घरात लहान बाळाचं आगमन होताच सारं घर आनंदाने डोलू लागतं. बाळाच्या आईबाबांप्रमाणे घरातील प्रत्येकाच्या आनंदाला पारावार राहत नाही. बाळाचा जन्म झाल्यावर घरात सर्वांची एकच लगबग सुरू होते ती म्हणजे बाळाला नाव देण्याची… कारण सुरूवातीला बाळाला सोनू, मोनू, चिंटू अशा टोपण नावे दिली जातात. मात्र बाळाला बारशात दिलं जाणारं नावच बाळाची आयुष्यभर ओळख ठरतं. बाळाचा जन्म होताच नातेवाईक, मित्रमंडळी बाळाला नाव काय दिलं ? हा प्रश्न विचारू लागतात. मग थाटमाट केला जातो तो म्हणजे बाळाच्या नामकरण विधीचा… नामकरण विधी म्हणजेच बारशासाठी खास नातेवाईक, पाहुण्यांना, मित्रमैत्रिणींना आमंत्रित केलं जातं. बारशात बाळाची आत्या त्याच्या कानात त्याचे नवे नाव सांगते… आणि मग बारशापासून बाळाला त्याची स्वतःची ओळख मिळते. बऱ्याचदा यासाठी बाळाच्या जन्मपत्रिकेतील नावराशीवरून छान, अर्थपूर्ण नाव निवडलं जातं. बाळाच्या नावराशीवरून कोणतंही आज्ञाक्षर बाळाच्या नावासाठी येऊ शकतं. जर तुमच्या बाळाच्या नावराशीवरून ब हे अक्षर आलं असेल तर आम्ही शेअर करत आहोत खास तुमच्या तान्हुल्यासाठी ब वरून मुलांची नावे, प्रसिद्ध, युनिक, नवीन आणि अर्थपूर्ण (B varun mulanchi nave in marathi).
Table of Contents
बाळाच्या नामकरण विधीसाठी सुंदर मेसेज (Namkaran Invitation Message In Marathi)
प्रसिद्ध अशी ब वरून मुलांची नावे (Popular B Varun Mulanchi Nave Marathi)
बाळाचं नाव ब वरून ठेवायचं असेल तर तुमच्यासाठी खास शेअर करत आहोत ही प्रसिद्ध अशी ब वरून मुलांची नावे (b varun mulanchi nave)
मुलांची नावे | अर्थ |
बजरंग | श्री हनुमानाचे नाव |
बकूळ | एका फुलाचे नाव |
बकुळेश | श्रीकृष्ण |
बद्री | बोराचे झाड |
बद्रीनाथ | तीर्थक्षेत्र |
बळी | एक राजा |
बाण | एक कवी |
बाणभट्ट | एक संस्कृत नाटककार |
बबन | विजयी झालेला |
बलभद्र | बलराम |
बलराज | शक्तीवान |
बळीराम | सामर्थ्यशाली |
बहार | वसंत ऋतू |
बहादूर | शूरवीर |
बालाजी | श्रीविष्णू |
थ वरून मुलांची नावे, आकर्षक आणि अर्थपूर्ण (Tha Varun Mulanchi Nave)
पारंपारिक ब वरून मुलांची नावे (Traditional B Varun Mulanchi Nave Marathi)
बाळाला एखादं छान पारंपरिक आणि अर्थपूर्ण नाव द्यायचं असेल तर ब वरून मुलांची नावे (b varun mulanchi nave) जरूर पाहा.
मुलांची नावे | अर्थ |
बन्सीधर | श्रीकृष्ण |
ब्रम्हा | श्री ब्रम्हदेव |
ब्रजेश | श्रीकृष्ण |
बलदेव | श्रीकृष्णाचा बंधू |
बलभद्र | बलरामाचे एक नाव |
बलवंत | शक्तीशाली |
बल्लाळ | सूर्य |
बहिर्जी | एक शूर मावळा |
बाबुलनाथ | श्रीशंकराचे नाव |
बुद्ध | गौतम बुद्ध |
बाजीराव | एक पेशवा |
बिशन | बैद्यनाथ |
बाहुबली | शक्तीशाली |
ब्रिज भूषण | गोकुळचा राजा |
बाळगंगाधर | शंकराचे बाल रूप |
बाली | शूरवीर |
बोधन | दयाळू |
बंधू | मित्र अथवा भाऊ |
बटूक | तेजस्वी |
बिल्व | एक पत्र |
व वरून मुलींची नावे मराठी, अर्थासह घ्या जाणून (V Varun Mulinchi Nave Marathi)
ब वरून मुलांची नवीन नावे (Latest B Varun Mulanchi Nave)
ब वरून मुलांची नवीन नावे तुम्ही शोधत असाल तर यातील एखादे नाव तुम्ही तुमच्या तान्हुल्यासाठी नक्कीच निवडू शकता.
मुलाचे नाव | अर्थ |
बाळकृष्ण | श्रीकृष्णाचे एक रूप |
बालमोहन | छोटा कृष्ण |
बालरवी | सूर्योदयाचे रूप |
बालाजी | श्री विष्णू |
बालादित्य | उगवता सूर्य |
ब्रिज | गोकुळ |
ब्रिजेश | गोकुळचा राजा |
बिपीन | जंगल |
बिपिनचंद्र | जंगलातील चंद्र |
बृहस्पती | देवांचा गुरू |
बसवराज | राजा |
बोधिसत्व | गौतम बुद्धांना साक्षात्कार झालेला वृक्ष |
बद्रीनाथ | तीर्थक्षेत्र |
बनेश | आनंदी |
ब्रम्हदत्त | श्रीब्रम्हाने दिलेला |
बिमल | शुद्ध |
बालार्क | उगवता सूर्य |
बालकर्ण | सूर्याप्रमाणे चमकणारा |
बाहू | हात |
बहूमुल्य | अनमोल |
‘श’ वरून मुलींची नावे, साजेशी आणि अर्थपूर्ण (Sha Varun Mulinchi Nave In Marathi)
युनिक अशी ब वरून मुलांची नावे (Unique B Varun Mulanchi Nave Marathi)
बाळाला दिलेलं नाव हटके आणि युनिक असावं असं प्रत्येकाला वाटू शकतं. यासाठीच तुमच्यासाठी खास ब वरून मुलांची नावे (Unique b varun mulanchi nave marathi)
मुलाचे नाव | अर्थ |
बादल | ढग |
बंकीम | शूरवीर |
बंसी | बासुरी |
बन्सीलाल | श्रीकृष्ण |
बैजू | एक मोगलकालीन गायक |
बसव | इंद्रराज |
ब्रम्हानंद | अतिशय आनंद |
बळीराज | बलिदान देणारा |
बाबुलाल | देखणा |
बालेंद्रु | चंद्र |
बिरजू | चमकणारा |
बंकीम | शूर |
बुद्धीधन | हुशार |
बिंदुसार | एक रत्न |
बिंबा | प्रतिबिंब |
बाहुशक्ती | शक्तीशाली |
बलबीर | शक्तीशाली |
बालभद्र | शक्तीशाली |
बालांभू | शिवशंकर |
बालमणी | एक रत्न |
बोनी | शांत |
ब्रायन | शक्तीशाली |
बनित | नम्र |
बालिक | तरूण |
बालन | तरूण |
आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेली ही ब वरून मुलांची नावे (b varun mulanchi nave) तुम्हाला कशी वाटली आणि यापैकी कोणते नाव तुम्ही तुमच्या बाळासाठी निवडले आणि हे नाव सर्वांना कसे वाटले हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा.