ADVERTISEMENT
home / xSEO
Birthday Wishes For Niece In Marathi

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Bhachila Vadhdivsachya Hardik Shubhechha Marathi

घरात बाळाचा जन्म होणार हे कळल्यावर संपूर्ण घर आनंदून जाते. सगळ्यांनाच त्या छोट्याच्या जिवाच्या आगमनाची उत्सुकता असते. त्यात जर होणाऱ्या आईचे जर पहिले बाळंतपण असेल तर ते रीतीप्रमाणे माहेरीच होते. त्यामुळे बाळाचा लळा आजोळच्यांना सर्वत्र आधी लागतो. बाळाचा जन्म झाल्यावर जितके आई-बाबा, आजी-आजोबा खुश होतात, तितकेच मामा-मावशी देखील आनंदित होतात. त्यांना भाचा व भाची दोघांच्याही जन्माचा आनंद सारखाच असतो. मामा व मावशीचे त्यांच्या भाच्यांशी खूप खास नाते असते. मामा व मावशी हे आईच्याच मायेने भाच्यांची काळजी घेतात, त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांचे सगळे हट्ट अगदी हक्काने पुरवतात. पण प्रसंगी ते त्यांचे मित्र होऊन त्यांच्या बरोबर खेळतात, बागडतात. भाची म्हणजे तर मामाचा जीव कि प्राण असते. तिच्यात मामाला आपल्या ताईची किंवा लहान बहिणीचीच प्रतिकृती दिसते. भाचीचे बालपण अनुभवताना आपल्या ताईचे बालपण मामाला ,मावशीला पुन्हा आठवते. अशा लाडक्या भाचीच्या वाढदिवस असेल तर त्यासाठी भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा तर मामा मावशी देणारच! या लेखात आम्ही तुमच्यासाठी लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश आणलेले आहेत. यापैकी काही तुम्ही तुमच्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नक्कीच पाठवू शकाल. 

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Bhachila Vadhdivsachya Shubhecha

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Bhachila Vadhdivsachya Shubheccha
भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

लाडक्या भाचीचा वाढदिवस म्हणजे मामा-मावशीला खास दिवस! या खास दिवशी भाचीला खास शुभेच्छा तर द्यायलाच हव्यात! खाली दिलेल्या शुभेच्छा संदेशांपैकी तुम्हाला आवडतील ते संदेश तुमच्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठवा. 

– उंच उंच जगात तू घ्यावी प्रगतीची भरारी 

तुझ्या उत्तुंग यशाला कधीही सीमा नसावी 

ADVERTISEMENT

तुझ्या सगळ्या आकांक्षा-स्वप्ने पूर्ण व्हावीत हीच आजोळच्या सर्वांची इच्छा 

लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

– तू कायम सुखी राहावीस हेच देवाकडे मागणे आहे, तुझ्या उज्वल भविष्यासाठी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या असलेल्या तुझ्या लाडक्या मामाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

– माझ्या आयुष्यातला आनंद तू आहेस, तुझ्या कोडकौतुकात इतकी वर्षे कशी निघून गेली कळलेच नाही. तू झालीस आणि आम्हाला आमची ताईच परत लहान झाल्यासारखी वाटतेय. प्रिय भाचीस वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. 

ADVERTISEMENT

– आजच्या दिवशी या अंगणात एक छोटीशी परी आली. जिच्यामुळे मला सुखाची एक नवी व्याख्या कळली. लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

– आज आमच्या लाडक्या परीराणीचा वाढदिवस! आज त्या मुलीचा वाढदिवस आहे जिने आजोळचे अंगण मायेने भरून टाकले. मामा कडून भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

वाचा – ५०० पेक्षा जास्त Happy Birthday Wishes In Marathi

मामा कडून भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Mamakdun Bhachila Vadhdivsachya Shubhechha

मामा कडून भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Mamakdun Bhachila Vadhdivsachya shubhecha
लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मामा व भाचीचे नाते खूप सुंदर असते. मामा म्हणजे आईची माया व वडिलांची काळजी असे सुंदर कॉम्बिनेशन असते. भाच्यांच्याही मनात मामाचे स्थान खूप खास असते. मग वाढदिवसाच्या दिवशी तर मामाच्या खास शुभेच्छांची वाट भाची बघणारच! कारण भाचेमंडळी सुद्धा मामाच्या वाढदिवशी लाडक्या मामासाठी खास वाढदिवस शुभेच्छा पाठवतात. तुमचीही भाची तुमच्या शुभेच्छांची वाट बघत असेल ना? मग तुमच्या लाडक्या भाचीला मामा कडून खास शुभेच्छा नक्की पाठवा. 

ADVERTISEMENT

मी रोज देवाचे आभार मानतो कारण त्याने मला एक परीसारखी गोड भाची दिली. माझ्या गोड स्वभावाच्या सुंदर भाचीला मामाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तू माझ्या आयुष्यातली सगळ्यात खास व अनमोल व्यक्ती आहेस. तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाही हा मामा करू शकत नाही. देवाकडे हीच प्रार्थना आहे की माझ्या भाचीला सुखी व यशस्वी आयुष्य लाभो. लाडक्या भाचीला मामाकडून वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा… 

भाची म्हणजे आयुष्यात आलेली जणू सुंदर परीच आहे. आमची भाची म्हणजे एक गोड बाहुली आहे. माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 

तुझ्या बालपणीच्या गमतीजमती आणि सुंदर प्रसंग आठवून आजही आमच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य उमटते. तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप आशीर्वाद आणि लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

यशाची उंच शिखरे तू सर करावी, मागे वळून बघताना आमच्या आशिर्वादाचीही आठवण ठेवावीस, तुझ्या प्रगतीचा वेलू गगनास भिडू दे, तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होऊ दे! लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सगळी दुःखे आणि वेदना तुझ्यापासून नेहेमी लांब राहाव्यात आणि तुझ्या आयुष्यात सगळी सुखे असावीत हीच देवाकडे आजच्या खास दिवशी प्रार्थना आहे. लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

माझी लाडकी भाची म्हणजे बागेत फुलणारे गुलाबाचे फुल नाही तर माझ्या आयुष्यात सुगंध आणणारे देवाघरचे फुल आहे. या सुगंधाने माझ्या आयुष्यात आनंद आला आहे. लाडक्या भाचीला मामा कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या खांद्यावर बसून फिरायला जाण्यासाठी हट्ट करायचीस, खाऊसाठी गाल फुगवून बसायचीस. तुझ्या या बालपणीच्या आठवणी अजूनही मनात ताज्या आहेत. आजच्या या खास दिवशी मामाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

तुझे छोटेसे पाऊल या घरात पडले आणि या आजोळच्या भिंतींना पुन्हा नव्याने घरपण मिळाले. माझ्या या गोड भाचीला आयुष्यभर सुखी ठेव हीच देवाकडे प्रार्थना आहे. लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या आभळभरून शुभेच्छा!

अधिक वाचा – भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Cute Birthday Wishes For Niece In Marathi

भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा । Cute Birthday Wishes For Niece In Marathi
भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाचा – लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मावशी कडून भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes To Niece From Aunt In Marathi 

मावशी कडून भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा । Birthday Wishes To Niece From Aunt In Marathi
लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

अधिक वाचा – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका

ADVERTISEMENT

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Birthday Status For Niece In Marathi

भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या खास व्यक्तीचा वाढदिवस हा आयुष्यातील एक आनंदाचा दिवस असतो. मामा व मावश्यांसाठी त्यांची भाची ही जीव कि प्राण असते. अशा लाडक्या भाचीचा वाढदिवस त्यांच्यासाठी एक खास दिवस असतो. आपल्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी भाषेतून देण्यासाठी यातून काही खास संदेश निवडा.

माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Special Birthday Wishes For Niece In Marathi

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

लाडक्या भाचीच्या वाढदिवशी मामाने खास गिफ्ट बरोबर तर स्पेशल शुभेच्छा द्यायलाच हव्या. भाची देखील मामा मावशीकडून स्पेशल गिफ्ट आणि खास शुभेच्छांची वाट बघत असते. हे नाते असतेच असे. हळवे, सुंदर आणि प्रेमळ! आईनंतर मामा आणि मावशीच तर असतात जे आईप्रमाणे प्रेम करू शकतात. असेच जर तुमच्या वडिलांचा वाढदिवस असेल तर त्यांनाही खास शुभेच्छा तुम्ही देऊ शकता. तुमचे प्रेम या खास शुभेच्छांमधून व्यक्त करा. 

अधिक वाचा –

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT
12 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT