home / लाईफस्टाईल
Benefits Of Ajwain In Marathi

जाणून घ्या ओवा खाण्याचे फायदे (Benefits Of Ajwain In Marathi On Health)

ओवा (Carom Seeds) हा एक असा मसाल्याचा पदार्थ आहे ज्यामध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात. ओवा चवीला तिखट, कडवट आणि आंबट असतो. ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. शिवाय यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सदेखील काही प्रमाणात असतात. ओव्यामधील थायमॉल या जंतूनाशक घटकांमुळे वातावरण शुद्ध होते. त्यामुळे ओव्याचा (Ajwain) नैसर्गिक औषध म्हणून वापर केला जातो. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक पदार्थांमध्ये ओवा आवर्जून वापरला जातो. कारण त्यामुळे पदार्थ रुचकर होतात. चण्याच्या पीठाचा वापर केलेले भजी, वडे, वड्या  अश्या अनेक पदार्थांमध्ये पचनासाठी ओवा वापरला जातो. भारतात महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश या ठिकाणी ओव्याचे पिक घेतले जाते. ओव्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असल्याने प्रत्येकाच्या घरी ओवा असणे फारच गरजेचे आहे. कारण ओव्यामुळे अनेक आरोग्य समस्या घरीच कमी करता येतात. प्राचीन काळापासून ओवा आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी वापर केला जातो. यासाठीच जाणून घ्या ओवा खाण्याचे फायदे (Ova Che Fayde In Marathi)

%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE - Health Benefits Of Ajwain In Marathi

ओव्याचा वापर (Uses Of Ajwain In Marathi)

ओवा हा पदार्थ महाराष्ट्रील सर्वच स्वयंपाक घराता असतो. यासाठीच जाणून घ्या ओव्याचा वापर कसा करावा. 

मुखवास (Mouth Freshener)

जेवण झाल्यावर खालेल्या पदार्थांचे पचन करण्यासाठी मुखवास खाण्याची पद्धत आहे. मुखवासासाठी बडीशेप, लवंग, वेलदोडाप्रमाणेच बऱ्याचदा ओवादेखील वापरण्यात येतो. बडिशेपचे फायदे अनेक आहेत.

मुखवास तयार करण्याची पद्धत (Tips To Make A Mask)

बडीशेप पाव किलो, धनाडाळ 50 ग्रॅ, दोन चमचे ओवा (Carom Seeds), दोन चमचे पांढरे तीळ, 8-10 लवंग, 8-10 वेलदोडे, 50 ग्रॅ जेष्ठमध, एक चमचा सैंधव. मीठ सोडून इतर सर्व पदार्थ चांगले भाजून घ्या. थंड झाल्यावर हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या. वाटलेल्या मुखवासामध्ये सैंधव टाकून हवाबंद डब्ब्यात भरून ठेवा.

जेवणात स्वाद वाढवण्यासह काळी मिरीचे फायदे

स्वयंपाक करण्यासाठी (Cooking)

भारतीय स्वयंपाकात असे अनेक पदार्थ असतात. जे तयार करण्यासाठी चण्याचे पीठ वापरले जाते. चण्याचे पीठ टाकलेले पदार्थ अॅसिडीटीसाठी कारणीभूत ठरतात. म्हणूनच अशा पदार्थांमध्ये ओवा घातल्यास त्या पदार्थांची चवही छान होते आणि ते पचण्यास सोपे (Ova Che Fayde In Marathi) जातात. चण्याच्या पीठापासून तयार केलेल्या भजी, अळू अथवा कोथिंबिरीच्या वड्या अशा पदार्थांमध्ये ओवा घालण्यास विसरू नका. जर तुम्ही अळू अथवा कोथिंबिरीच्या वड्यांमध्ये उकडताना ओवा घालण्यास विसरलात तर काहीच हरकत नाहीत. तव्यावर शॅलो फ्राय करण्याआधी तेलात ओवा टाका. ओवा चांगला तडतडू लागल्यावर त्यावर वड्या तळा. वड्यांना एक खमंग सुवास येईल आणि त्या पाचकदेखील होतील. ओवा खाण्याचे फायदे (Ova Khanyache Fayde In Marathi) अनेक असल्यामुळे या झाडाच्या पानांची भजीदेखील तुम्ही करू शकता. यासाठी घरीच कुंडीत पान ओव्याचे रोप लावा. त्यामुळे ओव्याच्या ताज्या आणि कोवळ्या पानांची भजी तुम्ही घरीच करू शकता.

