ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
अभिनेता आयुषमान खुरानाने मानले मुंबई पोलिसांचे मराठी भाषेत आभार

अभिनेता आयुषमान खुरानाने मानले मुंबई पोलिसांचे मराठी भाषेत आभार

बॉलीवूडमधील रील हिरोज जेव्हा रिअल हिरोजबाबत कौतुकास्पद बोलतात तेव्हा फॅन्सना आनंद होणं साहजिक आहे. अभिनेता आयुषमाननेही नुकतंच असं चांगलं काम केलं आणि फॅन्सनी याबद्दल त्याच कौतुकही केलं. इतरवेळी आपल्या चोखंदळ भूमिका आणि अभिनयाने मन जिंकणाऱ्या आयुषमानने खऱ्या आयुष्यातही फॅन्सचं मन जिंकलंय.

कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. त्यातही देशभरात महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा जास्त आहे. अशा धोकादायक वातावरणातही रात्रंदिवस लोकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस आणि डॉक्टर्स प्रयत्नांची शर्थ करत आहेत. आपलं कुटुंब, आपलं आरोग्य आणि तहान-भूक विसरून त्यांची ड्युटी बजावत आहेत. या परिस्थितीदरम्यान मुंबई पोलिसांनी एक हृदयस्पर्शी व्हिडिओ बनवला होता. ज्यामध्ये मुंबई पोलीस ऑफिसर्सना ते लॉकडाऊनमध्ये घरी असते तर त्यांनी काय केलं असतं असं विचारण्यात आलं होतं. हा व्हिडिओ बॉलीवूडचा विकी डोनर आयुषमान खुरानाने पाहिला आणि आपल्या ट्वीटरवर शेअर करत आयुषमानने निशःब्द झाल्याचं ट्वीट केलं. आश्चर्याची बाब म्हणजे त्याने चक्क मराठी भाषेतून त्याने मुंबई पोलिसांचे मनापासून आभारही मानले. तसंच व्हिडिओ पाहून निशःब्द झाल्याचंही सांगितलं. 

आयुषमानने या ट्वीटमध्ये म्हटलं की, “तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी मी निशःब्द झालो आहे. परंतु मी आज तुम्हाला हृदयापासून धन्यवाद देत आहे. जय हिंद! @MumbaiPolice @DGPMaharashtra #ThankYouMumbaiPolice #ThankYouMaharashtraPolice”

ADVERTISEMENT

Lockdown मुळे दिल्लीत अडकलेल्या जया बच्चन यांना मिस करतोय अभिषेक

आयुषमानच्या मराठी कमेंटमुळे फॅन्स झाले इंप्रेस

आयुषमानने अशी मराठी कमेंट करताच अनेक फॅन्सनी टाळ्या वाजवत त्याचं कौतुक केलं. एका फॅनने तर ट्वीट केलं की, “खरंच  @MumbaiPolice मनापासून धन्यवाद तुमचे आणि समस्त डॉक्टर आणि नर्सेस यांचे सुद्धा आभार आणि @ayushmannk दादा तुझे पण आभार आणि खुप प्रेम” तर दुसऱ्याने फॅन म्हटलं की, दादा काय बोललात तुम्ही…खूपच छान @ayushmannk. तुम्ही रील हिरो आणि पोलीस खरे हिरो. 

तर आयुषमानच्या एक फॅनने तर कमालच केली. त्याच्या सर्व चित्रपटांची नावं वापरून त्याने ट्वीट केलं. “बधाई हो… बाला !! मुंबई पोलिसांचं कौतुक केल्याबद्दल. मी तुला विनंती करतो की, तू भारतीयांना कोरोनाव्हायरसबाबत “shubh mangal savdhan” कर आणि व्हायरसविरोधात “dum laga ke haisa” म्हणत टक्कर द्यायला सांग.. नाहीतर हा “nautanki saala” व्हायरस “andhadhun” होईल आणि मग कोणताच “vicky donor” मदत करू शकणार नाही. तुझ्या  “dream girl” किंवा “sullu” ची मदत घे हवं तर. ” 

क्वारंटाईन सेंटरसाठी या अभिनेत्याने दिले आपले पूर्ण हॉटेल

ADVERTISEMENT

तुम्ही पाहिला का मुंबई पोलिसांवरचा व्हिडिओ

एकीकडे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मुंबईकर घरी बसून कंटाळले असताना पोलिसांची मात्र अवस्था वेगळीच आहे. 24 तास ड्युटी आणि इतर गोष्टींचेही हाल त्यात कुटुंबापासूनही दूर आहेत. जर त्यांना घरी राहायला मिळालं असतं या लॉकडाऊनमध्ये तर त्यांनी काय केलं असतं यावर मुंबई पोलिसांनी खूपच बोलकी उत्तर दिली आहेत. हा दोन मिनिटांचा व्हिडिओ तुमचंही मन नक्कीच जिंकेल. पाहा हा व्हिडिओ.

तुम्हीपण झालात ना इमोशनल. किती साध्या साध्या गोष्टी करायच्यात या पोलिसांना. मग तुम्हाला तर भरपूर वेळ मिळालाय. त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवा आणि काळजी घ्या.

अभिनेत्री समीराच्या मुलीने दिला तिला क्युट फेसमसाज

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा. आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT
09 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT