण्याची योग्य वेळ ही रात्री झोपण्यापूर्वी आहे. रात्री स्क्रबिंग केल्यामुळे तुमच्या त्वचेवर दिवसभर जमा झालेली धूळ साफ होते आणि तुमचे पोर्सदेखील उघडतात. इतकंच नाही तर, रात्री स्क्रबिंग केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा धूळ जमा होत नाही आणि तुमच्या त्वचेला हवी असणारी हवा योग्य तऱ्हेने मिळते.
सकाळी स्क्रबिंग करणे योग्य का नाही
तसं पाहायला गेलं तर मुली सकाळच्या वेळीच स्क्रबिंग करतात, जे करायला नको. सकाळी स्क्रबिंग केल्यानंतर तुम्ही बाहेर जाता आणि तुमच्या चेहऱ्यावर सूर्याचे किरण येतात त्यामुळे पुन्हा तुमच्या त्वचा काळी होते हे सकाळी स्क्रबिंग न करण्याचं मुख्य कारण आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या त्वचेवर रात्री स्क्रबिंग करणं जास्त योग्य आहे.
स्क्रब किती वेळा करावे
तुमची त्वचा कोरडी असल्यास, महिन्यातून कमीत कमी तीन वेळा तरी स्क्रबिंग करावे. त्याशिवाय तुमची त्वचा तेलकट असल्यास, महिन्यातून केवळ दोन वेळा स्क्रबिंगचा वापर करावा. त्यामुळे तुमची त्वचा साफ होते आणि त्वचेला कोणत्याही तऱ्हेचं नुकसान होत नाही.
घरी कसं करावं स्क्रबिंग (Homemade Scrub)
ऑरेंज पील पावरडरमध्ये तेल आणि दूध मिसळून झालेली तयार पेस्ट चेहऱ्यावर लावून स्क्रबिंग करावे. त्यामुळे त्वचा साफ आणि सुंदर होते.
मॉईस्चरायजिंग (Moisturizing)
आपल्या त्वचेवर सर्वात वरच्या भागात तेल, फॅट आणि स्किन सेल्स तयार होत असतात. या तिन्ही गोष्टी त्वचेवर मॉईस्चरचा समतोल राखतात. त्वचेवरील मऊपणा टिकवून ठेवण्यासाठी मॉईस्चरायजरचा वापर करणे आवश्यक आहे. हे त्वचेला मऊ आणि चमकदार ठेवते.
कसे कराल मॉईस्चरायजिंग
मॉईस्चरायजर लावण्यापूर्वी तुमचा चेहरा व्यवस्थित सुका करून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा साफ करून मॉईस्चरायजर नक्की लावावे. रात्री झोपण्यापूर्वी क्रीम लावण्यामुळे त्वचा नीट मऊ राहते आणि तुमची त्वचा मुलायम राहते.
घरी कसे बनवाल मॉईस्चरायजर (Homemade Moisturizer)
घरगुती मॉईस्चरायजर बनवण्यासाठी एव्होकाडो, मध, लिंबू सर आणि दही एकत्र ब्लेंड करावे. हे मिश्रण योग्य तऱ्हेने फेटून घ्यावे, जेणेकरून त्याचे क्रीम बनेल. त्यानंतर अर्धा तास हे फ्रीजमध्ये ठेवावे. त्यानंतर या क्रीमने चेहरा आणि मानेला मसाज द्यावा. त्वचेला मऊ ठेवून हे क्रीम त्वचा मुलायम आणि चमकदार राखण्यास मदत करते.
स्टीमिंग कधी करावं आणि कधी करू नये
मॉईस्चरायजर केल्यानंतर स्टिमिंग करतात. चेहऱ्यावर स्टिमिंग केल्यामुळे त्वचेवरी छिद्र उघडतात आणि त्यातील घाण बाहेर येते. स्टिमिंग फेस पॅक लावण्याआधी करायला हवे. त्यानंतर फेस पॅक लावल्यास, चेहऱ्यावर ग्लो येतो. तुमची त्वचा तेलकट असल्यास, चेहऱ्यावर वाफ द्यायला हवी आणि तुमची त्वचा खूपच कोरडी असल्यास, तुम्ही स्टीम घेऊ नये.
