logo
Logo
User
home / xSEO
Birthday Wishes For Niece In Marathi

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Bhachila Vadhdivsachya Hardik Shubhechha Marathi

घरात बाळाचा जन्म होणार हे कळल्यावर संपूर्ण घर आनंदून जाते. सगळ्यांनाच त्या छोट्याच्या जिवाच्या आगमनाची उत्सुकता असते. त्यात जर होणाऱ्या आईचे जर पहिले बाळंतपण असेल तर ते रीतीप्रमाणे माहेरीच होते. त्यामुळे बाळाचा लळा आजोळच्यांना सर्वत्र आधी लागतो. बाळाचा जन्म झाल्यावर जितके आई-बाबा, आजी-आजोबा खुश होतात, तितकेच मामा -मावशी देखील आनंदित होतात. त्यांना भाचा व भाची दोघांच्याही जन्माचा आनंद सारखाच असतो. मामा व मावशीचे त्यांच्या भाच्यांशी खूप खास नाते असते. मामा व मावशी हे आईच्याच मायेने भाच्यांची काळजी घेतात, त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांचे सगळे हट्ट अगदी हक्काने पुरवतात. पण प्रसंगी ते त्यांचे मित्र होऊन त्यांच्या बरोबर खेळतात, बागडतात. भाची म्हणजे तर मामाचा जीव कि प्राण असते. तिच्यात मामाला आपल्या ताईची किंवा लहान बहिणीचीच प्रतिकृती दिसते. भाचीचे बालपण अनुभवताना आपल्या ताईचे बालपण मामाला ,मावशीला पुन्हा आठवते. अशा लाडक्या भाचीच्या वाढदिवस असेल तर त्यासाठी भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा तर मामा मावशी देणारच! या लेखात आम्ही तुमच्यासाठी लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश आणलेले आहेत. यापैकी काही तुम्ही तुमच्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नक्कीच पाठवू शकाल. 

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Bhachila Vadhdivsachya Shubhecha

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Bhachila Vadhdivsachya Shubheccha
भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

लाडक्या भाचीचा वाढदिवस म्हणजे मामा-मावशीला खास दिवस! या खास दिवशी भाचीला खास शुभेच्छा तर द्यायलाच हव्यात! खाली दिलेल्या शुभेच्छा संदेशांपैकी तुम्हाला आवडतील ते संदेश तुमच्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठवा. 

– तुझा प्रत्येक दिवस छान जावो 

जगात सगळीकडे तुला मानसन्मान मिळो 

जिथेही तुझी पावले पडतील तिथे फुलांच्या पायघड्या पडो 

माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

– तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो 

जगातले सगळे सुख तुला मिळो 

आज देवाकडे हेच मागण्याची माझी इच्छा 

लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

– उंच उंच जगात तू घ्यावी प्रगतीची भरारी 

तुझ्या उत्तुंग यशाला कधीही सीमा नसावी 

तुझ्या सगळ्या आकांक्षा-स्वप्ने पूर्ण व्हावीत हीच आजोळच्या सर्वांची इच्छा 

लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

– तू कायम सुखी राहावीस हेच देवाकडे मागणे आहे, तुझ्या उज्वल भविष्यासाठी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या असलेल्या तुझ्या लाडक्या मामाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

– माझ्या आयुष्यातला आनंद तू आहेस, तुझ्या कोडकौतुकात इतकी वर्षे कशी निघून गेली कळलेच नाही. तू झालीस आणि आम्हाला आमची ताईच परत लहान झाल्यासारखी वाटतेय. प्रिय भाचीस वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. 

– आजच्या दिवशी या अंगणात एक छोटीशी परी आली. जिच्यामुळे मला सुखाची एक नवी व्याख्या कळली. लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

– आज आमच्या लाडक्या परीराणीचा वाढदिवस! आज त्या मुलीचा वाढदिवस आहे जिने आजोळचे अंगण मायेने भरून टाकले. मामा कडून भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

अधिक वाचा – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका

मामा कडून भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Mamakdun Bhachila Vadhdivsachya Shubhechha

मामा कडून भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Mamakdun Bhachila Vadhdivsachya shubhecha
लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मामा व भाचीचे नाते खूप सुंदर असते. मामा म्हणजे आईची माया व वडिलांची काळजी असे सुंदर कॉम्बिनेशन असते. भाच्यांच्याही मनात मामाचे स्थान खूप खास असते. मग वाढदिवसाच्या दिवशी तर मामाच्या खास शुभेच्छांची वाट भाची बघणारच! कारण भाचेमंडळी सुद्धा मामाच्या वाढदिवशी लाडक्या मामासाठी खास वाढदिवस शुभेच्छा पाठवतात. तुमचीही भाची तुमच्या शुभेच्छांची वाट बघत असेल ना? मग तुमच्या लाडक्या भाचीला मामा कडून खास शुभेच्छा नक्की पाठवा. 

मी रोज देवाचे आभार मानतो कारण त्याने मला एक परीसारखी गोड भाची दिली. माझ्या गोड स्वभावाच्या सुंदर भाचीला मामाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तू माझ्या आयुष्यातली सगळ्यात खास व अनमोल व्यक्ती आहेस. तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाही हा मामा करू शकत नाही. देवाकडे हीच प्रार्थना आहे की माझ्या भाचीला सुखी व यशस्वी आयुष्य लाभो. लाडक्या भाचीला मामाकडून वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा… 

भाची म्हणजे आयुष्यात आलेली जणू सुंदर परीच आहे. आमची भाची म्हणजे एक गोड बाहुली आहे. माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 

तुझ्या बालपणीच्या गमतीजमती आणि सुंदर प्रसंग आठवून आजही आमच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य उमटते. तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप आशीर्वाद आणि लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

यशाची उंच शिखरे तू सर करावी, मागे वळून बघताना आमच्या आशिर्वादाचीही आठवण ठेवावीस, तुझ्या प्रगतीचा वेलू गगनास भिडू दे, तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होऊ दे! लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सगळी दुःखे आणि वेदना तुझ्यापासून नेहेमी लांब राहाव्यात आणि तुझ्या आयुष्यात सगळी सुखे असावीत हीच देवाकडे आजच्या खास दिवशी प्रार्थना आहे. लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

माझी लाडकी भाची म्हणजे बागेत फुलणारे गुलाबाचे फुल नाही तर माझ्या आयुष्यात सुगंध आणणारे देवाघरचे फुल आहे. या सुगंधाने माझ्या आयुष्यात आनंद आला आहे. लाडक्या भाचीला मामा कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या खांद्यावर बसून फिरायला जाण्यासाठी हट्ट करायचीस, खाऊसाठी गाल फुगवून बसायचीस. तुझ्या या बालपणीच्या आठवणी अजूनही मनात ताज्या आहेत. आजच्या या खास दिवशी मामाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझे छोटेसे पाऊल या घरात पडले आणि या आजोळच्या भिंतींना पुन्हा नव्याने घरपण मिळाले. माझ्या या गोड भाचीला आयुष्यभर सुखी ठेव हीच देवाकडे प्रार्थना आहे. लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या आभळभरून शुभेच्छा!

अधिक वाचा – भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Cute Birthday Wishes For Niece In Marathi

भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा । Cute Birthday Wishes For Niece In Marathi
भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि काही अनोखे मार्ग शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, भाचीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता सोशल मीडिया असो किंवा तुमचे व्हॉट्सऍप स्टेटस  भाचीच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस टाकून तिचा वाढदिवस खास बनवून टाका. 

– तुला अमाप सुख मिळावे, तू नेहेमी समाधानी व निरोगी राहावे, यशाला गवसणी घातली तरी आमची आठवण कायम ठेवशील अशी देवाकडे प्रार्थना! लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…

– तुझ्या भावी आयुष्यात तुला अनंत सुख आणि आनंद लाभो, यशाच्या प्रकाशाने तुझे आयुष्य उजळून निघो, उमलत्या कळीप्रमाणे तुझे आयुष्य उमलून यावे व सुखाचा सुगंध तुझ्या संपूर्ण आयुष्यात दरवळावा हीच देवाकडे प्रार्थना! लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 

– मी रोज परमेश्वराचे आभार मानतो कारण त्याने मला तुझ्यासारखी प्रेमळ, गोड, निरागस भाची दिली. माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा!

– कधी असते शांत, तर कधी करते भरपूर मस्ती! कधी बसते रुसून तर कधी होते सर्वांची आजी! अशा माझ्या गोड भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 

– देवाकडे मागतो आम्ही एकच मागणे, तुझ्या संपूर्ण आयुष्यात भरो सुखाचे चांदणे! आयुष्यात तुला मिळो यश हीच आमची इच्छा, लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 

– गहिऱ्या डोळ्यांची, गोबऱ्या गालांची, गालावर पडणाऱ्या खळ्या घेऊन गोड हसणारी आमची छोटीशी लाडूबाई आज मोठी झाली आहे. पण आमच्यासाठी मात्र तू कायम आमची छोटीशी बाहुलीचा राहशील. आमच्या निरागस गोड भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

– तू हसतेस तेव्हा सगळे जग आनंदी असते, तू दुःखी झालीस की सगळे जग रडते. तुझ्या आयुष्यात सुख नांदावे हीच आमची इच्छा , लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा… 

मावशी कडून भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday Wishes To Niece From Aunt In Marathi 