%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE %E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95 %E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80

बाळ आणि बाळंतिणीला धुरी देण्यासाठी (To Give Smoke To Baby)

पूर्वी बाळाला आणि बांळतिणीला धुरी देण्याची पद्धत होती. कारण त्यामुळे वातावरण शुद्ध होत असे. ओव्यामधील बाळाच्या धुरीत ओवा टाकल्यामुळे बाळाला जंतुसंसर्ग, सर्दी, खोकला होत नाही. कारण ओव्यामध्ये असलेल्या थायमॉलमुध्ये जंतूसंसर्गापासून बचाव होतो. वातावरण शुद्ध झाल्यानने बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. मात्र तुमच्या बाळाला ओव्याची धुरी देण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

सर्दी झाल्यास धुरी घेण्यासाठी (Cough & Cold)

सर्दी झाल्यावर नाक मोकळे होण्यासाठी ओव्याची धुरी घेतल्यास चांगला फायदा होतो.

लवंग खाण्याचे फायदे काय आहे जाणून घ्या

ओवा आरोग्य फायदे (Health Benefits Of Ajwain In Marathi)

ओवा खाण्याचे शरीरावर नक्कीच चांगले फायदे होतात. यासाठीच ओव्याचे हे आरोग्य फायदे (Ova Che Fayde In Marathi) जरूर जाणून घ्या. 

पचनक्रिया सुधारते (Improves Digestion)

ओवा खाण्याचे फायदे (Ova Che Fayde In Marathi) जे जे आहेत त्यातील सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ओव्यामुळे पचनक्रिया सुधारते. याचं कारण ओव्यामध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी दररोज स्वयंपाकात ओव्याचा वापर करा. जेवणानंतर ओव्या मुखवास खाण्याने तुमच्या पचनक्रियेमध्ये हळूहळू सुधार होऊ शकतो. पावसाळ्यात भजी अथवा इतर तळलेले पदार्थांचा बेत नेहमीच केला जातो. अशावेळी ओवा (Carom Seeds) खाण्याने चांगला आराम मिळू शकतो. 

                                                  वाचा – Health Benefits Of Stale Chapati In Marathi

अपचन झाल्यास त्वरीत आराम मिळतो (Treats Indigestion)

%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%A8 %E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8 %E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4 %E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE %E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A5%8B - Health Benefits Of Ajwain In Marathi

अती प्रमाणात जेवण झाल्यास अथवा अपथ्यकारक पदार्थ खाण्याने तुम्हाला अपचनाचा त्रास होतो. अपचनामुळे पोटात गॅस झाल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते. अशा वेळी एखादे अॅंटासिड घेण्यापेक्षा ओवा तव्यावर तुपात भाजून तो कोमट पाण्यासोबत घेतल्यास पोटदुखीवरील घरगुती उपायाने त्वरीत आराम मिळू शकतो. कारण ओव्याने तुमच्या पोटातील गॅस लगेच कमी होण्यास मदत (Ajwain Benefits In Marathi) होते.

सर्दीवर गुणकारी (Beneficial In Cold)

वातावरणातील बदलांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. सर्दी-खोकला अशा आरोग्य समस्या वारंवार होत असतील तर त्यावर ओवा फायदेशीर (Ajwain Benefits In Marathi) ठरू शकतो. सर्दी-खोकला झाल्यास कफ कमी होण्यासाठी ओव्याची धुरी घ्या अथवा ओवा तव्यावर गरम करून कापडाच्या पुरचुंडीने त्याचा शेक छातीला द्या. या उपायाने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. नाक मोकळे होण्यासाठी या पुरचुंडीचा वास घ्या. त्यामुळे तुमचे चोंदलेले नाक लवकर मोकळे होईल.

%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0 %E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80 - Ajwain in marathi

पित्त आणि उलटी (Ajwain For Bile & Vomiting)

पित्ताचा त्रास असेल तर ओवा खाणे तुमच्यासाठी हितकारक आहे. ओवा खाण्याचे फायदे (Ova Benefits In Marathi) जाणून घेताना ओव्याचा हा महत्त्वाचा फायदा मुळीच विसरून चालणार नाही. यासाठी ओवा, सैधव आणि सुंठ एकत्र करून त्याची पावडर घ्या.

सांधेदुखी (Arthritis)

सांधेदुखीचा त्रास होत असल्यास ओवा गरम करून त्याचा शेक घेतल्यास चांगला आराम मिळतो.

वजन कमी करण्यासाठी (Helps To Reduce Weight)

वजन कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी प्यावे. कारण ओव्याच्या पाण्याने तुमची चयापचय शक्ती वाढते. ओव्याचे पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा (Carom Seeds In Marathi) रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. ओव्याच्या पाण्याने चरबी कमी झाल्यामुळे तुमचे वजन आपोआप कमी होते.

                                                          वाचा – Health Benefits Of Jaggery In Marathi

कानदुखी (Earache)

%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%80 - %E0%A4%93%E0%A4%B5%E0%A4%BE %E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE %E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE

कान दुखत असल्यास ओव्याचे तेलाचे काही थेंब कानात घालावे. ज्यामुळे कान ठणकणे कमी होते.

दातदुखी (Toothache)

दातातील इनफेक्शनमुळे दात दुखणे अथवा हिरड्या सुजण्याची समस्या निर्माण होते. दात दुखत असल्यास होणाऱ्या वेदना इतर कोणत्याही वेदनेपेक्षा अधिक असतात. त्यामुळे त्या सहन करणे त्रासदायक  असतात. अशा वेळी ओव्याच्या पाण्याच्या गुळण्या केल्यास आराम मिळतो. दात दुखत असल्यास ओव्याचे तेल कापसाच्या बोळ्याने दातांवर लावावे अथवा त्या दाताच्या हिरडीला ओव्याच्या तेलाने मसाज करावा.

बद्धकोष्ठता (Constipation)

वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर दररोज दुपारी जेवल्यावर एक ग्लास ताकामध्ये ओव्याची पूड आणि सैंधव टाकून प्या. ज्यामुळे तुमचे पोट साफ होण्यास मदत होईल.

दमा (Asthma)

%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%BE - %E0%A4%93%E0%A4%B5%E0%A4%BE %E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87

ओव्यामधील थायमॉल या जंतूनाशक घटकांमुळे दम्याच्या त्रास ओवा खाण्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो. दम्याचा त्रास कमी करण्यासाठी गुळाचा वापर करून दिवसातून दोनदा ओवा खा. 

तोंडाची दुर्गंधी आणि विकार (Bad Body Odour)

दातदुखीवर ओवा उपयुक्त आहेच पण जर तुम्हाला तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या सतावत असेल तर पाण्यात लवंग तेल आणि ओव्याचे तेल टाकून गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी कमी होते. त्याचप्रमाणे तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी हे आणखी काही उपाय तुम्ही करू शकता.

मासिक पाळीच्या समस्या (Menstrual Cycle)

मासिक पाळीमध्ये अनेकजणींना पोटदुखी आणि कंबरदुखी सहन करावी लागते. मासिक पाळीत पोट आणि कंबर दुखू लागल्यास ओवा तव्यावर गरम करून कोमट पाण्यासोबत घेतल्यास त्वरीत आराम मिळतो.

जुलाब (Diarhhea)

जुलाबाच्या त्रासावर ओवा नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. यासाठी जुलाब होत असतील तर दिवसातून दोन वेळा ओव्याचे पाणी प्या.

वाचा – Health Benefits Of Fenugreek Seeds In Marathi

ताप (Heat)

ताप आल्यास ओवा आणि दालचिनीचा काढा फायदेशीर ठरतो. ज्यामुळे तुम्हाला बरं वाटू लागेल.

मुळव्याध (Piles)

मुळव्याधीमध्ये रक्त पडण्याचा त्रास होत असेल तर त्याापासून आराम मिळण्यासाठी ओवा फायदेशीर आहे. यासाठी नियमित ताकातून जिरेपावडर आणि ओव्याची पावडर घ्या.

मायग्रेन (Migraine)

ओवा गरम करून त्याचा वास घेतल्याने अथवा ओव्याचा लेप डोक्यावर लावल्यामुळे मायग्रेनच्या त्रासापासून आराम मिळू शकतो. हा मायग्रेनवरील घरगुती उपाय गुणकारी आहे.

पांढरे केस (White Hair)

केस काळे करण्यासाठी देखील ओव्याचा वापर तुम्ही करू शकता. यासाठी दोन ते तीन कडीपत्त्याची पाने, दोन मनुका, एक चिमुट ओवा एक ग्लास पाण्यात उकळून घ्या. या पाण्यात साखर घालून दिवसातून एक ग्लास दररोज प्या. हळूहळू तुमचे केस काळे होतील.

वाचा – केसांसाठी कापूर तेलाचे फायदे

जंत झाल्यास (Gets Rid Of Hookworm)

ओवा आणि सैंधव एकत्र घेतल्याने जंताचा त्रास कमी होतो.

सेक्स लाईफ सुधारते (Improves Sex Life)

ओवा ही एक नैसर्गिक कामोत्तेजक औषधी आहे. नियमित ओवा खाल्यास सेक्सची इच्छा वाढते.

मधूमेहींसाठी (Diabetes)

मधूमेहींना ओवा खाण्याचे चांगले फायदे होतात. ओव्यामुळे मधूमेह नियंत्रित राहतो.

दारू सोडविण्यासाठी (Overcoming Alcohol Addiction)

दारूचे व्यसन जडल्यास ते लवकर सुटत नाही असे म्हणतात. दारू सोडण्यासाठी घरगुती उपाय आहेत.  दर दोन तासांनी ओवा खाल्यास दारू सोडवणे सोपे जातं असं सांगितलं जातं. 

ह्रदयविकार दूर ठेवण्यासाठी (To Prevent Heart Disease)

ओवा खाण्याचे फायदे हे की यामुळे तुमच्या ह्रदयाचे आरोग्य सुधारते. जे लोक नियमित ओव्याचे सेवन करतात त्यांना लवकर ह्रदयविकार होत नाहीत.

मूतखडा (Kidney Stone)

ज्या लोकांना मूतखड्याचा त्रास असेल त्यांनी नियमित ओवा खाल्यास स्टोनच्या त्रासापासून मुक्तता मिळते. मूतखड्यावर घरगुती उपाय करून त्यावर उपचार करता येतात.

वात विकार कमी होतात (Musculoskeletal Disorders)

वाताचा त्रास असलेल्या लोकांनी हात-पायावर ओव्याच्या तेलाने मालिश करावे. नियमित असे केल्यास वातसमस्या हळूहळू कमी होते.

श्वसनसमस्या कमी होतात (Respiratory Health)

ओव्यातील थायमॉल मुळे श्वसनाच्या समस्या कमी होतात. यासाठई दररोज ओवा चावून खा. मात्र लक्षात ठेवा ओवा खाल्यावर त्यावर कोमट पाणी जरूर प्या. असे दररोज केल्याममुळे तुम्हाला दम लागण्याचा त्रास हळूहळू कमी होतो.

मासपेशीमध्ये ताठरता येण्यासाठी (For Healthy Bones)

ओव्यामुळे शरीरातील मांसपेशीमध्ये थंडपणा आणि स्वस्थता येण्यास मदत होते. ओव्यातील थायमॉलमुळे मासपेशी मोकळ्या होतात. यामुळे अंगदुखीवर ओवा खाण्याचा फायदा होतो. यासाठीच हे सर्व ओवा खाण्याचे फायदे लक्षात ठेवून नियमित ओव्याचा वापर औषधाप्रमाणे करायला हवा. 

FAQ’s

1. ओवा हवाबंद डब्ब्यात ठेवणं गरजेचं आहे का?

होय, ओवा हवाबंद डब्ब्यात साठवून ठेवणं गरजेचं आहे. कारण हवेतील आर्द्रतेमुळे ओवा नरम पडू शकतो.

2. लहान बाळाला ओवा दिला तर चालेल का?