फेस पॅक (Face Pack)
कोरड्या आणि खरखरीत त्वचेवर उजळपणा आणण्यासाठी आणि लगेच सुंदर बनवण्यासाठी फेसपॅकसारखा दुसरा पर्याय नाही. फेसपॅक केवळ आतूनच त्वचेला चांगलं नाही करत, तर त्वचा साफ होण्यासाठीदेखील मदत करते. चेहऱ्यावर फेसपॅक आठवड्यातून केवळ दोन दिवसच लावायला हवा. यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हे रूक्ष असू नये. फेसपॅकचा उद्देश हा बंद असलेली छिद्र उघडून त्यातील घाण साफ करणं आहे, नैसर्गिक तेल सुकवून घेणे हा उद्देश नक्कीच नाही.
फेसपॅकचे किती थर चेहऱ्यावर लावावे
यानंतर फेसपॅकचा एक थर लावणंच योग्य आहे. सारखा सारखा थर लावण्याने काहीही फायदा होणार नाही. तुमचा फेसपॅक ओला असल्यास किंवा चेहऱ्यावर लावल्यानंतर गळत असल्यास, त्यामध्ये थोडंसं बेसन वा चंदन पावडर मिक्स करून घ्यावी.
स्किन मास्क किती वेळ लावावा
तुमची त्वचा अतिशय संवेदनशील असल्यास, साधारण १० ते १५ मिनिट्स मास्क लावावा आणि जर तुमची त्वचा अगदी नॉर्मल आहे तर २० ते ३० मिनिट्स तुम्ही मास्क ठेवू शकता.
घरातच कसा बनवावा मास्क (Homemade Face Mask)
घरगुती मास्क बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये टॉमेटोची पेस्ट आणि त्यात चार – पाच थेंब लिंबूचा रस घालून चांगल्या तऱ्हेने मिसळून घ्यावे. आपल्या हाताच्या बोटांनी आपल्या चेहऱ्यावर हे मिश्रण लावावे आणि हलक्या हाताने मसाज करावा. हा फेसपॅक चेहऱ्यावर साधारणतः १५ मिनिट्स ठेवून द्यावा आणि नंतर चेहरा साफ करावा. या फेसपॅकमुळे त्वचेवर चांगली चमक येऊन त्वचा मऊ आणि मुलायम होईल.
चेहरा कसा साफ करावा
चेहरा धुण्यासाठी थोडंसं थंड वा साध्या पाण्याचा वापर करावा कारण गरम पाण्याने तुमचा चेहरा कोरडा होतो, तर थंड पाणी तुमच्या चेहऱ्यावरील पोर्स बंद करून टाकते. फेसमास्क कधीही पूर्ण सुकू देऊ नये. जेव्हा अगदी मध्यम स्वरुपाचा सुकला असेल तेव्हाच तो काढवा अन्यथा सुकलेला मास्क अतिशय कडक होतो आणि काढून टाकणं कठीण होतं. तसंच चेहरा साफ करणंही अतिशय कठीण होतं आणि त्यामुळे चेहऱ्याचं नुकसानही होऊ शकतं.
फेस मास्क जास्त सुकल्यास, काय करावंं
जर तुमचा मास्क चुकून जास्त सुकला तर त्याला चेहऱ्यावरून काढण्यासाठी सर्वात पहिले त्यावर पाणी शिंपडावे, त्यामुळे तो थोडा सॉफ्ट होईल त्यानंतर तो काढावा. मास्क साफ केल्यानंतर ओल्या टॉवेलने अतिशय हलक्या हाताने पुसावे आणि मग मॉईस्चरायजर लावावे.
(भारती तनेजा, डायरेक्टर ऑफ आल्पस ब्यूटी क्लीनिक अँड अकॅडमी यांच्या घेतलेल्या मुलाखतीवर आधारित)