मावशी कडून भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा । Birthday Wishes To Niece From Aunt In Marathi 
लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मावशी म्हणजे दुसरी आईच असते. मावशीलाही तिची भाची तिच्या मुलीसारखीच असते. मावशीचा वाढदिवस आहे आणि भाचीने मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत असे होईल का? मग लाडक्या भाचीच्या वाढदिवसासाठी मावशीकडून खास शुभेच्छा तर द्यायलाच हव्यात. चला तर मग पाठवा मावशी कडून भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तू म्हणजे सोनचाफ्याची उमलती कळी , तू म्हणजे मोगऱ्याची नाजूक पाकळी, माझ्या सोनसाखळीला , सोनकळी भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 

 तुझा हसरा चेहेरा बघितला की माझ्या सर्व चिंता दूर होतात. आयुष्य सुंदर भासू लागते. माझ्या लाडक्या भाचीला मावशीकडून  भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 

तुला वाढदिवसाला मी काय भेट देणार, देवाने तुला माझ्या आयुष्यात पाठवून मलाच एक सुंदर भेट दिली आहे. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझे आयुष्य सुंदर झाले. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा!

सोनेरी सूर्यकिरणांनी अंगण सजले, फुलांच्या मधुर सुगंधांने वातावरण फुलले, तुझ्या येण्याने आमचे आयुष्य खुलले. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा! 

आयुष्यात आमच्या आली एक छोटीशी परी, जिने आमच्या आयुष्याची केली स्वप्ननगरी! आमच्या परीला मिळोत सर्व सुखे हीच सदिच्छा, लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

माझ्या आयुष्यातला निखळ आनंदाचा अव्याहत वाहणारा झरा असलेल्या माझ्या लाडक्या बाहुलीला, माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या आभाळभरून शुभेच्छा!

उंच गगनाला गवसणी घालताना, विसरू नकोस आपल्या मुळांना! आयुष्यात तुला भरभरून यश आणि सुख मिळो व तुझ्या चेहेऱ्यावरचे हसू कायम फुललेले राहो. माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी – Birthday Status For Niece In Marathi

भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या खास व्यक्तीचा वाढदिवस हा आयुष्यातील एक आनंदाचा दिवस असतो. मामा व मावश्यांसाठी त्यांची भाची ही जीव कि प्राण असते. अशा लाडक्या भाचीचा वाढदिवस त्यांच्यासाठी एक खास दिवस असतो. आपल्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी भाषेतून देण्यासाठी यातून काही खास संदेश निवडा.

– तुझ्या आयुष्याच्या वाटेवर तुला सुखाच्या पायघड्या अंथरलेल्या मिळोत. तुझ्या चेहेऱ्यावर सदैव सुखाचे हास्य फुललेले राहो. परमेश्वराकडे हीच प्रार्थना की माझ्या भाचीच्या आयुष्यात सदैव सुखाची बरसात होवो. लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

– दिवसागणिक तू मोठी होते आहेस, तरीही माझ्यासाठी तर तू कायम माझी छोटीशी गोड परीराणीच राहशील.माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. 

– तुझ्या आयुष्यातील सगळी संकटे दूर होवोत. तुला प्रत्येक गोष्टीत यश मिळो. तुझा प्रत्येक दिवस सुखाने -आनंदाने भरून जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लाडक्या भाचीबाई! 

– तुझ्या कर्तृत्वाचे आभाळ दिवसेंदिवस विस्तारले जावो, तुझ्या यशाने सारा आसमंत दिपून जावो. आजच्या खास दिवशी मनात हीच कामना आहे. माझ्या हुशार, गोड भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

– आज अशा एका गोड  मुलीचा वाढदिवस आहे जिने मला प्रेमाची नवी व्याख्या शिकवली. जिने माझ्या आयुष्यात नव्याने आनंद आणला. माझ्या लाडाच्या भाचीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा आणि आशीर्वाद! 

– मला आजही आठवते जेव्हा तुझा जन्म झाला होता. पांढऱ्या दुपट्यात गुंडाळलेल्या त्या नाजूक बाळाला जेव्हा मी पहिल्यांदा हातात घेतले, त्याक्षणीच मी स्वतःशीच ठरवले की माझ्या या लाडक्या भाचीसाठी वाटेल ते करणार! वेड्या मामाकडून त्याच्या परीला वाढदिवसाच्या आभळभरून शुभेच्छा!

– दिवस किती भराभर निघून जातात ना, कालपर्यंत माझ्याकडे खाऊसाठी हट्ट करणारी, माझ्याकडून हक्काने नटवून घेणारी माझी भाची आज किती मोठी झाली आहे. स्वतःच्या पायांवर उभी राहिली आहे आणि या मावशीचेच लाड पुरवते आहे. माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अनंत आशीर्वाद! 

– तुझ्या वाढदिवसाचे गिफ्ट द्यायला ही मावशी जरी झाली असली लेट, तरीही रुसून बसू नकोस कारण तू कुठेही असलीस तरी माझ्या शुभेच्छा मिळतील तुला थेट! माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

आयुष्यातील प्रत्येक क्षण खास होतो जेव्हा तुझ्यासारखी निरागस , गोड माणसे आयुष्यात असतात. असाच कायम तुझ्या आजूबाजूच्या माणसांच्या आयुष्यात आनंद पसरवत राहा. तुझे संपूर्ण आयुष्य सुखाने व आनंदाने भरून जावे हीच मावशीची सदिच्छा! माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

अधिक वाचा – आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Special Birthday Wishes For Niece In Marathi

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

लाडक्या भाचीच्या वाढदिवशी मामाने खास गिफ्ट बरोबर तर स्पेशल शुभेच्छा द्यायलाच हव्या. भाची देखील मामा मावशीकडून स्पेशल गिफ्ट आणि खास शुभेच्छांची वाट बघत असते. हे नाते असतेच असे. हळवे, सुंदर आणि प्रेमळ! आईनंतर मामा आणि मावशीच तर असतात जे आईप्रमाणे प्रेम करू शकतात. असेच जर तुमच्या वडिलांचा वाढदिवस असेल तर त्यांनाही खास शुभेच्छा तुम्ही देऊ शकता. तुमचे प्रेम या खास शुभेच्छांमधून व्यक्त करा. 

तिचे हसणे जणू श्रावणातील पावसाची सर, तिच्या गालावरची खळी म्हणजे जणू चंद्रकोर , तिच्या हास्याने भरून गेले आहे हे घर, लागू नये कोणाची आमच्या बाहुलीला वाईट नजर! लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 

तुझा जन्म झाल्याने आयुष्यातले दुःख दूर पळून गेले, तुझ्या जन्माने सुख अनुभवले. तू माझ्या आनंदाचे कारण आहेस. माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 

इंद्रधनुष्याचे झुले, उमलणारी सुगंधी फुले, चमचमणारे तारे आणि वाहणारे वारे! आजच्या या खास दिवशी हे सारे तुझ्या स्वागतासाठी उभे आहेत! माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! 

जेव्हा तुझ्या इवल्याश्या मुठीत तू माझे बोट घट्ट धरून ठेवतेस, तेव्हा माझा प्रत्येक क्षण खास होतो. तुझ्या त्या छोटुकल्या प्रेमळ मिठीत मला जग जिंकल्याचा भास होतो. माझ्या निरागस बाहुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 

प्रत्येकाला एकतरी भाची असावी.. जिच्या जन्माचा सोहळा साजरा करता येईल, जी पैंजण घालून दुडूदुडू धावत आजोळचे अंगण आनंदी करेल.. जी सुंदर फ्रॉक घालून परीसारखी दिसेल, जी भातुकली खेळून तुम्हाला जेवण भरवेल.. जी तुमच्या ताईची एक छोटीशी प्रतिकृती असेल. अशी भाची प्रत्येकाला असावी. देवाने मला अशी भाची दिली म्हणून मी देवाचा आभारी आहे. माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 

ती फक्त माझी भाची नाही तर माझा श्वास आहे. ती फक्त माझी भाची नाही तर माझे स्वप्न आणि माझा विश्वास आहे. ती फक्त माझी भाची नाही तर माझ्या आयुष्यातला आनंद आहे आणि तिच्या चेहेऱ्यावरचे हसू म्हणजे आमचे सुख आहे. तिचा मामा असण्याचा मला अभिमान आहे.. माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

तुझ्या डोळ्यांत कधी दुःखाचे अश्रू न यावेत, तुला आयुष्यभर सुख मिळावे, तुझा यशाचा आलेख कायम चढता राहावा आणि तुझ्या कर्तृत्वाने आमचे डोळे दीपावे! तुझ्या वाढदिवसाच्या खास दिवशी परमेश्वराकडे हीच प्रार्थना! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा! खूप खूप मोठी हो! 

तुझ्यासारखी प्रेमळ , निरागस, गोड भाची मिळणे म्हणजे कोळश्याच्या खाणीत हिरा मिळण्यासारखे आहे. अशा माझ्या गोड बाहुलीस मावशीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

पहाटेच्या सूर्याची कोमल सोनेरी किरणे घेऊन आलीत आजचा सोन्याचा दिवस! या खास दिवसाच्या माझ्या भाचीला अनंत शुभेच्छा व आशीर्वाद! वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा!

उगवता सूर्य आज आशीर्वाद देवो तुला, फुलणाऱ्या कळ्या देवो सुगंध तुझ्या आयुष्याला, सर्व सुखे मिळोत आयुष्यभर तुला…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा! 

फोटो क्रेडिट – istockphoto

अधिक वाचा – मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

12 May 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text