लहान बाळाला ओवा देऊ नये मात्र बाळाच्या आईने ओवा खाण्यास काहीच हरकत नाही. शिवाय घरात ओव्याची धुरी केल्यास बाळाच्या खोलीतील वातावरण शुद्ध होते.

3. पान ओव्याचे काय करता येईल ?

Health Benefits Of Ajwain In Marathi

पान ओव्याच्या झुडूपाला येण्याऱ्या पानांची भजी करतात. जी आरोग्यासाठी लाभदायक असते. काहीजण या पानांचे पराठेदेखील करतात.

ओव्याच्या पानांची भजी

साहित्य- ओव्याची पाने, बेसण, जिरे, हळद, तिखट, ओवा, चवीपुरते मीठ आणि तेल.

कृती- ओव्याची पाने स्वच्छ धुवून ती पुसून घ्यावीत. डाळीच्या पीठात जिरे, हळद, तिखट आणि ओवा आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्या. या  पीठात ओव्याची पाने टाकून कुरकुरीत भजी तळा. ओव्याच्या पानांची भजी लगेच खावी नाहीतर ती नरम पडते.

ओव्याच्या पानांचे पराठे

साहित्य- ओव्याची पाने, बेसण, तांदळाचे पीठ, मिरची,  कणिक,हळद, तिखट, मीठ आणि तीळ, तेल.

कृती –  ओव्याची पाने आणि मिरच्या वाटून घ्या. कणिक आणि तांदळाच्या पीठात पाने आणि मिरच्यांची पेस्ट आणि इतर साहित्या घालून पराठे तयार करा. पराठे तीळावर लाटून घ्या आणि तव्यावर शेकवा. गरमागरम पराठे कोणत्याही चटणीसोबत अगदी स्वादिष्ट लागतात.

4. ओवा जास्त प्रमाणात सेवन केल्यास काय होतं?

ओवा खाण्याचे फायदे अनेक असले तरी ओवा अतिप्रमाणात घेऊ नये. कारण प्रमाणात घेतल्यास ओवा जितका आरोग्यासाठी फायदेशीर आहे तितकाच अतीप्रमाणात घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. अतीप्रमाणात ओवा सेवन केल्यास तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास, अल्सर, डायरिया, यकृताच्या समस्या होण्याची शक्यता असते.

5. ओव्याचा काढा कसा तयार करावा?

एक कप पाणी, पाव कप गुळ, एक चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, एक लवंग ,चार ते पाच काळीमिरी घ्या. एका भांड्यात सर्व साहित्य एकत्र करून दहा मिनीटे चांगले उकळा. हा काढा गाळून घ्या. औषधाप्रमाणे दिवसातून तीन वेळा दोन-दोन चमचे प्या. सर्दी, खोकला अथवा अपचन झाल्यास या काढ्याचा चांगला फायदा होऊ शकतो.

आम्ही तुम्हाला ओव्याचे अनेक चांगले फायदे सांगितले आहेत. ओवा एक नैसर्गिक औषध असल्यामुळे तुम्ही आरोग्य समस्यांवर ओव्याचा वापर नक्कीच करू शकता. घरीच एखाद्या आरोग्य समस्येला दूर करण्यासाठी ओवा अत्यंत फायदेशीर आहे. मात्र आधी सांगितल्याप्रमाणे ओव्याचे अतिप्रमाणात वापर करू नका. दिवसभरात एक चमचा ओवा खाण्यास काहीच हरकत नाही. सर्दी, खोकला अथवा एखाद्या साध्या आरोग्य समस्येवर तुम्ही स्वतःच्या मनाने ओवा खाऊन उपचार करू शकता. मात्र जर तुम्हाला एखादी गंभीर आरोग्यसमस्या असेल तर ओव्याचा वापर करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कारण प्रत्येकाची शरीरप्रकृती निरनिराळी असते. त्यामुळे त्यावर केले जाणारे उपचारदेखील निरनिराळे  असू शकतात. तुम्हाला आम्ही दिलेली माहिती कशी वाटली आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे देखील जरूर कळवा.

11 Apr 2019

Read More

read more articles like this
good points logo

good points text