ADVERTISEMENT
home / गरोदर
प्रसूतीनंतर महिलांनी का प्यावे ओव्याचे पाणी, जाणून घ्या फायदे

प्रसूतीनंतर महिलांनी का प्यावे ओव्याचे पाणी, जाणून घ्या फायदे

गरोदरपण, बाळंतपण आणि बाळाचे संगोपन ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे या सर्व टप्प्यांमधून जाताना महिलांना अनेक सल्ले दिले जातात. कारण एखादी छोटीशी चूकपण या काळात महागात पडू शकते. यासाठीच अनुभवी महिलांचा सल्ला आणि योग्य काळजी या काळात घ्यायला हवी. गरोदरपण, प्रसूती हा एक नाजूक आणि कष्ट्रदायक टप्पा असल्यामुळे या काळात महिलांच्या शरीराची मोठ्या प्रमाणावर झीज होते. यासाठीच महिलांनी बाळंतपणानंतर स्वतःच्या शरीराची योग्य काळजी घ्यायला हवी. या काळात महिलांना बऱ्याचजा ओवा खाण्याचा अथवा ओव्याचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यासाठीच जाणून घ्या याचे कारण… यासोबतच वाचा जाणून घ्या ओवा खाण्याचे फायदे (Ajwain Benefits In Marathi On Health)

बाळंतपणानंतर महिलांनी का प्यावे ओव्याचे पाणी

ओव्याच्या पाण्यामध्ये ओव्याचे गुणधर्म उतरतात. ओवा हा अॅंटि ऑक्सिडंट गुणधर्म असलेला पदार्थ आहे. ज्यामुळे तुमचे सर्दी, खोकला, ताप, सायनस अशा आजारापासून संरक्षण होते. बाळाच्या जन्मानंतर आईला इनफेक्शन झाल्यास बाळाला त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. यासाठीच आईला इनफेक्शनपासून वाचण्यासाठी हा एक घरगुती उपाय करण्यात येतो. शिवाय गरोदरपण आणि बाळंतपणात महिलांच्या पोटात गॅस तयार होण्याची शक्यता वाढते. बाळंतपणानंतर ओवा अथवा ओव्याचे पाणी पिण्यामुळे   पोटातील गॅस कमी होण्यास मदत होते. बाळंतपणानंतर स्तनपान देताना शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत असावा यासाठी ओव्याचे  पाणी पिणे महिलांच्या फायद्याचे ठरू शकते. गरोदरपणात वाढलेले वजन कमी करण्यासाठीदेखील ओव्याच्या पाण्याचा महिलांना चांगला फायदा होतो. बाळंतपणानंतर पहिल्यांदा मासिक पाळी सुरू होते तेव्हा महिलांना खूप त्रास होतो. अशा काळात कोमट पाण्यातून ओवा घेतल्यास चांगला आराम मिळण्याची शक्यता असते.

तान्ह्या बाळासाठी अस्वच्छता ठरु शकते धोकादायक, तुम्ही करत नाही ना या चुका

ओव्याचे पाणी पिण्यामुळे बाळालाही होतो फायदा

आई जे खाते त्याचा परिणाम बाळाच्या शरीरावर होत असतो. कारण पहिले सहा महिने बाळ फक्त आईच्या दुधावर मोठे होत असते. या काळात जर मातेने चुकीचे पदार्थ अथवा अपथ्यकारक  आहार घेतला किंवा बाळाला दूध पचले नाही तर बाळाचे पोट बिघडते. मात्र जर आईने ओव्याचे पाणी घेतले तर त्याचा परिणाम बाळाच्या स्वास्थावर होतो आणि बाळाला पोटदुखणे, अपचन सारखे त्रास होत नाहीत. यासाठी बाळाच्या आईने नियमित ओव्याचे पाणी प्यावे असा सल्ला दिला जातो. 

ADVERTISEMENT

सतत खाऊ नका ओवा,संभवतील या आरोग्य तक्रारी

05 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT